अंतर्यामी ज्योतिषी

ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे ?
झंप्या : हो…
ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे ?
झंप्या : हो… ज्योतिषी महाराज.
ज्योतिषी : तू आताच पाच किलो गहू घेतले.
झंप्या : तुम्ही अंतर्यामी आहात महाराज.
ज्योतिषी :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुर्खा,पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये.रेशन कार्ड नको !

देव पावला

एका पिंजर्यामध्ये काही पोपट एका पोपटीन ला छेडत असतात.
आणि त्याच्याच शेजारी दुसर्या पिंजरया मध्ये शांतपणे एक पोपट पूजा करत असतो
आणि दुसरा पोपट नमाज पढत असतो, दुकानाचा मालक विचार करतो किती शांत आणि सुशील
पोपट आहेत मी जर या पोपटिन ला यांच्याच पिंजरयात टाकतो म्हणजे ती इथे खुश राहील
तो तिला यांच्या पिंजर्यात टाकतो.

तेवढ्यात पूजा करत असणारा पोपट नमाज वाल्या पोपटाला बोलतो भावड्या उठ
देवाने आपली इच्छा पूर्ण केली


एका कंपनीत सकाळीच खुप धावपळ सुरु झाली. सर्वच लोकं
इकडून तिकडे धावपळ करित होते.
.
.
.
काही नविनच रुजु झालेले कर्मचारी धावपळ बघून फारच
धास्तावले.
.
.
.
त्यातल्या एकाने मोठ्या हिंमतीने
एका जून्या कर्मचार्याला विचारले,"काय झाले ?"

आपल्या बॉसला अतिरेक्यांनी पळवले.
अतिरेकी बॉसला सोडायला दहा कोटी खंडणी मागताहेत.
नाहीतर ते आपल्या बॉसला पेट्रोल टाकून जाळुन
टाकणार.
.
.
.
.
काही लोक त्यासाठीच प्रत्येकाला काही मदत
देता येईल का ते विचारायला धावताहेत.
"लोक किती मदत देताहेत ?", नविन
कर्मचार्याचा प्रश्न.
.
.
.
.
"एक लिटर पेट्रोल.", जून कर्मचारी उत्तरला.

खुप शिकणार

काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस."

मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."
मुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंदखाउ शकतेस..??
मुलगी : सहा..
मुलगा : चुक...फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते.. :P
मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा...
.
.
.
मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस..??
मयुरी : नउ..
.
.
मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...

स-माजवादी सत्कार

मुंबईत बेतालपणा,
लखनौ मध्ये गरळ आहे.
खाजवून खरूज काढल्याचा
अर्थ तर सरळ आहे.

भाषॆच्या नावावरती
विषारी फुत्कार केला गेला.
केवळ एका शपथेसाठी
जाहिर सत्कार केला गेला.

हा केवळ सत्कार नाही,
हे तर आगीत तेल आहे !
जे विकले जाते,
त्याचाच जहिर सेल आहे !!


कवी - सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मी माझा चे विडंबन

अशी एक रात्र हवी ज्याला पहाट जोडलेली नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण मीही आशा सोडलेली नाही

अशी एक बायको हवी जीला तोंड हे अंग नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण देवानेही आशा सोडलेली नाही

तुला मी कधी शपथ घ्यायला लावत नाही
कारण तुझ्या वरचा विश्वास शब्दात मावत नाही

तुला मी कधीही वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास इवल्याशा मशीनवर मावत नाही

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
हीच्या घोरण्याच्या सीमा पार करायला तयार नव्ह्त्या

पाखरु आणि गरुड

एकेकाळी मी अंड्यात होतो, मझ्यासारखीच अंडी आजूबाजूला होती
त्या अंड्यांना चीकटून रहाताना, जवळजवळ रहायची सवय जडली होती

रहायला छान घरट होतं, उबेला आईचे पंख होते
वडीलांचा आदर्श घेउन, माझ्या पंखात बळ येत होते

एक दीवस सुर्याची आस धरुन मी आकाशात झेपावलो
उडता उडता लक्षात आले की आता मी एकटाच रहीलो

राजासारखं उडता उडता मला खाली जग दिसलं
फाजील गर्व जागा झाला आणी इथेच मनं फसलं

इतर पाखरही जवळ आली , आम्हालाही शिकव म्हणाली
बळकट पाखर जवळ रहीली, अशक्त मत्र हीरमुसुन गेली

असेच कही दीवस उडत थव्याबरोबर उंच गेलो
अचानक एक गरुड आला व मी पुरता गोंधळलो

गरुडाला यापुर्वी मी कधी पाहीलच नव्हतं
आकाशात मझ्यावर कोणी राहीलच नव्हतं

गरुडाची उंची पाहुन मी बीचकलो तोराच बीथरला
मन सैरभैर झालं आणि सगळा माज उतरला

तो म्हणाला बरोबर चल तुला उंच आकाश दाखवतो
अथांग आकाशात तरंगायच कस ते मी तुला शिकवतो

पुढे कधीतरी चालुन तु ही एक गरुड होशील
पण एक वचन दे, इतर पाखरांनाही वर नेशील

आज राणी पूर्विची ती

आज राणी, पूर्विची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती तू हळू निःश्वासता
वाजती गात्री सतारी नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखुनी पलकांत पाणी घाव सारे साहिले
अन्‌ सुखाच्या आसवांचे मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहुळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी या फुला सोसेल का ?
नीत्‌ नवी मरणे मराया जन्म तू मागू नको



गीतकार     -    वा. रा. कांत
संगीत        -    यशवंत देव
स्वर          -    सुधीर फडके

हृदयाची मशाल

हृदयाची मशाल केली...घनदाट किती तम आहे!
डोक्यावर मुळात माझ्या जगण्याची जोखम आहे!!

बेरीज, वजाबाक्यांची आकडेमोड ना केली.....
उरल्यासुरल्या श्वासांची मजपाशी रक्कम आहे!

टोळधाड पडते मजवर त्या अंबट शौकीनांची!
त्यांची न चूक काहीही....मी जात्या कोकम आहे!!

काळीज काढुनी माझे ठेवतो समोरी त्यांच्या....
बोलणे- वागणे ज्यांचे माझ्याशी मोघम आहे!

प्रत्येक मैफिलीमध्ये भरतोच रंग हा माझा!
मी आसपासही नाही, पण, माझा घमघम आहे!!

मज श्वास तरी घेवू दे....मग विचार तू काहीही!
वय उतार झालेला अन् थकलेला मी दम आहे!!

हातांची उशी,नभाचे पांघरूण करतो आम्ही!
अंथरण्यासाठी अवघ्या धरणीचे जाजम आहे!!


गझलकार - प्रा.सतीश देवपूरकर

गोऱ्या देहावरती कांति

गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एक दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लणं, मोतीपवळ्याचं रान ?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात


- ना. धों. महानोर
मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी….
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्री केली आहेस म्हणुन.......

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कितीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तिची स्तुती करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कोणाच्या मागे शिट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कधी हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुष्टीने कधी बघितलेच नाही
याव्यतिरीक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम ...

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाला कधी समजलेच नाही ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..

फुलपाखरा प्रमाणे आम्हीही
बरयाच सुदर फुलांमध्ये वावरत होतो
पण जाऊन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही....

मिता तुझ्या रे मीठीत

मिता तुझ्या रे मीठीत
जीव चोळामोळा होतो
तुझ्यावीण माझ्या मीता
दिस सरेनासा होतो

दीस सरतो कसासा
रात संपता संपेना
तुझ्या कुशीविण मीता
झोप लागता लागेना

डोळा लागता लागता
मिता स्वप्नामध्ये
येशी हळुवारशा बोटांनी
फ़ुल कळीचे करशी

फ़ुललेल्या देहानिशी
तुला घट्ट बिलगते
तुझ्या मीठीत रे मीता
अंग चोळामोळा होते…

गीत : स्वरांगी देव

म्हणालो नाही. . .

तू गेलीस तेव्हा ' थांब ' म्हणालो नाही
'का जाशी ? ' ते ही ' सांग ' म्हणालो नाही
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
' हे अंतर आहे लांब ' म्हणालो नाही. . .

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पानी
' जा ! फिटले सारे पांग ! ' म्हणालो नाही. . .

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे !
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही. . .

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग – म्हणालो नाही. . .

हे श्रेय न माझे ! तुझेच देणे आहे !
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग – म्हणालो नाही. . .


कवी - संदिप खरे
कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे

बदला

चिंगी : आज्जीच्या वाढदिवसाला तू तिला काय गिफ्ट देणार?

चंप्या : फुटबॉल.

चिंगी : फुटबॉल? आजी कधी फुटबॉल खेळते का?

चंप्या : मग, माझ्या वाढदिवसाला तिने मला भगवतगीता दिली होती....
चम्प्याच्या शाळेत फोटोसेशन होणार होतं..

त्यासाठी त्याच्या टीचर सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना देत होत्या..
“हे बघा.. उद्या सर्वांनी छान छान ड्रेस घालून यायचं..

म्हणजे काही वर्षांनी मोठे झाल्यावर जेव्हा तुम्ही या फोटो कडे बघाल..

तेव्हा म्हणाल..

‘तो बघा झंप्या.. आता डॉक्टर झालाय..;

ती बघा चिंगी.. आता हेरोईन झालीये..’…”

चम्प्या मध्येच बोलला,

“त्या बघा टीचर.. आता देवाघरी गेल्या..”

वेडा बाळू

"शाळेत नाही जाणार,
येतं मला रडू
आई मला शाळेत
नको ना धाडू!"

कोण बरं बोललं,
रडत हळूहळू
दुसरं कोण असणार?
हा आमचा बाळू.

आई मग म्हणाली:
शहाणा माझा राजा
शाळेत गेलास तर,
देईन तुला मजा.

घरी बसलास तर,
हुशार कसा होशील?
बाबांसारखा कसा,
इंग्लंडला जाशील?

आपला रामा गडी,
शाळेत नाही गेला
म्हणून भांडी घासावी,
लागतात ना त्याला?

तू कोण होणार?
डॉक्टर का गडी?
बाबांसारखी ऐटबाज
नको तुला गाडी?

मुसमुसत बोलला,
बाळू आमचा खुळा

"होईन मी गडी,
नको मला शाळा."

ताई

ताई म्हणे मोठी
आणि मी म्हणे लहान
जिथे तिथे जेव्हा तेव्हा
ताईचाच मान

नवीन पुस्तकं ताईला
पेन्सिल पण तिलाच
किती मोठी झाले तरी
मी लहान सदाच!

ताई सारखी मोठी होणार
नवे फ्रॉक तिला
"बरोब्बर" होतात म्हणे
जुने फ्रॉक मला

अस्सा अगदी राग येतो
पण उपयोग काय होणार?
अगदी म्हातारी झाले तरी
मी लहानच राहणार.

परी

परी असते गोरी
परी असते खरी
परीच्या गळयात असते
सोन्याची सरी

परी हासते गालात
परी नाचते तालात
परी अशी चालते
आपल्याच तोर्‍यात

परी असते इवली
चिमणीशी भावली
अंग तिचे मऊ जणू
साय असे लावली

काल मला दिसली
खिडकीमध्ये बसली
खरं सांगते परी
मला बघून हसली

मोठी झाली म्हणजे

मोठी झाले म्हणजे
होणार मी आई
मंडळात जायची
सारखी माझी घाई

मोठी झाले म्हणजे
मी बाई होणार
चष्म्यावरून अश्शी
रागानं पाहणार

मोठी झाले म्हणजे
होईन भाजीवाली

म्हणेन "घ्या हो घ्या हो.
ताजी भाजी आली."

मोठी झाली म्हणजे
बोहारीण मी होईन
नव्या छान भांडयांनी
पाटी माझी भरीन

नकोच पण मोठी व्हायला
लहानच मी राहणार
मोठेपणी सारखा सारखा
खाऊ कसा मिळणार?

ग्रहांचे युद्ध

एकदा चम्या चंद्राच्या नेवी मध्ये एक कॅप्टन असताना आपल्या जहाजावर फेरी मारत असतो
एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो " गुरु ग्रहाचे म्हणजेच आपल्या शत्रूचे एक जहाज आपल्या दिशेने येत आहे "

चम्या : ओह , मग एक काम कर , आत जा आणि माझा लाल शर्ट घेऊन ये
सैनिक: ठीकेय
दोन जहाजांमध्ये तुफान लढाई होते आणि शेवटी चंद्र नेवी जिंकतात
सैनिक : अभिनंदन सर , पण हा लाल शर्ट का घातला तुम्ही ?
चम्या : जर मला गोळी लागली असती तर माझे रक्त बघून माझ्या सैनिकांचा आत्मविश्वास नाहीसा झाला असता ,ते होऊ नये म्हणून.

तेवढ्या एक सैनिक पळत येतो आणि म्हणतो " मंगळ ग्रहावरून शत्रूची ५० जहाजे आपल्या दिशेने येत आहेत"
चम्या : मग आता एक काम कर आत जा आणि माझी पिवळी प्यांट घेऊन ये !!
लग्न झाल्यावर २ वर्षांनी
चिंगी:- मी मुर्ख होते, म्हणून तुज्याशी लग्न केले.




चम्या:- हो ना तेव्हा मी प्रेमात आंधळा झालो होतो, म्हणून माझ्या लक्षात नाही आली हि गोष्ट.
स्वत:च स्वत:शी लढण
आता रोजचच झालाय
छंद म्हणा, विरंगुळा म्हणा
पण आमच मात्र मस्त चाललंय

एकट्याच आयुष्य

एकट्याचाच असत आयुष्य,
एकट्यानेच ते सजवायचं
एकट्यानेच हसायचं, एकट्यानेच रडायचं,
माणसांच्या गर्दीत, एकट्यानेच ते फुलवायचं.
पुण्यात मुबलक प्रमाणात व काहीच कष्ट न करता काय मिळते ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अपमान !!!
नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता,
गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं,
“तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”

गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!

आवाज हुंदक्यांचा

आवाज हुंदक्यांचा, ओठात दाबलेला !
ओथंब आठवांचा डोळ्यात दाटलेला !!

छळते किती-कितीदा ही रात्र पावसाळी..
रंध्रात विरघळावा मृदगंध साठलेला !!

बघ आवरु कसा हा आवेग स्पंदनांचा...
होता सुगंध श्वासा- श्वासात माळलेला !!

तो तीळ जीवघेणा खांदयावरी सख्याच्या...
मग चंद्र पौर्णिमेचा फ़िकाच वाटलेला !!

भाळावरी सख्याच्या सजतात घर्मबिंदू...
पडता मिठी खुलावा शृंगार राखलेला !!

गालांवरी उमटली होती पहाट लाली
प्राजक्त देठ तेव्हा भाळून लाजलेला !!

कल्लोळ भावनांचा जाणेल रातराणी
भावार्थ मौनतेचा ओठात आटलेला !!

- सुप्रिया

ती माझी जन्मसाथी

माझा जन्म झाल्यापासुन तीचे आणि माझे नाते आहे.मी निराश असलो की तिच्या डोळ्यातुन अश्रु येतात आणि मी जेव्हा हसतो तेव्हा तीच्या गालावरच्या खळ्या मला वेडावतात.दुखाःच्या उन्हात ती अधिकच गडद होत जाते आणि सुखाच्या वर्षावात ती माझ्याबरोबर चिंब भिजते.मी तीचा श्वास आहे आणि मीच तीचा आत्मा.मी तिला कधीच काही सांगत नाही तरिही ती सर्व जाणुन असते.रोज मी तिला पायदळी तुडवतो पण तीचे प्रेम आटत नाही.माझ्याशिवाय तीचे विश्व नाही ती पुर्णपणे मला समर्पित आहे.मी ज्यादिवशी अलविदा घेईल तेव्हा तीही या जगाचा माझ्याबरोबर निरोप घेईल.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

ती माझी सावली आहे !