तू

सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू .

कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास
ऐसे जीवनगाणे तू,

खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,

निखळ मनाचे तुझे वागणे
मला प्रेमाने साद घालणे,
राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,

गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमद्ये आकार तू
प्रेमामध्ये  साकार तू,

प्रत्येक दिवशी आठवतात
या प्रेमाची  खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं


-किरण अदम 

तो मीच असेन ..!

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!

कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन ..!

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन .

-किरण अदम 

न्यायदेवता 'चोर' म्हणाली..!!

न्यायदेवता 'चोर' म्हणाली..
पब्लिक त्याला 'थोर' म्हणाली..!

धमाल 'बापू' तुझी गिधाडे..
संसद त्यांना 'मोर' म्हणाली..!

माणुसकीला बघून दुनिया..
'हे कोणाचे पोर'..म्हणाली..!

दार उघडले चोरासाठी..
अन आम्हाला 'घोर' म्हणाली..!

गझल ऐकुनी रडली दुनिया..
तीच गझल तू 'बोर' म्हणाली..!


कवी -  ज्ञानेश वाकुडकर

खंत नाही खेद नाही...........

कोण आहे शेजारी
कोण आहे आजारी
काय चालले बाजारी
मला काही माहीत नाही
ह्या कशाची खंत नाही खेद नाही...........

भावनांचा बाजार भरला
अश्रु झाले मुके सारे
वार होती किती तरी
रक्त गेले सुकुन सारे
ना रक्त्ताची जात पाहु
समर्थनाचे भाट होवु
काय मजला घेणॆ देणे
जीवाला कशाची खंत नाही खेद नाही.........

थांबला रस्यावरी
वार करणारा जरी
दार माझे बंद मी
सुरक्षित आहे आत तरी
सरकार काय झोपले
बघुन घेतील लोक सारे
किती मेले किती गेले
बघु उद्या टि.व्ही.पुढे
कशाची खंत नाही खेद नाही.........

कवियत्री - सौ .विणा बेलगांवकर

देवांनो..!

या इकडे अन माझ्यासोबत जरा बसा रे देवांनो..
ही धर्माची लफडी सोडा..जरा हसा रे देवांनो !

मंदिर-मस्जिद करता करता माणूस पागल झाला..
हृदयी त्याच्या तुम्ही एकदा जरा धसा रे देवांनो !

कुणी ओढतो रेष मधे अन..देश वेगळा होतो..
त्या रेषेचे घाव मनातून जरा पुसा रे देवांनो !

इथला सैनिक, तिथला दुश्मन.. अर्थ बदलतो सारा..
रंगासोबत न्याय बदलतो.. असा कसा रे देवांनो ?

'तो' येण्याची पुन्हा नव्याने बोंब कशाला मारू ?
सांगून सांगून थकला माझा खुळा घसा रे देवांनो !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

रडू नका बापू..!

बकरी तुमची खतम केली..आम्ही कापू कापू
रडू नका बापू आता.. रडू नका बापू !

काळ आता बदलून गेला.. गणितं ही न्यारी
बापू तुम्ही समजून घ्याहो..खरी दुनियादारी !
माल दिसल्याशिवाय हल्ली..पिकत नाहीत शेते
कमिशनच्या विना बापू हसत नाहीत नेते !
गब्बर झालेत हपापाचा माल ढापू ढापू !
रडू नका बापू..आता रडू नका बापू !!

बघा बघा बापू कुठे निघाला जमाना
चरखा सोडा , पंचा सोडा..'हायटेक' व्हाना !
काहीतरी करू बापू..हुशारीने वागू
सरकारकडे तुमच्यासाठी कोळसा खदान मागू !
तुम्ही फक्त हो म्हणा..मिळून नोटा छापू..
रडू नका बापू असे..रडू नका बापू !



कवी - ज्ञानेश वाकुडकर

'पाली','मुंग्या' आणि 'आपण'..!

मेघांचे फसवे वादे.. हा फसवा फसवा वारा
हा पाऊस खोटा खोटा .. ह्या फसव्या फसव्या धारा
ही बंजर बंजर राने.. ही पंजर पंजर पाने
मातीच्या गर्भामध्ये.. पाण्याविन कुजले दाणे
सुकली धरणे, ठणठण विहिरी.. अजून फोडती टाहो
'पालींच्या' मुतण्याला मी..पाऊस म्हणावा काहो?

ही संदूक संदूक सत्ता..हे बंदूक बंदूक नेते
'द्यूत' नाही खेळलो तरीही.. 'शकुनी'च अजूनही जेते!
मग अवती भवती भिंती.. ह्या सवती सवती भिंती
एखादी तुटता तुटता .. डझनानी उगवती भिंती!
घरात भिंती, ऊरात भिंती..अंगण शाबूत राहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?

ह्या भजल्या भिजल्या 'मुंग्या'..ह्या विझल्या विझल्या 'मुंग्या'
प्रलयाच्या असल्या वेळी.. ह्या घोरत निजल्या 'मुंग्या'
ह्या टपल्या टपल्या 'पाली'..ह्या लपल्या लपल्या 'पाली'
भिंतीवर फोटो मधुनी.. ह्या आम्हीच जपल्या 'पाली'
'मुंगी' 'मुंगी' पुन्हा जागवू ..सोबत माझ्या याहो
पालींच्या मुतण्याला मी .. पाऊस म्हणावा काहो?




कवी - ज्ञानेश वाकुडकर

विसरत चाललेलं बालपण...


उंच उंच इमारतीत हरवलेलं बालपण...
पुस्तकांच्या बोझा खाली दाबलेलं बालपण...
मैदाना पेक्षा जास्त,
कॉम्पुटर मध्येच गुंतलेलं बालपण...
अन हळू हळू,
नात्यान पासून दूर चाललेलं बालपण...

समुद्र किनारी बुडणारा तो सूर्य न पाहिलेलं बालपण...
मित्रांच्या खांद्यावर डोकं ठेवून न बसलेलं बालपण...
मित्रांमध्ये कधीच न रमलेल बालपण...
अन पडत्या त्या पाऊसात,
त्यांच्याच बरोबर,
कधीही न खेळलेलं बालपण...

सार्यांच्याच अपेक्षा ऐकत आलेलं बालपण...
अपेक्षांन खालीच दाबत चाललेलं बालपण...
आयुष्याच्या खड्डतर वाटेवर, एकटच पडलेलं बालपण...
अन ह्या सार्यान मध्ये...
स्वःताच स्वतःला ,
विसरत चाललेलं बालपण...
स्वताःच स्वतःला ,
विसरत...
... चाललेलं...
... बालपण ...


कवी - ह्रषिकेश व्हटकर

हे लाघवी खुलासे..

हे लाघवी खुलासे..आले तुझे थव्याने..
देतेस का कबुली..पुन्हा अशी नव्याने ?

घडले असेल काही..अंधार जाणतो ना..
दावू नये हुशारी..बेकार काजव्याने !

हंगाम पेरण्याचा होता कुठे परंतू..
आधीच चिंच खावी का गे तुझ्या मनाने ?

साधेच बोलतो मी..त्याचाच 'वेद' होतो..
समजेल ना तुलाही..सारे क्रमाक्रमाने !

आहे तसे असू दे..होते तसे घडू दे..
हा श्वास चालतो का..तुझिया मनाप्रमाणे ?
 
 
कवी - ज्ञानेश वाकुडकर

शेवटी...!

'हेच' चाले पहा शेवटी..
'तेच' झाले पहा शेवटी !

सभ्य मी, संत मी, चांगला..
लोक 'साले' पहा शेवटी !

शब्दकोशात नाही मजा..
हे कळाले पहा शेवटी !

ज्या घरासाठि भांडायचो..
ते जळाले पहा शेवटी !

शेवटी काय सारे 'झिरो'..
'ते' म्हणाले पहा शेवटी !

कैकदा मी मला पेरले..
पिक आले पहा शेवटी !


कवी - ज्ञानेश वाकुडकर

अहवाल..!

हे हळूच किलकिलती ..झोपेचे दरवाजे..
हा श्वास म्हणावा की..आभास तुझे ताजे ?

उजवे, डावे, मागे..सारेच बुरुज गेले..
किल्ल्यात फितुरीचे हुंकार कसे वाजे ?

हे युद्ध कुणी जिंको..हे युद्ध कुणी हारो..
कानून तुझा चाले..आम्ही कसले राजे ?

सारेच तुझे आहे..अहवाल पहा ताजा..
जोडून तुझ्यापुढती..बघ नाव दिसे माझे !

आभाळ उडाले का ? वाराच तसा आला..
रेषेतून जगण्याचा..इतिहास कुठे गाजे ?

झाले ते झाले ना..तू लोड नको घेवू..
मुर्खाला सांग जरा..का गाल तुझा लाजे..?


कवी - ज्ञानेश वाकुडकर

डोळे

तिची सोनियाची काया..
तिचं लाजाळूच झाड..
याचे आतुरले डोळे..
तिची खुलेना कवाडं !

तिच्या देहाला कुंपण..
याचे देहभर डोळे..
तिच्या श्रावणाच्यासाठी..
याच्या देहाचे उन्हाळे..!

जीव नदीकाठी त्याचा..
तहानला सोडू नये..
तिच्या धारेला जगाने..
उगा फाटे फोडू नये !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

मी गाणे म्हणू का?

एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर प्रवचन ऐकण्यास जात असे, पण 'सू..' आली की, तो जोरजोरात ओरडायचा. त्यामुळे इतर लोक त्या बाईंवर रागवत असत.

एकदिवस त्या बाईने मुलास युक्ती सांगितली. की तुला 'सू..' आली की तू मला म्हण 'आई मी गाणे म्हणू का?' दुसर्‍या दिवशी त्याने तसे केले. लोक म्हणाले, बाई इथे प्रवचन सुरू आहे, त्याला बाहेर घेऊन जा.

एकदा तो मुलगा आपल्या बाबांबरोबर परगावी गेला. रात्री सर्व लोक झोपले आणि मुलास 'सू..' आली. तो वडिलांना म्हणाला, बाबा.. बाबा.. मी गाणे म्हणू का?

वडील म्हणाले, अरे सगळे लोक झोपले आहेत. तुला म्हणायचे असेल तर माझ्या कानात म्हण...मुलाने त्यांच्या काणात काय केले असेल हे तुम्हाला आता सांगण्याची आवशक्यता आहे काय?

चांदणे अंथरू..

चांदणे अंथरू..चांदणे पांघरू..
देह माझा तुझा..चांदण्याने भरू !

आज दोघामधे ही हवाही नको..
बांध दोघातले दूर सारे करू !

पाहू दे, वेचू दे हा अजिंठा तुझा..
शोधता शोधता..तू नको थरथरू !

धबधब्याला कशी झेलते ही दरी..
कोसळू कोसळू अन पुन्हा सावरू !

दूर फेकून दे सर्व पाने फुले..
श्वास आता जरा रोखुनीया धरू !

ठेव राखुनिया सर्व खाणाखुणा..
निर्मितीचे उद्याच्या पुरावे ठरू !


कवी :- ज्ञानेश वाकुडकर

यक्षरात्र

पाण्यासारखेच, वाहते सदाचे
आयुष्य नावाचे, खुळे गाणे

किनारे धरुन, अखंड चालला
दुःखांचा काफिला, मस्तपणे

सुखाचेही तळ, जाताना घासून
अस्तित्वाची खूण, कळे मला

दिव्यापरी आता, प्राक्तन जोडून
प्रवाही सोडून, श्‍वास दिला

आणि रंगगर्द, क्षितिज पेटले
रात्री उजाडले, क्षणमात्र

तमाने टाकली प्रकाशाची कात
झाली काळजात, यक्षरात्र !


कवियत्री - अरुणा ढेरे

लेणी

समोर, धुकं पांघरुन,
कोवळं ऊन खात बसलेला हा लोहगड
रोज पहातो माझ्याकडे रोखून,
आणि नजरेनंच विचारतो, विसरलीस ?
आपणच उत्तर देतो, हो विसरणारच.
मी पुटपुटते, दगड शुद्‍ध दगड !
असं सगळं विसरता येत असतं,
तर तुझी ही भाषा कळली असती का मला ?
अन हे भोळं मन भळभळलं असतं का असं
वेळीअवेळी ? तुझ्या शेजारीच लेणी आहेत की !
मग तुला कसं कळत नाही वेड्या !
की माणसाच्याही मनात
काही सुंदर लेणी असतात म्हणून !


कवियत्री - पद्मा गोळे

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून.
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून.

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा आळता लावलेली तुझी पावले.
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता.

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न कण
प्रेमाच्या चेहर्‍यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दुःखाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढं होऊन तुझ्या पापणीवरच शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.

राधे, पुरुष असाही असतो !


कवियत्री - अरुणा ढेरे

खंत नाही,खेद नाही ....

नजरेतून श्वासात,
श्वासातून हृदयात,
हृदयातून स्पंदनात,
स्पंदनातून नसानसात
उतरलीस तू तरी तुला
खंत नाही,खेद नाही ....

तुझं गोड गोड बोलणं ,
पद्धतशीर विसरणं,
आशेला तडा देणं ,
हृदयास घायाळ करणं,
जशी तू त्या गावचीच नाही,
खंत नाही,खेद नाही ....

डोळ्यांनी तुला पहावं,
कानांनी तुला ऐकावं,
ओठांनी तुज गुणगुणावं,
मनाने विरघळून जावं
तुला याचा गंधच नाही,
खंत नाही,खेद नाही ....


कवी - अरविंद

श्रावणमासी - विडंबन


श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे.

भवती बघता भाविक नवरे पत्नी भयाने मौनव्रती
“श्रावण-श्रावण” जपता जपता गलितगात्र हे महारथी

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो आठवे-
“सध्या श्रावण!” हळूच पाउल घराकडे अपुल्याच वळे.

उठती बसती कामे करती, अंगी नाही त्राण पहा
सर्व जगावर हाय! पसरले विषण्णतेचे रुप महा.

“गलास” साधा फुटता भासे, न पिता ही कशी चढे?
श्रावण म्हणूनी त्राण न हाती, हातामधुनी खाली पडे.

बडबड करुनी उगीच आपुले, दिवस जुने ते आठवती
सुंदर साकी, मैफल, मस्ती, मनात अपुल्या साठवती.

“उदास”* गझला पडता कानी, पाउल शोधत वाट फिरे
परि आठवता श्रावणमहिमा, मुकाट मंदिरात शिरे.

वाट असे ही जरी नित्याची कोण बेवडा अडखळला?
दारी आपुल्या अचूक येऊनी कोण नेमका गोंधळला?

पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.

शून्यामध्ये लावून डोळे बसून राहे तासन्‌तास
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावा, भुका-तहाना श्रावणमास.

कवी - (हालकवी) अविनाश ओगले

मातीची दर्पोक्ति

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात
वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात
पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
पाहून हासु ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति
त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !


कवी - कुसुमाग्रज
 कवितासंग्रह - विशाखा

सरणार कधी रण

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी


कवी - कुसुमाग्रज

माझे जीवनगाणे

माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे

कवी - कुसुमाग्रज

बायरन

वेगे आदळती प्रमत्त गिरिशा लाटा किनाऱ्यावरी
पाषाणी फुटती पिसूनि कणिका लक्षावधी अम्बरी
आणी झिंगुनि धावती पुनरपी झुंजावया मागुनी
भासे वादळ भव्य उग्र असले त्या गर्व-गीतातुनी !

अभ्रांच्या शकलांमधून तळपे, भासे जसा भास्कर
शब्दाआडुनही त्वदंतर दिसे उन्मत्त अन् चंचल !
केव्हा बद्ध सुपर्ण पंख उधळी तोडावया अर्गल
केव्हा नाजुक पाकळ्यात अडके बागेतला तस्कर !

काळाच्या कवि, वालुकेवरि तुवा जी रोवली पावले
नाही दर्शविण्यास शक्त पथ ती-आणी नसो ती तरी
आहे आग जगातली जरि नसे संगीत स्वर्गातले
तत्त्वांचा बडिवार नाहि अथवा ना गूढशी माधुरी.

जेथे स्थण्डिल मानसी धगधगे विच्छिन्न मूर्तीपुढे
तेथे शिंपिल शारदा तव परी शीतोदकाचे सडे !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

दूर मनो~यात

वादळला हा जीवनसागर - अवसेची रात
पाण्यावर गडाबडा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी आभ्रांच्या गर्दित गुदमरल्या तारा
सुडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळराती
वावटळीतिल पिसांप्रमाणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बंदरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात

कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

आगगाडी आणि जमीन

शिरवाडकरांची ही कविता रुपकात्मक आहे. दलित-वर्गावर होणाऱ्या अत्याचारांचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे हे चित्रण आहे.


नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.

आगगाडी मात्र स्वतःच्या मस्तीत गुर्मित म्हणते -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

या उन्मत्त गाडीचे बोल ऐकून जमीन सूडाने पेटून उठते.

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

जमीनीच्या ताकदीपुढे गाडीचे काहीही चालले नाही -

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

अनंत

एकदा ऐकले
काहींसें असें
असीम अनंत
विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा
इवला कण
त्यांतला आशिया
भारत त्यांत
छोट्याशा शहरीं
छोट्या घरांत
घेऊन आडोसा
कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही
अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी
जळ्मट जाळी
बांधून राहती
कीटक कोळी
तैशीच सारी ही
संसाररीती
आणिक तरीही
अहंता किती?
परंतु वाटलें
खरें का सारें?
क्षुद्र या देहांत
जाणीव आहे
जिच्यात जगाची
राणीव राहे!
कांचेच्या गोलांत
बारीक तात
ओतीत रात्रीत
प्रकाशधारा
तशीच माझ्या या
दिव्याची वात
पाहते दूरच्या
अपारतेंत!
अथवा नुरलें
वेगळेंपण
अनंत काही जें
त्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत
वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत
ताऱ्यांचे पाणीं
वसंतवैभव
उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....
प्रेरणा यांतून
सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें
अंतरी झरे
त्यानेच माझिया
करी हो दान
गणावे कसे हें
क्षुद्र वा सान?


कवी :- कुसुमाग्रज

निरोप

(  ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!


कवी :- कुसुमाग्रज

स्वगत

शब्द - जीवनाची अपत्ये -
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन

मृत्यूसारखेच अथांग
अस्पष्ट, अनाकार
सारे आकाश व्यापून
अज्ञाताच्या प्रदेशाकडे
प्रवाहात जाणा-या
स्वरहीन संथ मेघमालेचे
मौन


कवी  - कुसुमाग्रज

हा चंद्र

या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते
त्या चंद्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी माकड,मानव, कूत्री यांना जाता येते

या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हा ही नभाचा मानकरी पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही

नटखट मोठा ढोंगी सोंगी, लिंबोणीच्या झाडामागे कधी लपतो मुलाप्रमाणे
पीन स्तनांच्या दरेत केव्हा चुरुन जातो फुलाप्रमणे

भग्न मंदीरावरी केधवा बृहस्पतिसम करतो चिंतन
कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून

तट घुमटावर केव्हा चढतो, कधी विदुषक पाणवठ्यावर घसरुन पडतो
कुठे घराच्या कौलारावरुनी उतरुन खाली शेजेवरती
तिथे कुणाची कमल पापणी हळूच उघडून नयनी शिरतो
कुठे कुणाच्या मूक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊनी जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो

अशा बिलंदर अनंतफंदी या चंद्राचे त्या चन्द्राशी कुठले नाते?
त्या चन्द्रावर अंतरिक्ष-यानात बसूनी शास्त्रज्ञांना जाता येते
रसीक मनांना या चंद्राला पळ्भर केव्हा डोळ्यात वा जळात केवळ धरता येते

कवी  - कुसुमाग्रज

निर्मिती

कधी पांघरावे मीही
माझा रक्ताचे प्रपात,
गूढ़ घावांचे किनारे
मीच तोडावे वेगात..

असा आंधळा आवेग
मीच टाळावी बंधने ,
विश्वनिर्मितीचा रात्री
मला छेदावे श्रद्धेने .

अशा लाघवी क्षणांना
माझा अहंतेचे टोक.
शब्द फुटण्याचा आधी
ऊर दुभंगते हाक.........


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

ती गेली तेव्हा

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता

तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता

ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता

हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता


गीत : ग्रेस
संगीत : पं. ह्रदयनाथ मंगेशकर
स्वर : पं. ह्रदयनाथ मंगेशकर
राग: गोरख कल्याण

बया

दूर डोंगरांची घळ
तिथे आहे शिवालय ;
अशा भासाने गोंदते
बया बदकांचे पाय …

देवबाभलीचा काटा
त्याला हळदीचा डंख ;
पायी स्वस्तिक कोरता
हाती बदकांचे पंख !

डबक्यातून बदके
येती चालत गावाला ;
तशी स्वस्तिकांची माळ
झोंबे शिवाच्या पायाला …

बया ! काय म्हणायचे ?
नाव तिचे ना विरक्ती ?
सत्य मांडताना बाई
थोडी लागते आसक्ती !

तरी सुगाव्याचे भूत
बसे तिच्या मानगुटी ;
शिवालयातील घंटा !
नाद तिच्याही ललाटी …


कवी - ग्रेस 

राधेस जो मिळाला

स्वर्गातून आणलेला प्राजक्त सत्यभामेने
एकदा असाच बळजोरीने
आपल्या अंगणात लावून घेतला
जीवाला आलेलं पांगळेपण
हव्यासपूर्तीच्या कुबडीने सावरण्यासाठी
पण ते स्वर्गीय रोप देखील हिरीरीने फोफावले
आणि भिंतीवरून झुकून
रुक्मिणीच्याअंगणात फुले ढाळू लागले
सत्यभामेचा चडफङाट तर झालाच
पण रुक्मिणीलाही झाडाचे मूळ
मिळाले नाही ते नाहीच
स्वर्गीय वृक्षाच्या अवयवांचे पृथ्थकरण करून
कृष्णाने त्या पांगळ्या बायकांना एक खेळ देऊन टाकला
आणि स्वत: मोकळा झाला
प्रेमापेक्षा प्रेमाच्या खुणाच शिरोधार्य मानल्या दोघींनी
कृष्णाने हे पुरते ओळखले असणार
म्हणूनच त्याने या विकृत मत्सराचे प्रतीक अंगणात खोचून दिले!
राधेसाठी त्यानी असला वृक्ष कधीच आणला नसता
कारण राधा स्वत:च तर कृष्ण-कळी होती
तिचा बहर वेचलेल्या हातांनी तिलाच कसे श्रुंगारणार ?
तिच्या आत्मदंग बागेत प्रतीक-प्राजक्त कसे काय रुजणार?
कृष्णाने एक स्वर्गीय रोप लावले
आणि अष्टनाईकांच्याही पूर्वीची ती अल्लड पोरगी
राधा हीच शेवटी कृष्ण प्रीतीचे प्रतीक होऊन बसली
असतील लाख कृष्ण कालिंदीच्या ताटाला
राधेस जो मिळाला तो एकटाच उरला!

कवी - ग्रेस

जीव राखता राखता

जीव राखता राखता तुला हाताशी घेईन
झडझडीचा पाऊस डोळे भरून पाहीन

तुझे सोडवीन केस त्यांचा बांधीन आंबाडा
देहझडल्या हातांनी वर ठेवीन केवडा

तुझे मेघमोर नेसू तुला असे नेसवीन
अंग पडेल उघडे तिथे गवाक्ष बांधीन

दूध पान्ह्यात वाहत्या तुझ्या बाळांच्या स्तनांना
दृष्ट काढल्या वेळेचा मग घालीन उखाना

तुझे रूप थकलेले उभे राहता दाराशी
तुझा पदर धरून मागे येईन उपाशी

मुक्या बाहुलीचा खेळ देवघरात मांडीन
नथ डोळ्यांशी येताना निरांजनात तेवीन

तुझ्या चिमण्यांची जेव्हा घरी मळभ येईल
वळचणीचा पाऊस माझा सोयरा होईल

भाळी शिशिराची फुले अंगी मोतियांचा जोग
तुझ्या पापण्यांच्या काठी मला पहाटेची जाग

नाही दु: खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल


कवी - ग्रेस

पाठीवर बाहुलीच्या

पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोर्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार …..

प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?

पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज

न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली

जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख

पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली


कवी  - ग्रेस

ही माझी प्रीत निराळी

ही माझी प्रीत निराळी
संध्येचे शामल पाणी
दु: खाच्या दंतकथेला
डोहातून बुडवून आणी

हाताने दान कराया
पोकळीत भरला रंग
तृष्णेचे तीर्थ उचलतो
रतीरंगातील नि: संग

शपथेवर मज आवडती
गाईचे डोळे व्याकूळ
घनगंभीर जलधीचेही
असणार कुठेतरी मूळ

आकाश भाकिते माझी
नक्षत्र ओळ ही दंग
देठास तोडतानाही
रडले न फूलांचे अंग

सवयीचा परिसर इवला
घे कुशीत शिंदळवारा
देहाची वितळण सारी
सोन्याहून लख्ख शहारा

तू खिन्न कशाने होशी
या अपूर्व संध्याकाळी
स्तनभाराने हृदयाला कधी
दुखविल का वनमाळी


कवी - ग्रेस

वाट

तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे,
ती ही अशा कातर वेळी,

उदाच्या नादलहरी सारख्या
संधी प्रकाशात…

माझी सर्व कंपने इवल्याशा ओंजळीत
जमा होतात….

अशा वेळी वाटेकडे पाहाणे ,
सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म
लकेरीत तरंगत जाणे;
जसे काळोखातही ऎकू यावे दूरच्या
झऱ्याचे वहाणे….

मी पहतो झाडांकडे , पहाडांकडे,
तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो…..

आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
शहाणे डोळे, हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात…


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा

पांढर्‍या शुभ्र हत्तींचा , रानातून कळप निघाला
संपूर्ण गर्द शोकाच्या गर्तेतही मिसळून गेला

त्या गुढ उतरत्या मशिदी , पक्ष्यांनी गजबजलेल्या
कल्लोळ पिसांचा उडत्या पंखात लपेटुन बुडाल्या

पांढर्‍या शुभ्र हत्तींनी मग दोंगर उचलून धरले,
अन् तसे काळजा खाली अस्तींचे झुंबर फुटले

पांढरे शुभ्र हत्ती , अंधारबनातून गेले,
ते जिथे थांबले होते, ते वृक्षही पांढरे झाले


कवी - ग्रेस
कवितासंग्रह - संध्याकाळच्या कविता

मांडणी

दु:खभोर संधिकाल सूर्यबिम्ब सागरात
रंग केशरातला जळे हवेत, गारव्यात

नभात चांदणी सले हले दिठीत चंद्रही,
वृत्तभार शब्दही फुलातला सुगंधही

गाव चार पाउलेच पार देउळातले,
कृतज्ञ सांजवातीला सुजाण सत्य पावले!

झाड झाड पाखरात, पाखरात दंग झाड,
झर्‍यात विर्घळे जसा सच्छिद्र दूरचा पहाड.

एक हाक एक धाक एक मृत्युचा निनाद
स्वप्न सांधती तुझे जुने नवे तुझे प्रवाद...

राहुटीत या इथे समुद्र सर्व झाकतो,
अलौकिकात सांडतो नि लौकिकात मांडतो...

निळी सुदीर्घ शांतता तुझ्यातलीच आर्तता
तुझ्या कुशीत जन्मते तुझी जुनीच देवता...

शिल्प हेच देखणे तुझ्याच अस्थी तासणे
तुझ्या नभातलेच दे मला विदग्ध चांदणे....


कवी - ग्रेस

मनातलं काही

मनातलं काही कागदावर यावं
असं काही लिहावं
जे परत फिरुनी मनातंच भिनावं

मनातलं काही ओठांवरही यावं
बोल असे उमटावे
जसे मातीत ओल्या अंकुर नवे रुजावे

मनातले काही डोळ्यांतही उतरावे
भाव काही असे दाटावेत
की त्यात सारे विरघळुन जावे

मनातलं काही मनावरही घ्यावं
मनासारखं सारं होऊ दयावं
आणि आपण फक्त पहात रहावं


कवि - कविकुमार

समुद्राला पाहून

त्या समुद्राला पाहून अस वाटत,
कि त्यातच जाऊन रहाव...
लाटांन बरोबर मैत्री करून,
त्यांच्याच बरोबर फिरावं...
दिसला एखादा किनारा,
... तर त्याला जाऊन धड्काव ...
अन त्या किनार्याला पाहून,
शांत पणे परतावं...

मावळता तो सूर्य, रोज जवळून पहाव..
काळोख्या राती,
ते टीम टीमते चांदणे पाहून हसावं...
वादळी पाऊसात,
बेचन झालले मन उफाणून शांत कराव...
अन तिझ्याच शोधात जग भर...
एक लाट म्हणून फिरव...

खरच...
त्या समुद्राला पाहून अस वाटत,
कि त्यातच...
एक लाट म्हणून जगाव,
अन कोणाच्या हि नकळत,
त्यातच संपून जाव...
त्यातच संपून जाव...


कवि - ह्रषिकेश व्हटकर..

माझे पहिले प्रेम

माझे पहिले प्रेम म्हनजे
जनु पोरकटपनाच होता
पन त्या दिवसामधला
त्याचा रंगच भारी होता

प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती
पन त्या वाटेवर तेव्हा
गर्दी थोडी जास्तच होती

पहिल्या वेळेस पाहिले
तेव्हाच ती मनात भरुन गेली
हिच्यापेक्शा दुसरी सुंदर नसेल
अशी शंका येउन गेली

काही दिवसातच दोघांची
नजरानजर झाली
तिच्या एका नजरेने
आमची छाती धडकुन गेली

काही दिवसांनी ही गोष्ट
सगळी कडे पसरत गेली
मित्र म्हने याला अचानक
प्रेमाची हुकी कशी आली ?

रात्र रात्र तिच्या आठवनीत
आम्ही प्रेमपत्रे लिहित होतो
होकार मिळेल की नकार
एवढाच फ़क्त विचार करीत होतो

करुन धाडस जेव्हा तीला
आम्ही प्रेमपत्र दिले
मित्रानी तेव्हा सांगितले
आता तुझे नही खरे

तेव्हा कळले की हीचे आधीच
बाहेर दहा प्रकरन आहेत
मुलांना फ़िरवन्याचे हिचे
तंत्र जुने आहे

आम्हाला आवडलेली रानी
नेहमी दुसरय़ाचीच असते
आमच्या महालात रानीची जागा
नेहमी अशीच खाली असते
गणेश उत्सव संपला आणि बाप्पा कैलास पर्वतावर पोचले
पार्वती मातेनी विचारलं- काय कशी झाली पृथ्वी सहल?
गणपती: "मुझपे एक एहसान करना, कि मुझपे कूच भी एहसान मत करना!"
पार्वती: अरे हे काय बोलतो आहेस?
गणपती: आया रे आया बॊडीगार्ड
... ... रिद्धी सिद्धी: अरे काय हे????
गणपती: १२ महिने मे १२ तरीकेसे... ढिंका चिका ढिंका चिका रे ए ए ए....
शंकर: चायला हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राह्य्ली..!!!

होता वसंत, होता सुमनात वास बाकी

होता वसंत, होता सुमनात वास बाकी
कोणीच भृंग नव्हता पण आसपास बाकी

येईल परतुनी ती, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच श्वास बाकी

का वागलो असा मी? का वागली तशी ती?
हातात फक्त आहे करणे कयास बाकी

ओठांवरी स्मिताची उमटेल खास रेषा
आहे परंतु थोडे होणे उदास बाकी

सुटलेत प्रश्न काही अन्‌ सोडलेत काही
उरला तिचा नि माझा एकच समास बाकी

धुंडाळ नीट माझ्या पश्चात काव्य माझे
असतील काळजाचे अवशेष खास बाकी

अद्याप दूर आहे क्षितिजावरील वस्ती
अद्याप माणसाचा आहे प्रवास बाकी

म्हणुनीच बांधलेली आहेत देवळे की
आहे सहा रिपुंचा हृदयात वास बाकी

होईल नाव मोठे मेल्यावरी तुझेही
आहे मिलिंद सध्या अज्ञातवास बाकी


कवी - मिलिंद फणसे

होता खमंग, होता चकणाहि खास बाकी

 होता खमंग, होता चकणाहि खास बाकी
सारेच टुन्न होती पण आसपास बाकी

जाईन घरकुला मी, अद्याप आस बाकी
उरलेत मात्र आता थोडेच ग्लास बाकी

मी प्यायलो किती ते? उमजे मला न काही
हातात फक्त काजू करणे खलास बाकी!

फुटलेत पेग सारे अन्‌ फोडलेत काही
उरला तिथेच माझा 'रीगल शिवास' बाकी

धुंडाळ नीट डावा पुढला खिसाच माझा
अजूनी असेल तेथे 'चपटीच' खास बाकी

ओठांवरी तिच्याही घनघोर युद्ध भाषा
सांगू तिला कसे मी? करणे कयास बाकी

अद्याप दूर आहे घरचीच वाट माझ्या
अद्याप मारतो हा तोंडास 'वास' बाकी

म्हणुनीच बांधली का 'देशी दुकान धारा'
पिउनी विलायती ही होणेच लास बाकी

आहेच नाव खोटे, मेल्या तरी तुझेही
'रंगा' तुझाच आहे अज्ञातवास बाकी

चतुरंग

काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||धृ||

औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो हाती येवूदे धन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)

आतल्या खोलीत खोलीत

काळ्या मातीत मातीत चे विडंबन!!


आतल्या खोलीत खोलीत, टोळके बसते…
टोळके बसते… नि बसून यथेच्छ ढोसते!
कोणी बाटली काढतो, नि टोळके लाळ गाळते
लाळ गाळते… नि बसून यथेच्छ ढोसते!

गाडी झाडाशी लावून, धावून येतात काहीजण…
कसेबसे हो जमतात, बायकांची नजर चुकवून
एक अनोखे चैतन्य साऱ्यांच्या डोळ्यात दिसते…
डोळ्यात दिसते… नि बसून यथेच्छ ढोसते!
हे बबन्या रं, माझ्या दोस्ता रं, माझ्या पक्या रं माझ्या आहाSSSS… टिडिंग टिंग… टिडिंग टिंग…

बांगडा गरम करून, प्लेट लावतो बबन…
सिगरेटी फुकता फुकता, तिथे डोकावतो कोण
बबन्या गाऊन दाखवतो, नि टोळके कौतूक ऐकते…
कौतूक ऐकते… नि बसून यथेच्छ ढोसते!
हे बबन्या रं, माझ्या दोस्ता रं, माझ्या पक्या रं माझ्या आहाSSSS… टिडिंग टिंग… टिडिंग टिंग…
आतल्या खोलीत खोलीत, टोळके बसते…
टोळके बसते… नि बसून यथेच्छ ढोसते! टोळके बसते… टोळके बसते…

काळ्या पिशवीत पिशवीत

काळ्या मातीत मातीत चे विडंबन!

काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते

बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो

घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला
जिभे सरसती नाचे घोट जाताच पोटाला
तरतरी मना येते मती न्हाती धूती होते
रंगीत पान्याच्या वासाची चाहूल आवशीला जाते
भय जिवाला पडते वाट दोस्ताची लागते
दोस्त बॉटल झाकतो मी चकना लपवितो

दोस्ता र आता कलटी र आता पळूया र माझ्या राज्या

पानी खिडकीतन वोतून वाट गुत्त्याची चालूया
तिथे उधार चालेना नगद लागते
अन्ना शेट्टीच्या गूत्त्यात चाल 'पेया'च पूजन
तिथ डोलकर हालती जनू करती भजन
जवा रंगीत पान्यात सोन चांदी लकाकते
सोन चांदी लकाकते आस जिवाला लागते

चाले पानी-चकन्याचा पाठशिवनीचा खेळ
खुर्ची बूडाला लागेना झाला कसला हा गोंधळ
काळ्या टेबला खालन डोला सपान पाहतो
डोला सपान पाहतो अन्ना गालात हासतो
काटा लागतो जिवाला स्वप्न पान्यात सांडत
स्वप्न पान्यात सांडत दुकान अन्नाच चालत

`दसरा' साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास

 १. तिथी
         आश्विन शुद्ध दशमी

२. व्युत्पत्ती आणि अर्थ
         दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.

३. समानार्थी शब्द
अ. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत.

आ. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला 'नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस' असेही मानतात.'

४. इतिहास
अ. 'श्रीरामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्याला सिद्ध झाला. कुबेराने आपटा आणि शमी या वृक्षांवर सुवर्णांचा वर्षाव केला. कौत्साने केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. बाकीचे सुवर्ण प्रजाजनांनी नेले.'

आ. 'प्रभु श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या घटनांच्या संकेतामुळे या दिवसाला 'विजयादशमी' असे नाव मिळाले आहे.


इ. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरवसैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तो याच दिवशी.

ई. दसऱ्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.

उ. प्रारंभी दसरा सण एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात आणि दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथाही या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले. तसेच तो एक राजकीय स्वरूपाचा सणही ठरला.

५. महत्त्व
         दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.

६. सण साजरा करण्याची पद्धत
         या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

अ. सीमोल्लंघन
         अपराण्हकाली (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोल्लंघनासाठी जातात. जिथे शमीचा किंवा आपट्याचा वृक्ष असेल, तिथे थांबतात.

आ. शमीपूजन
         पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात.

 अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी श्रीरामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, श्रीरामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.

इ. आपट्याचे पूजन
          आपट्याची पूजा करायची असल्यास पुढील मंत्र म्हणतात -
अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर. नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

इ १. आपट्याची पाने सोने म्हणून देणे
         शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.

ई. अपराजितापूजन
         ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.
हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ।।
अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कटीत चकाकणारी सुवर्णमेखला आहे, अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो. काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.

उ. शस्त्रे आणि उपकरणे यांचे पूजन

          या दिवशी राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे आणि उपकरणे साफसूफ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
उ १. राजविधान
         दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.

७. लौकिक प्रथा
         काही घराण्यांतले नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.

कृषीविषयक लोकोत्सव
            `दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वहातात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्‍त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला.

श्रीराम व हनुमान तत्त्वे आणि क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा
             दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. . दसर्‍याला श्रीराम व हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्‍ती निर्माण होऊन श्रीरामाचे आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास मदत होते. दसर्‍याच्या दिवशी ब्रह्मांडात लाल (शक्‍तीरूपी) व तांबूस (दास्यभावातून निर्माण झालेल्या आशीर्वादरूपी लहरी) रंगांच्या स्प्रिंगसारख्या लहरी कार्यरत अवस्थेत असतात. या लहरींमुळे जिवाची आत्मशक्‍ती जागृत होण्यास मदत होऊन जिवाच्या नेतृत्वगुणामध्ये वाढ होते.


आपट्याच्या पानांचे महत्त्व


आपट्याचे पान
     'दश-हरा' म्हणजे वाईटाचा अंत…….अश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी नवरात्रीनंतर येणारा हा दहावा दिवस………याच दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून याला 'विजयादशमी' असेही म्हणतात.
         दसर्‍याच्या दिवशी आपट्याची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे. आपट्याच्या पानांचे महत्त्व येथे देत आहोत.
अ. सर्व जिवांत प्रेमभाव निर्माण व्हावा, यासाठी या दिवशी सर्व जीव एकमेकांना आपट्याची पाने वाटतात. आपट्याच्या पानात ईश्‍वरी तत्त्व  आकर्षून घेण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात शिवतत्त्वही जास्त प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे त्या दिवशी जिवाला आपोआप शिवाचीही शक्‍ती मिळते.
आ. आपट्याच्या पानात श्रीरामतत्त्व १० टक्के प्रमाणात असते.




संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ 'सण, धार्मिक उत्सव आणि व्रते'
साभार - बालसंस्कार डॉट कॉम

हरवलेले दिवस

हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा,
जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,

नशिबानेच एकदा पुन्हा कुठे तरी भेटू,
आठवणीला एकदा एकत्र मिळून वेचू,

पण तेव्हा सर्व काही बदलेला असेल,
कोणीतरी बोलावताय म्हणून भेट लवकर सुटेल,

लांब पर्यंत चालणाऱ्या गप्पा-गोष्टी राहणार नाहीत,
आठवणीचा हा झ्हारा मग त्या दिशेने वाहणार नाही,

आज सोबत आहोत वाटेल तितका आनंदी जागून घ्या,
जीवन भर पुरतील अश्या आठवणी जपून घ्या..

विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस

कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद.

अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव.
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.


कवि - नारायण सुर्वे

अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही …

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला 'शब्द' तिला आठवायचा नाही ..!!

तेव्हा एक कर !

जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन
तेव्हा एक कर
तू निःशंकपणे डोळे पूस.
ठीकच आहे चार दिवस-
उर धपापेल , जीव गुदमरेल.
उतू जणारे हुंदके आवर ,
कढ आवर.
उगिचच चीर वेदनेच्या नादी लगू नकोस
खुशाल , खुशाल तुला आवदेल असे एक घर कर
मला स्मरून कर ,
हवे अत्र मला विस्मरून कर.

बेतून दिलेले आयुष्य


बेतून दिलेले आयुष्य ; जन्मलो तेव्हा -
प्रकाशही तसाच बेतलेला
बेतलेलेच बोलणे बोललो . कुरकुरत
बेतलेल्याच रस्त्याने चाललो ; परतलो
बेतल्या खोलीत ; बेतलेलेच जगलो
म्हणतात ! बेतलेल्याच रस्त्याने गेलात तर
स्वर्ग मिळेल . बेतलेल्याच चार खांबात

माझे विद्यापीठ

(कविवर्य नारायण सुर्वे यांची ' माझे विद्यापीठ ' ही कविता म्हणजे त्यांचे आत्मचरित्रच. त्यांच्या या शब्दाशब्दातून ती वेदना सारखी ठसठसत राहते, कामगार नावाची गोष्ट सांगत राहते.)


ना घर होते , ना गणगोत , चालेन तेवढी पायाखालची जमीन होती
दुकानांचे आडोसे होते , मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती.

अशा देण्यात आलेल्या उठवळ आयुष्याची ऊठबस करता करता....
टोपलीखाली माझ्यासह जग झाकीत दररोज अंधार येत जात होता.

मोजलेत सर्व खांब ह्या रस्त्यांचे , वाचली पाट्यांवरची बाराखडी
व्यवहाराच्या वजाबाकीत पाहिलेत ; हातचे राखून कित्येक मारलेले गडी.

हे जातीजातींत बाटलेले वाडे , वस्त्या , दारावरचे तांबडे नंबरी दिवे
सायंकाळी मध्यभागी असलेल्या चिडियाघराभोवती घोटाळणारे गोंगाटांचे थवे.

अशा तांबलेल्या , भाकरीसाठी करपलेल्या , उदास वांदेवाडीच्या वस्तीत
टांगे येत होते , घोडे लोळण घेत होते , उभा होतो नालीचा खोका सांभाळीत.

" ले , पकड रस्सी-हां-खेच , डरता है ? क्या बम्मनका बेटा है रे तू साले
मजदूर है अपन ; पकड घोडे को ; हां ; यह , वाह रे मेरे छोटे नालवाले. "

याकुब नालबंदवाला हसे , गडगडे. पत्रीवाला घोडा धूळ झटकीत उभा होई
" अपनेको कालाकांडी. तेरेको जलेबी खा. " म्हणत दुसरा अश्व लोळवला जाई.

याकुब मेला दंग्यात , नव्हते नाते ; तरीही माझ्या डोळ्याचे पाणी खळले नाही
उचलले नाही प्रेत तेव्हा ' मिलाद-कलमा '; च्या गजरात मिसळल्याशिवाय राहिलो नाही.

त्याच दिवशी मनाच्या एका को-या पानावर लिहले , " हे नारायणा "
अशा नंग्याच्या दुनियेत चालायची वाट ; लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा. "

भेटला हरेक रंगात माणूस , पिता , मित्र , कधी नागवणारा होईन
रटरटत्या उन्हाच्या डांबरी तव्यावर घेतलेत पायाचे तळवे होरपळवून.

तरी का कोण जाणे ! माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटलाच नाही
आयुष्य पोथीची उलटली सदतीस पाने ; वाटते , अजून काही पाहिलेच नाही ,

नाही सापडला खरा माणूस ; मीही तरी मला अजून कुठे पुरता सापडलो ?
सदंतीस जिने चढून उतरताना , मीही नाही का कैकदा गोंधळून झापडलो ?

आयुष्य दिसायला पुस्तकाच्या कव्हरासारखे गोंडस , गुटगुटीत , बाळसेदार.
आतः खाटकाने हारीने मांडावीत सोललेली धडे , असे ओळीवर टांगलेले उच्चार

जीवनाचा अर्थ दरेक सांगीत मिटवत जातो स्वतःला स्वतःच्याच कोशात
पेन्शनरासारख्या स्मृती उजाळीत उगीचच हिंडतो कधी वाळूत कधी रामबागेत

हे सगळे पाहून आजही वाटते , " हे नारायणा , आपण कसे हेलकावतच राहिलो. '
चुकचुकतो कधी जीव ; वाटते , ह्या युगाच्या हातून नाहकच मारले गेलो.

थोडासा रक्ताला हुकूम करायचा होता , का आवरला म्यानावरचा हात ,
का नाही घेतले झोकवून स्वतःला , जसे झोकतो फायरमन फावडे इंजिनात.

विचार करतो गतगोष्टींचा , काजळी कुरतडीत जणू जळत राहावा दिवा एक
उध्वस्त नगरात काहीसे हरवलेले शोधीत हिंडावा परतलेला सैनिक.

किती वाचलेत चेहरे , किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात
इथे सत्य एक अनुभव , बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.

खूप सोयरीक करोत आता ग्रंथाची ; वाटते तेही आपणासारखेच बाटगे निघाले
हवे होते थोडे परिचारिकेसम , कामगारासम निर्मितिक्षम. पण दुबळेच निघाले.

जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते ; भरताना तेही बापडे दडतील
स्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

वाढले म्हणतात पृथ्वीचे वय , संस्कृतीचेही ; फक्त वयेच वाढत गेली सर्वांची
छान झाले ; आम्हीही वाढतो आहोत नकाशावर. गफलत खपवीत जुळा-यांची.

ह्या कथाः कढ आलेल्या भाताने अलगद झाकण उचलावे तसा उचलतात
रात्रभर उबळणा-या अस्थम्यासारख्या अख्खा जीव हल्लक करुन सोडतात.

कळले नाहीः तेव्हा याकुब का मेला ? का मणामणाच्या खोड्यात आफ्रिकन कोंडला ?
का चंद्राच्या पुढ्यातला एकुलता पोर युध्दाच्या गिधाडाने अल्लद उचलला ?

चंद्रा नायकीण ; शेजारीण , केसांत कापसाचे पुंजके माळून घराकडे परतणारी
पंखे काढलेल्या केसांवरुन कापसाखळीची सोनसरी झुलपावरुन झुलणारी

अनपड. रोजच विकत घेऊ पेपर , रोजच कंदिलाच्या उजेडात वाचायची सक्ती होई
" खडे आसा रे माझो झील ; ह्या मेरेर का त्या रे ," भक्तिभावाने विचारीत जाई.

कितीतरी नकाशांचे कपटे कापून ठेवले होते तिने , ; जगाचा भूगोल होता जवळ
भिरभिरायची स्टेशनांच्या फलाटावरुन , बराकीवरुन , मलाच कुशीत ओढी जवळ.

मेली ती ; अश्रूंचे दगड झालेत. चटके शांतवून कोडगे झाले आहे मन
बसतो त्यांच्या पायरीवर जाऊन , जसे ऊन. ऊठताना ऊठवत नाही नाती सोडून.

निळ्या छताखाली नांगरुन ठेवल्या होत्या साहेबांच्या बोटी
दुखत होत्या खलाशांच्या माल चढवून उतरुन पाठी

वरुन शिव्यांचा कचकोल उडे , " सिव्वर , इंडियन , काले कुत्ते. "
हसता हसता रुंद होत गो-या मडमांच्या तोंडाचे खलबते

आफ्रिकी चाचा चिडे , थुंके , म्हणे ; " काम नही करेगा. "
चिलमीवर काडी पटवीत मी विचारी , " चाचा , पेट कैसा भरेगा ?"

धुसफुसे तो , पोट-या ताठ होत , भराभरा भरी रेलच्या वाघिणी
एक दिवस काय झाले ; त्याच्या डोळयात पेटले विद्रोहाचे पाणी

टरकावले घामेजले खमीस , त्याच्या क्रेनवर बावटा फडफडला
अडकवून तिथेच देह माझा गुरु पहिले वाक्य बोलला ,

" हमारा खून झिंदाबाद ! " वाटले , चाचाने उलथलाच पृथ्वीगोलट
खळालल्या नसानसांत लाटास कानांनी झेलले उत्थानाचे बोल

अडकवून साखळदंडात सिंह सोजिरांनी बोटीवर चढवला
" बेटा! " गदगदला कंठ. एक अश्रू खमीसावर तुटून पडला.

कुठे असेल माझा गुरु , कोणत्या खंदकात , का ? बंडवाला बंदीशाळेत
अजून आठवतो आफ्रिकन चाचाचा पाठीवरुन फिरलेला हात

आता आलोच आहे जगात , वावरतो आहे ह्या उघड्यानागड्या वास्तवात
जगायलाच हवे ; आपलेसे करायलाच हवे ; कधी दोन घेत ; कधी दोन देत



कविवर्य :- नारायण सुर्वे

सत्य

तुझे गरम ओठ : ओठावर टेकलेस तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती; घूमी .
पलिकडे खड़खड़नारे कारखाने
खोल्या खोल्यांतुन अंथरले बिछाने
मुल्लाचा अल्लासाठी अखेरचा गज़र
काटे ओलांडित चालले प्रहर
भावंडासह कोनाडा जवळ केला आईने
घुमसत , बिछान्यासह फुटपाथ गाठली बापने.

तुझे गरम ओठ : खडीसाखर होत गेले तेव्हा ;
तेव्हाही रात्र अशीच होती ओढळ
खपत होतो घरासाठीच .....
विसावत होतो क्षीण तुझ्या काठावर
तुझ्या खांद्यावर ---
तटतटलीस उरी पोटी
तनु मोहरली गोमटी
एक कौतुक धडपडत आले ; घरभरले
हादरली चाळ टाळांनी ; खेळेवाल्यांनी
वाकलीस खणानारळांनी .

तुझे गरम ओठ : अधिकच पेटत गेले तेव्हा ;
तेव्हाही अशीच एक रात्र आली नकार घेऊन
पंखाखाली बसलीस चार पिल्ले ठेऊन
कोनाडा ह्ळहळला -कळ्वळला .

'नारायणा' - गदगदला.
'शिंक्यावरची भाकर घे ' पुटपुटला .
' उद्यापासून तिलाही काम बघ बाबा '
गांगरलो , भोवंडून स्थीर झालो .
तीच्या ओठावर ओठ टेकवून
बिछान्यासह बाहेर पडलो . त्या रात्री ,
तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले .......... अधिकच..


कवी -  नारायण सुर्वे

बाबा इथे पोरका झाला आहे

आवाज बंद झाला,संवाद हरपला आहे.
बोबडा शब्द चिमुकल्याचा लुप्त आज आहे.

चोकलेटचा बंगला आज मोडला आहे.
चीउचा घास चिमुकला आज सांडला आहे .

सापशिडीच्या खेळामधली शिडी सरकली आहे.
सारे फासे पलटले,आता दंश फक्त आहे.

बागेत फिरत असता,हात रिकामा राहतो.
देत झोका कोणी पाहता,हात कापरा होतो.

सुन्न अशा खोलीमध्ये,तुझा टेडीही एकाला झाला .
अन् खेळ तुझा भातुलालीचा,मी पुन्हा नाही पाहिला.

कडेवर कोणी अन्य घेता, अश्रूंच्या धारा.
मग चुंबने तुझी मी घेता,त्या हास्याच्या लाटा.

बाकी फक्त आहे,तुझ्या स्वेटर आणि कुंच्या.
अन् तुं स्पर्शिलेल्या घराच्या सर्व दिशा.

थोपटू आता कोणाला,मी एकटाच आहे.
आठवणीत आता फक्त कुशीतली झोप आहे.

माझी राणी!गेलीस तू अचानक निघून,
तुझा बाबा इथे पोरका झाला आहे.

सुख-दुख

       आयुष्य हे असच असतं,
       कधी फुंकर तर कधी वादळ असतं.

              कधी सुखाची शाल ओढून,
                दु:ख दबकत येत
                 तर कधी दु:खाचे काटे लावून,
                    सुख धावत येत.


                        सुखाचा उपभोग घेताना,
                            दु:ख कधी आलं हे कळत नाही
                               अन दु:खाचे काटे टोचत असताना,
                                    सुखाची वाट साहवत नाही.


                                          सुख नेहमी पाहुणा बनून येत,
                                              दोन दिवस राहून लगेच निघून जातं
                                                दु :ख मात्र कायमचा पाहुणा बनून येत,
                                                 अन हृदयाला चरे पाडून जातं.

                                   दुखाची सावली सदैव जीवनाची पायवाट होते,
                                  तर सुखाची सावली उन-पावसाचा खेळ खेळते,
                                   तर कधी सुखाचा झरा वाहतो,
                                   तर कधी दुखाचा पावस होता
                                  आयुष्यात हे सुख-दुख चा खेळ चालता राहतो
                                   तर कधी आठवणी म्हणून छळत असतो,

पण आयुष्यात दोन्हीच महत्व तितकच आहे,
एक पोळणार उन तर दुसरी गडद सावली आहे.

असे काही घडेल

"कधी विचारही केला नव्हता की असे काही घडेल,
सर्वकाही विसरून, मी तिच्यावर प्रेम करेल,
तो काळच तसा होता, ती वेळच तशी होती,
ह प्रसंग आहे तेव्हाचा, जेव्हा 'ती' माझी नव्हती,

ध्येय नव्हते जीवनाला, कुठला ध्यासही नव्हता,
नव्हती चिंता उद्याची, स्वतःवर विश्वासही नव्हता,
अशातच जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहिले,
विद्युत् वेगाने माझे काळीज धडधड्ले,

तिचं लाजन, तिचं हासन, आणि बोलके डोळे,
काळजाच्या कप्प्यात साठवले सगळे,
मग तिची आठवण होताच मला पड़े भ्रांत,
बोलायचे म्हटले तर, तिचा स्वाभाव शांत,

काय कराव तेच कळत नव्हते,
कसही करून तिचे मन जिंकायचे होते,
हिम्मत करून शेवटी तिला प्रेमपत्र लिहिले,
विचार करण्यास मुदत म्हणुन काही दिवस दिले,

महिना होउन सुद्धा तिचा होकर नाही आला,
होकाराच्या प्रतिक्षेत माझा जिव व्याकुळ झाला,
समजुन चुकले मी, हा नक्कीच तिचा नकार आहे,
तिला विसरने हाच एकमात्र उपाय आहे,

शेवटी करायला नको ते धाडस मी केले,
होकर आहे की नकार थेट तिलाच विचारले,
मग माझे पत्र दाखवत ती म्हणाली, हे काय आहे..?,
'तुझ्या एव्हडेच माझे तुझ्यावर्ती प्रेम आहे,

एकून तिचे उत्तर, 'मन' बेभान होउन नाचले,
अतिआनंदाने डोळ्यात पानी साचले,
ध्येय मिळाले जीवनाला, ध्यासही गावला,
माझ्यावरचा विश्वास मी तिच्या डोळ्यात पहिला,

आता दीवसही माझा तिच्या नावाने उगतो,
स्वप्नातला चंद्रही तिच्यासाठी झुरतो,
रक्तासारखी माझ्यात ती सामावली सर्वांगी,
साधी, भोळी, अल्लड माझी प्रेयसी..."

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा

या साजी-या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा


गीत     -     सुधीर मोघे
संगीत     -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर     -     महेंद्र कपूर
चित्रपट     -     हा खेळ सावल्यांचा (१९७६)

सुंदर तरुणी दिसल्यावर

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू?
चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू'
तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी
'तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली
चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली
घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले…
(दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!)
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता…
परिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही
मला आवडे तिचा असा हा फणकाराही
चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते!
म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

ती

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..

तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..

तिने कित्ती साधं रहावं .. त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..

तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..

तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..

तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..

तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..विरहाचं दुख कधीही न यावं..

जहर खाऊ नका..!


घोर मनाला लाऊ नका..
पाठ जगाला दावू नका..
तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा..
जहर खावू नका..!


आली लग्नाला लाडाची ताई..
हुंड्यावाचून जमेना काही..
असे लाचार होवू नका..
टोपी गहाण ठेवू नका..
ताई तयार आहे लढायला बाबा ..
जहर खाऊ नका..!

कर्ज घेवून दिवाळी आली..
वार यंदाही नापिकी झाली..
नवे कपडे घेवू नका..
काही खायाला देवू नका..
पाणी पिवून दिवाळी करू ना बाबा..
जहर खावू नका..!

आहे साथीला सोन्याची शेती..
घाम गाळून पिकवू मोती
तीर्थ यात्रेला जावू नका,,
चुना खिशाला लावू नका..
आमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..
जहर खावू नका..!!

... स्पर्श तुझा ...


पाहणे तुझे म्हणजे आभास चांदण्याचा,
स्पर्श तुझा बेधुंदी जीव घेतो माझा..

तुझे हासणे गं फुले मालतीची,


घायाळ करते मजला अदा ही खुणेची... 

हात तुझा हाती घेता विसर जगाचा पडतो,
मिठीत तुझ्या गं सखये, मी सांजवेळी बुडतो... 

फारच जुलमी तुझे, नितळ निळे डोळे,
पाहुन होई वेडे, मन हे माझे भोळे... 
तूच कविता माझी, श्वास जीवनाचा,
पाहणे तुझे म्हणजे आभास चांदण्याचा.....

सोपे प्रश्न

अमेरिकेतील एका शाळेत पहिलीच्या वर्गासाठी इंटरव्ह्यू सुरू होता.
टीचर : बाळा तुझे नाव?
मुलगा : जॉर्ज
टीचर : आणि तुझ्या बाबांचे?
आई (ओरडून) : प्लीज त्याला सोपे प्रश्न विचारा!..

जायचे नाही

कुठल्याच जुन्या धाग्याला उसवून जायचे नाही
मज वसंत आल्यावरही बहरून जायचे नाही

का विपर्यास झाला या माझ्या साध्या स्पर्शाचा
की तूच ठरवले होते समजून जायचे नाही

जर इतका त्रागा होतो तुजला माझ्या शब्दाचा
तू नजरेमधुनी गझला सुचवून जायचे नाही

तव गंध लांघुनी येतो श्वासांच्या अगणित भिंती
त्यालाही बहुधा मजला चुकवून जायचे नाही

ती दरी गोठली आता दोघांमधल्या नात्याची
तू नाव धुक्यावर माझे गिरवून जायचे नाही

मी निवर्तल्याचे तिकडे इतक्यात नका हो कळवू
मज जळता जळता कोणा भिजवून जायचे नाही

वाटल्यास ठेवा काटे, स्वप्नांच्या फुटक्या काचा
माझ्या थडग्यास फुलांनी सजवून जायचे नाही

- अभिजीत दाते

देऊ किती आवाज आता..!

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

– अभिजीत दाते

'चंद्र' डागाळलेला बरा

विषय हा टाळलेला बरा,
अन्य हाताळलेला बरा ॥

आठवांच्या फुलांतील 'तो'
मोगरा जाळलेला बरा ॥

हट्ट का उत्तराचा उगा?
प्रश्न रेंगाळलेला बरा ॥

विश्व खोटे जरी भोवती,
शब्द मी पाळलेला बरा ॥

लावु दे पेच त्यांनाच, मी
दोर गुंडाळलेला बरा ॥

हौस ना थांबण्याची मला,
पाय भेगाळलेला बरा ॥

मिरव 'सौभाग्य' तू आपुले,
'चंद्र' डागाळलेला बरा ॥

- चैतन्य दीक्षित

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...

पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं..

मौसम... (नज्म)

 मौसम हा आशिकाना, पाउस दाटलेला
 माझ्या उरी ढगांनी, संसार थाटलेला...
 बेधुंद होत तुही, म्हटले सूरेल गाणे
 तुझिया स्वरांत भिजण्या, पाउस थांबलेला...
 मौसम हा आशिकाना...

 ओठांत गीत होते, डोईवरी सरी या
 मल्हार सांडला होता, दोन्हीच अंतरी या
 कळलेच ना कधी ते, हातात हात आला
 क्षण तोच सांगण्याला, पाउस लांबलेला...
 मौसम हा आशिकाना...

 ओलावल्यात येथे, भिंती अता मनाच्या
 भांबावल्यात आणि, जाणिवा इथे तनाच्या
 प्रत्येक पावलाशी, जणू ओल पावसाची
 ओलावल्या उराशी, पाउस साठलेला...
 मौसम हा आशिकाना...

 हातात हात आहे अन साथ ही युगाची
 पाउस साक्ष आहे अन बात ही सुखाची
जेव्हा मला दिलेली, तू वचने सखे गुलाबी
 तेव्हा हवाहवासा, पाउस वाटलेला...

 मौसम हा आशिकाना...

कवी - महेश घाटपांडे

अबोल तुझ्या शब्दातले

अबोल तुझ्या शब्दातले
 बोल तो बोलून गेला
 निरागस तुझ्या डोळ्यातली
  आसवे तो पुसून गेला

 तरंगत्या प्रेमाचे भाव मनी
 उमटवूनी तो निघून गेला
 ओठांवरचे नाजूक काहीतरी
 नकळत तो खूलवून गेला

 कोपर्‍यात हृदयाच्या
 प्रेमाचा हिंदोळा तो झुलवून गेला
 दरवळ सुगंधी फुलांचा तुझ्यात
 पसरवूनी तो निघून गेला

 दडवूनी आस प्रेमाचि खर्‍या
 मैत्रीत तो जगून गेला
 सतत तुझी काळजी करणारा
 तो स्वतःच्याच काळजीत निघून गेला

 आयुष्यभर चित्र काढणारा तो चित्रकार
 अखेर तुझ्यासाठी तो कविता बनवून गेला
 असतानाही प्रेम तुझ्यावर मनापासून
 मैत्री तुटेल म्हणून प्रेमाचे हे गुपित तो कायमचा घेऊन गेला............

मला शाळेत न्या ना

मला शाळेत न्या ना
बाबा, मी आता मोठा झालो
किलबिल वर्गातून बालवाडीत गेलो
माझ्या इवल्या पाठीवर नवीन दप्तर द्या ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

तुमची जुनीच स्कूटर परत नव्याने हसतेय
पाव्हणं नवीन आहे म्हणून अलगद धक्के सोसतेय
शाळेत नेताना मला पुढयात घ्या ना 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

मी शाळेत पुन्हा एकदा 'नमस्ते बाssssई' म्हणीन
मधल्या सुटीत रोज मुरांबा पोळी खाईन
माझं 'ध्यान' पाहून तुम्ही खुदकन हसा ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

ते खेळण्यांच दुकान अजूनही तिथेच आहे
तिथले काका तसेच हसरे आणी प्रेमळ आहेत
मी धावेन तिकडे, मला उचलून घ्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना      

घरचा अभ्यास मी अजूनही नाहीच केलाय
शाबासकी म्हणून आईने धम्मकलाडू ही दिलाय
ससा कासवाची कविता परत माझ्यासाठी गा ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

रिमझिम आठवणीत सरलेत दिनरात्र
मुर्दाड बनलोय मी अन थकलीयेत तुमची गात्र
ते आधारचं बोट पुन्हा हातात द्या ना
 बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

कवी
मकरंद केतकर

रडू नकोस उगीच

रडू नकोस  उगीच
चांगले नाही ते  जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना…………….


आभाळं  भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………………..


अजूनही  जातो त्याच  बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना……………….


झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना…………….


माहीत  नाही पुन्हा  कधी भेटु
वेगळ्या  रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना…………..


विषय  शोधावे लागतील  आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील   का गं
पुन्हा एकत्र असताना…………………


शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग  तु
सोडुनच जायचे असताना……………


सोन्यासारखा  संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….

ड्युटी

एका सुंदर युवतीच्या मागे एक मवाली लागला.ती युवती घाबरली.ती या गल्लीतून त्या गल्लीत सारखी पळू लागली.मात्र त्या मवालीने तिचा पाठलाग काही सोड्ला नाही.धावत धावत ती एका चौकापाशी आली.नशीबाने तेथे एक ट्राफ़िक पोलिस उभा होता.ती सुंदर युवती धापा टाकत त्याच्याजवळ आली आणि बोलली...."तो माणूस मघापासून माझ्यामागे लागलाय....मला वाचवा !"


तो पोलिस क्षणभर थांबला.
मग त्या सुंदर युवतीकडे पाहून हळूच बोलला.


"आता मी ड्युटीवर आहे.खरं सांगू.....नाही तर मीही तुमच्या मागे लागलो असतो.."

ऑपरेशनची जागा

तिला घेऊन तो गाडीतून long drive वर निघाला होता

बसल्या बसल्या तो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता पण ती दाद देत नव्हती

शेवटी ती बोलली- तुला माझी 'ती' जागा दाखवू का जिथे माझे appendix चे ऑपरेशन झाले होते

'ती' जागा पाहायला तो उतावीळ झाला

गाडी थांबवून ती त्याला बोलली - समोर पहा जिथे माझे appendix चे ऑपरेशन झाले होते ते "हॉस्पिटल"

सरकार

एक माणूस दुःखी अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसुन बडबडत होता….कमाई माझी आणि उधळणारे दुसरे,काम करणार मी आणि मजा मारणार कूणी,सगळाच गोंधळ माजलाय .कमाल म्हणजे दोन वेळची भाकर सुद्धा देत नाहि म्हणजे काय ? ?

त्याच वेळी तेथून जाणा‍र्‍्या हवालदाराने कडक आवाजात विचारले,काय रे सरकारला का शिव्या देतोस?

नाही,हवालदारसाहेब,मी माझ्या बायकोबद्दल बोलतोय…..तो माणूस काकूळतीनं म्हणाला.

पोपटाची इमर्जन्सि

एकदा पोलिस स्टेशन मध्ये फ़ोन येतो, 'हॅलॊ एक इमर्जन्सि आहे, लवकर या"

पोलिस : कोण तुम्हि ? काय झाले ?

फ़ोनवरुन आवाज येतो, अहो , घरात माजंर शिरलय "

पोलिस : माजंर शिरलय हि इमर्जन्सि होऊ शकते का ?

अहो मि पोपट बोलतोय... मी घरि एकटाच आहे"


वेळेवर ऑफिस

रमेश रोज कामावर उशिरा जात असे आणि रोज साहेबांची बोलणी खात असे. त्याला सकाळी लवकर उठताच येत नसे. शेवटी या रोजच्या कटकटीला तो कंटाळला आणि एक दिवस डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना त्याने सगळी हकीकत सांगितली आणि तो म्हणाला, "मला असं काहीतरी औषध द्या डॉक्टर, की ज्यामुळे मला लवकर उठता येईल."

डॉक्टरानी त्याला तपासले, दोन गोळ्या "रात्री झोपण्यापुर्वी घ्या."

रात्री रमेशला शांत झोप लागली. "सकाळी मी वेळेपूर्वीच दहा मिनीटे आलो आहे."साहेबापुढे धीटपणॆ उभा रहात तो हसत म्हणाला.

त्याला बघुन साहेबाने कपाळाला आठ्या घातल्या आणि साहेब म्हणाला, "ते दिसतंच मला, पण काल तुम्ही कुंठ होतात?"

चुकीचा सल्ला

दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात.

डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते?

अण्णा : डॉ. देशपांडे.

डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात.

तुम्हाला कोणता दिला?

अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा.......

झम्प्या : मी तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे….
.
.
.
मुलीचे वडिल : तुम्ही माझ्या बायकोला भेटलात?
.
.
.
.
झम्प्या : हो…पण मला तुमची मुलगीच आवडते….

आता तरी मला उतरु द्या.

एकदा एक इन्स्पेक्टर गाडीत शिरला.
समोर पाहतो तर एक हवालदार उठून उभा राहिलेला.
इन्स्पेक्टर म्हणाला, "अरे अरे उठायची गरज नाही. बसलास तरी चालेल."

असे दोन-तीन वेळा झाल्यावर शेवटी तो हवालदार म्हणाला, "साहेब माझं स्टेशन कधीच गेलं. आता तरी मला उतरु द्या."

एकावर एका फ्री

घेलाशेठ पक्का कंजूष माणूस. त्याची मागील तीन चार दिवसापासून एक दाढ दुखत होती. पण पैसा खर्च होईल म्हणून तसाच त्रास सहन करत होता. शेठाणीने डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला तेव्हा घरीच दाढ काढली तर चालणार नाही का? असा प्रतिप्रश्न त्याने बायकोला केला.

शेवटी बायकोने बराच आरडा ओरडा केल्यानंतर घेलाशेठ एकदाचा दंतवैद्याकडे गेला. डॉक्टर माजा उजव्या बाजूचे दाढ लई दुकते, तेचा किती पैसा घेणार? काहीतरी कमी घ्या आम्ही तुमचा फायदा करू अशी बडबड करून त्याने डॉक्टरला पटवण्याचा प्रयत्न केला. काही काळजी करू नका शेठजी, आरामात या खुर्चीत बसा आणि तोंडाचा आ करा व काहीही बोलू नका, मी तुमचा फायदा करून देणार आहे.

तेव्हा कुठे घेलाशेठ खुर्चीत तोंड वासून बसला. झालच हं म्हणत डॉक्टरांनी घेलाशेठच्या दोन दाढा उपटल्या. डॉक्टर बाजूला झाले तसा घेलाशेठ खुर्चीतून थयथया नाचत उठला, डॉक्टर हे काय केला तुमी मी एक दाढ काढायला सांगितला ने तुमी तर माझा दोन दाढा उपटले की. दोन दाढेचे पैसे द्यावे लागणार ह्या कल्पनेने अस्वस्थ झालेला घेलाशेठ ठणाणा बोंबलत सुटला.

डॉक्टर हसत म्हणाले काही काळजी करू नका घेलाशेठ, मी तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुमचा फायदा केला आहे. तुम्ही फक्त एकाच दाढेचे पैसे द्या. कारण सध्या आमचेकडे एकावर एका फ्री ची स्कीम सुरु आहे!

प्लॅस्टीक सर्जरी

रुग्ण - डॉक्टर प्लॅस्टीक सर्जरी ला किती खर्च येईल.

डॉक्टर - ५००००

रुग्ण - जर प्लॅस्टीक आम्ही दिला तर ?

डॉक्टर (रागाने) - ???????????

स्मुती आणि बुद्धिमत्तेची चाचणी

स्मुती आणि बुद्धिमत्तेची चाचणी करून घेण्याकरिता ३ वृध्द डॉक्टर राम रावांकडे गेले.
" नितीन राव तीन त्रिक किती ?" डॉक्टरांनी पहिल्या वृध्दाला विचारले
"२७४" त्याने उत्तर दिले.

थोड्या चिंताग्रस्त आवाजात डॉक्टरांनी तोच प्रश्न दुसर्या वृध्दाला विचारले
" सोमनाथभाऊ तुम्ही सांगा,तीन त्रिक किती ?"
"मंगळवार" त्याने उत्तर दिले.

ही उत्तर ऐकल्यावर डॉक्टर कपाळावर हात मारणारच होते पण
स्वताला सावरत आवाजावर ताबा ठेवत ते तिसर्या वृध्दाकडे वळले

"आता प्रवीणकुमार तुम्ही सांगा, तीन त्रिक किती ?"
"नऊ"

उत्तर ऐकून डॉक्टर राम रावांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
"तुम्ही कसे काढलेत हो उत्तर शोधून " डॉक्टर त्याला म्हणाले

तिसरा वृध्द उत्तरला "अगदी सोप्पय, २७४ मधून मी मंगळवार वजा केला."

इस्त्री आणि फोन

प्रताप सिंग नावाचा सरदारजी डॉक्टर कडे गेला,त्याचे दोन्ही कान भाजले होते.

डॉक्टर : "काय झाले सरदारजी ?"

सरदारजी : "काही नाही, मी कपड्यांना इस्त्री करत होतो मध्येच फोन वाजला."

डॉक्टर : "मग काय झाल ?"

सरदारजी : मी चुकून फोन ऐवजी हातातली इस्त्री कानाला लावली,
म्हणून माझा एक कान भाजला.

डॉक्टर : कोणाचा फोन होता ?

सरदारजी : तो एक राँग नंबर होता

डॉक्टर : पण मग, दुसरा कान कसा भाजला ?

सरदारजी : त्या मुर्खाने मला पुन्हा फोन केला. 

न्हावी

बर्‍याच दिवसानंतर तीन मैत्रिणीं एकत्र जमल्या होत्या. त्या तिघीही आपापल्या पतीच्या बढाई मारत होत्या.

पहिली- अगं माझे मिस्टर शिक्षक आहेत. त्यांच्या पुढे तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या माना झुकतात.

दुसरी- माझे मिस्टर हेडमास्टर आहेत. त्यांच्या पुढे तुझ्या मिस्टरांसारख्या शिक्षकांच्या माना झुकतात.

तिसरी- अंग माझ्या मिस्टरांपुढे तुमच्या दोघींचे मिस्टर माना झुकवतात.

दोघीही-
कोण आहेत ग तुझे पती?

तिसरी-
न्हावी !

क्रिकेटर सैनिक

एकदा भारतीय गोलंदाज जवागल श्रीनाथ अणि वेंकटेश प्रसाद कारगिलला सैनिकांना भेट देण्यासाठी जातात.तिथे गेल्यावर त्यांचे देशप्रेम उफ़ाळून येते.त्यांना वाट्त की आपणही देशासाठी काहितरी करुन दाखवाव. म्हणुन ते मेजर साहेबांना म्हणतात कि आम्हीपण काहितरी करणार .मेजर म्हणतात ठीक आहे पण तुम्ही नक्की काय करणार गन चालवणार का? ते म्हणतात नाही आम्ही बॊम्ब फ़ेकणार.

मग ते दोघ बॊम्ब घेऊन सैनिकांबरोबर लढायला जातात .

थोड्या वेळाने अगदी रक्तबंबाळ होऊन परत येतात.मेजर सैनिकांना विचारतात की हे कस घडल?
सैनिक सांगतात की यांनी विचारल कि बॊम्ब कसा फ़ेकायचा? आम्ही त्यांना दाखवल कि बॊम्ब कसा फ़ेकायचा ते . बॊम्बची क्लिप दाताने काढायची व फ़ेकायचा.

मेजर :- मग पुढे काय झाल ?

सैनिक :- त्यांनी दाताने बॊम्बची क्लिप काढली आंणि फ़ेकायचा सोडून मांडीवरती घासत बसले. 

मुल कोणाचे ?

घटस्फोटाच्या सुनावणीत मुलाची आई जजला विनवणी करते "जजसाहेब माझ्या मुलाला मी जन्म दिलाय, त्याची कस्टडी मला द्या."

जज बापाला त्याची बाजू मांडायला सांगतात.

बाप म्हणतो, "जजसाहेब, जेव्हा आपण वेंडिंग मशिनमध्ये डॉलर टाकतो आणि पेप्सी बाहेर येते, याचा अर्थ ती पेप्सी मशिनच्या मालकीची होते काय? आता तुम्हीच निर्णय द्या."

गुडनाइट

एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. दोघांनी लग्न केलं . पण, लग्नाच्या पहिल्या रात्रीच डासिणीचा मृत्यू झाला...

... का?...

...

विचार करा...

अहो, भलतेसलते विचार करू नका! हत्तीला रात्री 'गुडनाइट' लावून झोपायची सवय होती!!!!

मुलाचे दात फार पुढे आहेत!

एकदा एका हत्तीचं एका डासिणीवर (म्हणजे डासाची मादी) प्रेम जडलं. खूप दिवस दोघांचं अफेअर जोरात चाललं. सगळ्या जंगलात या प्रकरणाची चर्चा गाजत राहिली. अखेर हत्तीनं डासिणीच्या वडिलांना भेटून तिला रीतसर मागणी घातली. पण, तिच्या घरच्यांनी लग्नाला प्रचंड विरोध दर्शवला.... का?....

....

सांगा सांगा का?

अहो, ते म्हणाले, ''बाकी ठीक आहे, मुलाचे दात फार पुढे आहेत!''
टीचर: बोल राजू समुद्रात जर निंबूच झाड असेल तर तु कसे निंबू तोडशील..बरं ?

राजू: सर सोप्प आहे मग मी पक्षी बनेल..!

टीचर: तुला माणसा पासुन पक्षी काय तुझा बाप बनवेल ..?

राजू: तर मग समुद्रात निंबूच झाड काय तुमचा बाप लावेल..?

इच्छाशक्‍ती

बायको : "तुझ्यात प्रखर इच्छाशक्तीच नाही ! बाजूचे जोशी बघ, त्यांनी सिगारेट पिणे थांबवलंय"

नवरा : "आता बघच माझ्यात किती इच्छाशक्ती आहे ती ! आजपासून आपण वेगवेगळ्या खोलीत झोपायचं."

खरोखरच असे काही दिवस गेल्यानंतर एका रात्री नवर्याच्या दारावर हलकी थाप पडली.

नवरा : "कोण आहे ?"

बायको : "मी आहे."

नवरा : काय ग काय झाले ?

बायको : (बारीक आवाजात ) "जोशांनी पुन्हा सिगारेट सुरु केलीय."

फोन कोणासाठी

पती (पत्‍नीला) :- जर माझ्यासाठी कोणाचा फोन आला तर सांग मी घरी नाही म्हणुन.

अचानक फोन ची बेल वाजते. पत्‍नी फोन उचलुन सांगते ’ते अजुन घरीच आहेत.’

पती पत्‍नीवर ओरडत बोलतो ’बोललो होतो ना सांगु नकोस मग का बोललीस’.

पत्‍नी :- तो फोन माझ्यासाठी होता.

सुंकट दुर करण्याचा मार्ग

ती : ऑफिसला जाताना तुम्ही माझा फोटो आपल्या पाकिटात का ठेवता ?

तो : अग त्यामुळे माझी संकटं लगेच सुटतात.

ती : कस कायं ?

तो : अगं, कोणतही संकट आलं किंवा कठिण काम आल की मी पाकिटातुन तुझा फोटो काढुन त्याकडे बघतो, त्यामुळे तुझ्यापुढे कोणतेही संकट हल्क वाटयला लागते !!!

कानात बाळी

मंग्या कानात बाळी घालून फिरत होता,

चंद्या : कानात बाळी? हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस?

मंग्या : अरे बायको माहेरी जाऊन आल्यापासून..

चंद्या : म्हणजे वहीनीनी माहेरून तुझ्यासाठी बाळी आणली की काय ?

मंग्या : नाही रे गाढवा !!! ही बाळी तिला माझ्या अंथरुणात सापडली, आता माझीच आहे सांगितलं म्हणून झक मारत घालावी लागतेय..

कुत्रीचा फोन....

बायको तिच्या नवऱ्याला म्हणते "अहो ही जेनी कोण आहे हो ?''

नवरा :(थोडासा घाबरत ) "अगं जेनी हे एका कुत्र्याच्या पिल्लूचे नाव आहे, आपण लवकरच ते विकत घेणार आहोत."

बायको : "असं होय...अहो त्या कुत्रीचा सकाळपासून ५ वेळा फोन येऊन गेला तुमच्यासाठी "

पुढचा जन्म

पत्‍नी :- पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवढेल ?

पती :- झुरळ.

पत्‍नी :- झुरळ ?.... ते का ?

पती :- कारण तु फक्‍त झुरळालाच घाबरतेस.

विम्याची रक्कम

पत्नी : जर स्वयंपाक्याला काढून टाकलं आणि मी स्वयंपाक केला, तर तू दर महिन्याला मला पगार देशील का?

पती : पगार कशाला? माझ्या विम्याची सगळी रक्कम मिळालेच ना तुला!

दात काढा लवकर

पती आणि पत्‍नी दातांच्या डॉक्टरकडे आले. प‍त्नी ने सांगितले डॉक्टार दात काढायचा आहे.
जर घाईत आहे म्हणुन कोणत्याही पेन किलरचा वापर न करता लवकर दात उपटुन काढा.

डॉक्टर :- अरे वा ! तुम्ही तर एकदम धिट महिला दिसता, दाखवा तुम्हाला कोणता दात काढायचा आहे.

पत्नी (पती ला) :- अहो, जरा डॉक्टरला दाखवा तुमचा कोणता दात काढायचा आहे ते.

लफड

पती : आपल्या बिल्डींग मधला राजू काय काय बडबडत होता..

पत्नी : काय म्हणत होता ?

पती : तो म्हणत होता. आपल्या बिल्डींगमधील एक बाई सोडून सगळ्या बायकांशी
त्याच लफड आहे म्हणून. कोण असेल ती एक बाई ?

पत्नी : देशपांडे आजी असतील.

खिडकी

पती धावत-धावत हॉटेल मालकाकडे गेला.

पती - लवकर चला माझी बायको खिडकीतून उडी मारून जीव देणार आहे.

मालक - मग मी काय करू ?

पती - खिडकी उघडत नाही.

फसवणूक

एका कोर्टात पत्नी विरूध्द घटस्फोटाची केस चालू असते.

पतीचे वकील तिला विचारतात की, "तू तुझ्या पतीची फसवणूक केली काय?"

पत्नी सांगते : "मुळीच नाही, उलट पतीनेच माझी फसवणूक केली. गावाहून तीन दिवसात परत येतो म्हणून सांगितले व पहिल्याच दिवशी रात्री १२.०० ला ते परत आले. ही माझी फसवणूक नाही का?"

दिलेला शब्द

पती त्याच्या आयुष्यात खूप पैसे कमवतो पण जेव्हा खर्च करायची गोष्ट येते तेव्हा मागे फिरतो.
तो इतका पैशांसाठी वेडा असतो की पत्नीला सांगतो जेव्हा मी मरेन तेव्हा माझे सर्व पैसे एका पेटीत भर आणि माझ्या मैताबरोबर ते पाठवून दे.
जेव्हा तो मरतो.
तेव्हा त्याची पत्नी एक पेटी भरून त्याच्या मैताबरोबर पाठवून देते.

पत्नीचा मित्र म्हणतो "मला माहीत आहे, तू इतकी मुर्ख नाहीस की सगळे पैसे त्या पेटीत घालशील.

तेव्हा पत्नी म्हणाली "हे बघ, एकदा मी माझ्या नव-याला शब्द दिला तर तो मी मागे घेऊ शकत नाही."

मित्र म्हणतो "म्हणजे तू खरच...?"

पत्नी म्हणते " हो, मी त्याचे सर्व पैसे जमवले माझ्या खात्यात जमा केले आणि त्या रकमेचा चेक लिहून तो पेटीत टाकला आहे. जर त्याला शक्य असेल तर तो काढेल बँकेतून."

भंगारवाला

एकदा नवरा बायको रस्त्यानी जात असतात,

बायको : आहो तो व्यक्ती माज़्याकडे बघतोय

नवरा : जाउ दे, तो भंगारवाला आहे. जुन्या वस्तु बघन्याची सवय आहे त्याला.

बायकोची परवानगी


एका सोसायटीमध्ये बायकांना घाबरणा-या नव-यांची संख्या वाढु लागली. म्हणुन त्याच्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी काही नव-यांनी एक संघटना स्थापन केली. संघटनेची पहिलीच सभा भरली होती.

अध्यक्षांनी सर्वांना एक प्रश्न केला, "तुमच्या पैकी कितीजण आपल्या बायकांना घाबरतात ?"

एकाला सोडुन सर्वांनी हात वर केले. अध्यक्ष त्याला म्हणाले, "तु जरा आमच्यात निर्भय दिसतोस, तु जर आम्हाला मार्गदर्शन केलेस तर बरे होईल."

तो गृहस्थ म्हणाला, "आपला काही तरी गैरसमज होत आहे. मला हात वर करावे की नाही यासाठी मला माझ्या बायकोची परवानगी घ्यावी लागेल. ती घेऊन मी लगेच येतो."

खोट पकडणारा रोबोट

एका मुलाला त्याचे पप्पा असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो.

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये, मी शाळेत जाणार नाही. (चापट बसते …चटाक)

पप्पा : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. (चटाक )

मम्मा : काय झाले ?

पप्पा: हा चिंटू खोटे बोलतोय.

मम्मा: शेवटी तुमचाच मुलगा आहे. (चटाक !!)

क्या आपके टुथपेस्ट मे नमक है?

एका माणसाला हृदयाचा आजार होता


डॉक्टर नि मीट न खान्याची सलाह दिली


त्याची बाएको त्याची काळजी घेऊ लागली


तो माणूस सुद्धा काळजी घेऊ लागला


वेळेवर खाणं, झोपणं, उटन, डॉक्टर ने सागीतलेले व्यायाम करणे, जेवणामध्ये बिलकुल मीट न वापरणे. नेहमी आणि वेळे वर औषध घेणे

पण अचानक एक दिवस सकाळी तो माणूस बाथरूम चा दरवाजावर मेलेला मिळाला सगळे आचर्याचकीत होते कि एवढी काळजी घेऊन सुद्धा असे कसे झाले?


पोस्टमोटम चा रिपोर्ट आला आणि समजलं कि













त्याच्या टूथपेस्ट मध्ये मीट होतं



क्या आपके टुथपेस्ट मे नमक है?

बादशहाचे स्वप्न

एकदा अकबर बादशहाचा दरबार भरलेला असतो. तेथे बिरबल सुद्द्धा असतो. तेव्हा अकबर बादशहा सर्व दरबारातील लोकांना त्याला पडलेले स्वप्न सांगतो.

अकबर बादशहा म्हणतो "मला आज रात्री स्वप्न पडले की, मी एका मधाच्या डबक्यात पडलेलो, आणि बिरबल एका चिखलाच्या डबक्यात पडलेला होता. ''

त्यावर बिरबल म्हणतो :

''बादशहा मला हि असेच स्वप्न पडलेले होते, पण त्यात तुम्ही मला आणि मी तुम्हाला चाटत होतो.''

त्या नंतर कधी बादशहाने बिरबलची थट्टा-मस्करी केली नाही.

देवा तू खरच महान आहेस

एकदा बंड्याला
एक खूप गरीब आजारी म्हातारी भेटली..
जी खूप रडत होती...कारण तिचा मुलगा
आणि सून कार अपघातात वारले होते ..
आणि तिच्याकडे तिच्या तान्ह्या नातवाला
देण्यासाठी ना पैसे होते ना दुध ..

बंड्याला तिची दया आली .
.त्याने तिला १००० रुपयाची नोट दिली आणि सांगितले
तू डॉक्टरकडे जा...तुझी औषधे घे..
बाळासाठी दुध घे
आणि उरलेले पैसे मला परत आणून दे...

त्या म्हातारीने त्याला ६०० रुपये परत आणून दिले
..
..
बंड्या जाम खुश झाला ...
स्वताशी म्हणाला ...देवा तू खरच महान आहेस
दुसऱ्याला केलेली मदत नेहमी आपल्याला फायदा देऊन जाते
१. डॉक्टरला त्याची फीज मिळाली
२. दुधवाल्या त्याचे पैसे मिळाले
३. मेडिकल वाल्याला त्याचे पैसे मिळाले
४. म्हातारीचे उपचार झाले
५. उपाशी बाळाचे पोट भरले
आणि..
६. माझी नकली १००० रुपयाची नोट पण चालून गेली

भूताळकी

एक माणूस मुंबई हून पुण्याला गाडी घेऊन निघाला होता.
त्याने विचार केला कि आपण जुन्या रस्त्याने जरा निसर्ग बघत जावूया. तो ज्यावेळी डोंगरावर पोहोचला त्यावेळी त्याची गाडी बंद पडली.
तो आता अश्या ठिकाणी होता जिथून त्याला काहीही जवळ न्हवतं.
थोड्याच वेळात अंधार पडला आणि पाऊस सुद्धा चालू झाला.
रात्र पुढे सरकत होती पण त्या रस्त्याने कोणी सुद्धा जात न्हवतं.
... ... अचानक एक गाडी त्याच्याकडे येताना त्याला दिसली.
त्यांनी काही विचार न करता गाडीत पाठीमागच्या सीटवर बसला आणि धन्यवाद करण्यासाठी तो पुढे सरकला.
आणि पाहतो तर काय?
समोर कोणीच नाही..पण गाडी मात्र चालत होती. 
गाडी सरळ चालायची आणि वळणावर ज्यावेळी असे वाटायचे कि आता गाडी धडकतेय त्या वेळी अचानक एक हात खिडकीतून समोरून यायचा आणि गाडी वळवायचा.
तो खूप घाबरला.
त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. देवाकडे सतत प्रार्थना करू लागला.
अचानक एका वळणावर त्याला एक उजेड दिसला.
गाडी हळू झालेली पाहून पटकन गाडीतून उतरला आणि सरळ त्या उजेडाकडे धावत सुटला.
तो एक छोटा धाबा होता.
धाब्यावर जावून पाणी प्याला आणि तो सर्व लोकांना त्या खतरनाक अनुभवाबद्दल सांगू लागला.
धाब्यावर गाढ शांतता पसरली. आणि इतक्यात संता आणि बंता तेथे आले.
संता त्या माणसाकडे बोट दाखवून बंताला म्हणाला
' हाच बघ तो वेडा जो आपल्या गाडीत बसला होता ज्यावेळी आपण ती ढकलत होतो':

नाश्ता करून


शिक्षक : काही प्राणी १५-१५ दिवस काहीही न खाता जगू शकतात.
.
.
.
.
झंप्या : मी तर न जेवता ३० दिवस जिवंत राहू शकतो..
.
.
.
शिक्षक : कसं काय?
.
.
.
.
झंप्या : नाश्ता करून......