कविता

आई/माय
आठवण
आयुष्य/जीवन
श्रावण
गझल
गंभीर
गाव
घर
देव/भक्ति
नाते
निसर्ग
पाऊस
प्रेम
प्रेमभंग
प्रेरणादायी
प्रवास
बाबा/बाप
बालगीत
भेट
मन
माणूस
मैत्री
मित्र/मैत्रिन
मृत्यु
विडंबन
विनोदी/हास्य
विरह
शृंगारिक
सामाजिक
स्वप्न











अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील









आई एक नांव असतं ;
घरातल्या घरात ग्ज्ब्ज्लेलं गांव असतं !
सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही
आता नस्ली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही !!

जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात;
आई म्नाम्नांत तशीच ठेऊन जाते कांही
जिवाच जिवालाच कळाव् असं देऊन जाते कांही !!

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा:
घर उजळत तेंव्हा ,तीच नसतं भान
विझून गेली अंधारात की ;
सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान!!

आई घरात नाही???
तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबर्णार्या गाई??

आई खरंच काय असते?
लेकराची माय असते, वासराची गाय असते.
दुधाची साय असते ,लंग्ड्याचा पाय असते !!

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही ;उरतही नाही .........

(फ. मुं. शिंदे )










नास्तिक:-
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

--- संदीप खरे













"जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुन भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. . "






 पीठ गळे जात्यातून

पीठ गळे जात्यातून
तसं पाणी डोळ्यांतून
आई करपले हात
तुझे भाकरी भाजून.....

शिळ्या भाकरीचा उभा
माझ्या संसाराचा जीव
तुझ्या ओवीच्या शब्दानं
मला केलं चिरंजीव.....

पानझड : ना . धों. महानोर





 सूर्यनारायणा नित नेमाने उगवा
सूर्यनारायणा नित नेमाने उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा

मोडक्या घराच्या ब्रीन्दावनाशी सांजेला
दिव्याचा आधार जडो त्यांच्या संसाराला

ओंजळीन भरू देगा पाखरांच्या चोची
दुःखात पंखाना असो सावली मायेची

आबादानी होवो शेत भरू दे दाण्यांचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे  

: पानझड : ना. धों. महानोर .









 बोटातला स्पर्श
बोटातला स्पर्श
हर्ष अंगोपांगी
नको तेही सांगी.....

सांगताना थोडा
डोळ्यांना थरारा
वाटा सैराभैरा.....

सैरभैर साऱ्या 
समुद्राच्या लाटा
आभाळाच्या काठा.....

काठावरी गर्द
पेटलेला जाळ
चांदणे नितळ.....

: पानझड : ना धों महानोर.







 तुझ्या वाटेला ओले डोळे

तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले  पाणमळे

सजणासाठी सजून कोणी
गाते पक्षिणी
गीत निळे
सुकून गेले पाणमळे

राहू मैनेचे पंख पंखात
हिरव्या झाडीत
मनचळे.....
सुकून गेले पाणमळे

जुन्या झाडाला हालता झुला
ओला गलबला
तुझ्यामुळे.....
सुकून गेले पाणमळे

तुझ्या वाटेला ओले डोळे
सुकून गेले  पाणमळे

पानझड : ना धों  महानोर






 इथे झाडत निजलेल्या
इथे झाडत निजलेल्या
पाखरा नाव न गाव
निरागस पावलांसाठी
नियतीचा पांगळा डाव.....

गलबला काळजामधला
कहाणी चिंब भिजलेली
कुठे देऊळ नसताना
प्रार्थना दाटून आली ......

:पानझड : ना धों  महानोर












पहाटेला आलेली ही ओळखीची सर
ओले ओले करणारी फुलांत केसर......

किती दूर गेले फूल :
आली डोळ्यावर भूल,
एकाएकी पाकळ्यांना पडला विसर...

पहातो मी पुन्हा पुन्हा
कुठे दिसतील का खुणा :
गवतात मावळली फुलांची कुसर.....

जीव लावियेला असा
घेता परत ये कसा?????
पापण्यात जग झाले धुक्याने धूसर.....

: ओळखीची सर :भटके पक्षी : मंगेश पाडगावकर .





स्वप्नचित्र

गाण्याच्या काठावर
नारिंगी चंद्र हळू झुकलेला ,
रूमझुमत्या झाडांतून,
शब्दांविण अर्थ गहन पिकलेला.

वाऱ्याच्या बोटांवर
दवओल्या गवताचा मंद वास,
खडकातून पाझरतो
विरघळल्या जाईचा शुभ्र भास.

रात्रमग्न डोंगरात
सोनेरी जाळ मंद झीळमिळतो,
पाण्यातून बिंब हले :
स्वप्नातून रंग जसा झुळझुळतो.

: मंगेश पाडगावकर 








 विश्वास

उच्चार करू नये विश्वासाचा ,
तो डोळ्यात जपून धरावा शब्दातीत :
पहाटेच्या सुकुमार आभाळासारखा

हक्कांच्या हिशोबी हुकमतीतून
विश्वास पहावा उडून जाताना
पाखराच्या कुडीतून प्राण जावा तसा

विश्वास असावा लय जगण्यातली,
जगणे व्यापणारी अतर्क्य बंदिश
हिवाळ्यातल्या झाडांची सुजाण समजूत

थंडगार धुक्याचे ढग वहाताना अंगावरून
दिसत नव्हतो एकमेकांना. शब्द नव्हते.
विश्वास होता. जसे आपण होतो.

: मंगेश पाडगावकर








 निःशब्द
पाखरू निमूट बसलेलं
डोळे मिटून गच्च रानात
तसे शब्द माझ्या मनात!

चांदण्यांचं अबोलपण
हिरव्या स्तब्ध पानात
तसे शब्द माझ्या मनात!

म्हणूनच शब्द असे
भिजून येतात
खोल खोल निश्ब्दात
रुजून येतात!
: मंगेश पाडगावकर







 श्रेय
कधी कधी
सगळंच कसं चुकत जातं!
नको ते हातात येत,
हव ते हुकत जातं!

अशा वेळी काय करावं?
सुकलेल्या झाडांना
न बोलता पाणी द्यावं!


: मंगेश पाडगावकर








जरी तुझिया सामर्थ्याने
धलतिल दिशाही दाही
मी फुल तृणातील इवले..
उमलणार तरीही नाही

शक्तीने तुझिया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तरुणाचे पाते
अन स्वतःस विसरून वर
जोडील रेशमी नाते

कुरवाळत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करितील सजल इशारा

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे
अन रंगांचे गंधाचे
मी गीत कसे गुंफावे?

शोधीत धुक्यातून मजला
दवबिंदू होवुनी ये तू
कधी भिजलेल्या मातीचा
मृदू सजल सुगंधित हेतू!

तू तुलाच विसरून यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे..








अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत सांगत,दोन दिसांची नाती.

चंद्र कोवळा पहिला वाहिला झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जय उजळूनी काळोखाच्या राती

फुलून येत फुल बोलले,मी मरणावर र्हुदय तोलले
नव्हते नंतर,परी निरंतर,गंधित झाली माती

हात एक तो हळू थरथरला,पाठीवर मायेने फिरला
देवघरातील समईमधुनी अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या र्हुदायांची गाठ,सूर अजूनही गाती...








आत आपुल्या झरा झुळझुळे निळा स्वच्छंद,
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद.

घनधारांतून ख्याल ऐकतो रंगुनी मल्हाराचा
बघता बघता मोरपिसारा सार्या संसाराचा
मनात पाउस बरसे उधळीत मातीचा मधुगंध
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद

दु:खाला आधार नको का?तेही कधीतरी येते
दोस्त होवुनी हातच माझा अपुल्या हाती घेते
जो जो येईल त्याचे स्वागत दार न कधीही बंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद

झाडाची झुलणारी फांदी कधी लावणी भासे
साधा कोरा कागदही कधी चंद्र होऊनी हसे
सर्वत्रच तो बघतो धुंदी,डोळे ज्याचे धुंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद

कधी कुणाचे आसू पुसता बोटांनी हळुवार
हात होतसे वाद्य:सुरांचे पाझरती झंकार
प्रेमाच्या या गाण्यासाठी प्रेमाचा हा चंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे र्हुदयातील आनंद.









रडतच आलो येताना,पण हसत जावे जाताना

अंगावर आसूड विजेचे
झेलून घेती घन वर्षेचे
सार्थक झाले कोसळण्याचे,तृषित धरित्री न्हाताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

हसत हसत ज्योई जळली
काळोखाची रात्र उजळली
पाहत झाली तेव्हा नव्हती,तेजोमय जग होताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

बीज आतुनी फुटून गेले
वेदनेत या फुल जन्मले
अमरपणाचा अर्थ आकळे,मरण झेलुनी घेताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना

कुणी दुखाचा घोट घेतला
खोल व्यथेने प्राण पेटला
त्या दुखाचे झाले गाणे,जीव उधळूनी जाताना
रडतच आलो येताना पण हसत जावे जाताना









फांदी फांदी झुलतेय का?
ताल कोणी धरतंय का?
काकणं किणकिण किंकिंतायत,
कळशीत पाणी भरतंय का?

सुवास असं घाम्घाम्तोय,
झाड फुलात गढलय का?
वारा गाणं का म्हणतोय?








 पावसाळ्यातली संध्याकाळ,
आभाळ आलं अंधारून,
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

फांद्यांचे हिरवे रावे
भिजून गेले,
ओले चिंब पंख मिटून
निजून गेले!

समोर सगळं धुक धुक पसरलंय,
पायाखालची वाटसुद्धा विसरलंय!

पाखरांची चाहूल नाही:
प्रत्येकाच्या घरट्याच
दार जणू बंद आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

सांगायचं ते कळलं आहे
इतकं खोल,
इतकं खोल:
तुही अबोल
मीही अबोल!

तुझं माझं असणं हीच भाषा आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

भरून आल्या मौनाला
मातीचा ओला ओला गंध आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...

हातात हात गुंफून
असं चालताना,
अबोलपणात
अपर असं होताना,
नाच रे मोरा,
नाच रे मोरा,
शब्द आज विसरून गेलेत आपला तोरा!

मी आज
तुझ्यावरच्या कवितेचा
हळुवार छंद आहे!
हवा अशी उदास उदास कुंद आहे;
पहा ना,तरीसुद्धा मन कसं धुंद आहे...











श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा
उलगडला झाडांतून अवचित, हिरवा मोरपिसारा

जागुनि ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे, आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले, नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले, ते स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती, थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत, आला गंधित वारा

पाचूंच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबांचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा















भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राजा वदला, "मला समजली शब्दावाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा"
कां राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी?
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तार
"उद्या पहाटे दुसर्या वाटा, दुज्या गावचा वारा"
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

तिला विचारी राजा, "कां हे जीव असे जोडावे?
कां दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

कां राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना?
वार्यावरती विरून गेली एक उदास विराणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी









भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची ॥ध्रु॥

कुठे दीवा नव्हता, गगनी एकही ना तारा
आंधळ्या तमातुन वाहे , आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भीतीच्या वीषाची ॥१॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

क्षुद्र लौकीकची खोटी झुगारुन नीती
नांव्गांव टाकुन आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची ॥२॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

केस चींब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्याची कीती फुले झाली
श्वासांनी लीहीली गाथा प्रीतीच्या रसाची ॥३॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची.....

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नांतच स्वप्न दीसावें तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची ॥४॥
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची

भेट तुझी माझी स्मरते, अजुन त्या दीसाची
धुंद वादळाची होती, रात्र पावसाची











 जन्म
मी न घेतले, तरि मिळाले
कधीच मी जे घेऊ नये.
तुही दिल्याविण दिलेस सारे
कधी कुणी जे देऊ नये.

पिचलेल्या जन्मातुन रुजले
विजभारले सुर नवे.
ऐकण्यात जे व्यथेत मिटले
लोचन राधेचेच हवे.

श्याम घनांची उतट अनावर
कासाविस बरसात अशी.
काळोखाच्या यमुनेकाठी
धडधडणारी हवी पिशी.

मलाच नकळत माझे डोळे
यमुनेतुन वाहत जाती.
अंधपणातच चाचपतो मी
फुटल्या जन्माची माती.

दान तुझे हे घेण्यासाठी
फुटल्यावाचुन हात कुठे???
या भरलेल्या रित्या ओंजळीत
हिरवा हिरवा जन्म फुटे.







 मनातल्या गाण्यावर
पानांतून वाजे वारा
जसे ओळखीचे  पाय
ऊन उभे अंगणात
जशी बांधलेली गाय

हवेचिया डहाळीला
फुटे पाकळीचा झुला
फुलपाखराने तसा
झोका कोवळा घेतला

रेघ रेखित पांढरी
उडे पक्षी पाण्यावर
झुके किरणांची फांदी
मनातल्या गाण्यावर.....

: मंगेश पाडगावकर







रात्र अंधारी किती?

संपता संपेचना ही रात्र अंधारी किती?
एक शोधाया कवडसा, रोज बेजारी केती?

पांगळा ठेचाळतो मी, मार्ग क्रमिता जीवनी?
धष्टपुष्टांना सजवली, खास अंबारी किती?

वस्त्र माझ्या आवडीचे, हुंदक्यांनी बेतले
रंग पक्का वेदनांचा, पोत जरतारी किती?

आठवेना जन्मलो मी, तारखेला कोणत्या
श्वान सजले वाढदिवशी, जश्न शेजारी किती?

पुण्य का धास्तावलेले, वळचणीला बैसले?
पापियांची चाल झाली आज सरदारी किती?

चावडीवर का न यावे, सांगण्या अन्याय तू?
व्यर्थ डोळेझाक करती, मूक गांधारी किती?

धाड भुंग्याची बघोनी भ्यायली कोमल फुले
गंधकोषा राखण्या घेऊ खबर्दारी किती?

शोषितांच्या फायद्यास्तव, योजना बनल्या तरी
अल्प पदरी दुर्बलांच्या, खर्च सरकारी किती?

"वाव द्यावा नवपिढीला", वृध्द नेते सांगती
"वारसांना द्याच संधी" ही तरफदारी किती?

आमदारांना विचारा, आज मतदाना अधी
मांडले तू प्रश्न अमुचे, राज दरबारी किती?

कोण येइल चार गजला ऐकण्या "निशिकात"च्या?
पण तमाशाच्या दिशेने सांग रहदारी किती?

निशिकांत देशपांडे

ऐक जरा तू

खडतर जगती मना बंद कर स्वप्ने बघणे ऐक जरा तू
पाय धरेवर जरा टिकूदे थांबव उडणे  ऐक जरा तू

लगाम हाती तुझ्या असूदे जीवन सारे तुझेच वेड्या
ध्येय ठरवुनी तुलाच आहे पुढे चालणे  ऐक जरा तू

खळे संपले उडून गेले सारे पक्षी खंत कशाला?
रिवज आहे पडत्या काळी संगत नसणे  ऐक जरा तू

भुकेस कोंडा निजेस धोंडा हीच संपदा मला मिळावी
नको नको ते चंद्र, तारका, मृगजळ बघणे  ऐक जरा तू

उजेड आला असे म्हणू का तिमीर हरला असे म्हणू मी?
तुझ्याच दृष्टीनुसार ठरते ऊन चांदणे  ऐक जरा तू

जुनाट वाडा झपाटलेला नूर बदलला आज कशाने?
वसंत फुलला बघून दारी तुझे नांदणे  ऐक जरा तू

वाल्याच्या का दुष्कृत्त्यांचा हिशोब कोणी उगा करावा?
अवघड असते अपुले आपण पाप सांगणे ऐक जरा तू

तुझे आपुले पुण्यतिथीला पुसून फोटो हार घालती
प्रथाच आहे श्राध्दालाही पंगत बसणे ऐक जरा तू

मला गवसला मार्ग सांगण्या दु:ख मनीचे गजलामधुनी
"निशिकांता"ला अवघड होते आत धुमसणे ऐक जरा तू

निशिकांत देशपांडे

तुझी आठवण

शब्द सुरांची करता गुंफण
मनी उमलते तुझी आठवण

मधुमासांची आता उधळण
ग्रिष्मऋतूची सरली वणवण

दरवळणारी चाहूल येता
रोमांचित मी होतो कणकण

शुभ्र चांदणे पांघरले तू
कवेत माझ्या जणू नभांगण

तुझ्यात इतका गुंतून गेलो
श्वास तुजकडे माझा तारण

समर्पणाचा भाव एवढा
गळून गेले माझे मीपण

आठवणींची साथ शिदोरी
आयुष्याची येता उतरण

हात तुझा हातातुन सुटता
जगावयाचे सरले कारण

पैलतिराची आस लागली
भौतिकतेची करू बोळवण

"निशिकांता"च्या मनात आहे
आठवणींची तुझ्या साठवण

निशिकांत देशपांडे

हात तू हाती दिला जो

हात तू हाती दिला जो तो कधी सुटणार नाही
मी तुला जे स्वप्न दिधले ते कधी विरणार नाही

काळजी कसली उद्याची? वर्तमानी धुंद असतो
आजचा जो आज आहे, तो उद्या असणार नाही

का उगा आभूषणे अन हौस सजण्याची असावी?
फूल नकली कागदी, फुलपाखारू बसणार नाही

औट घटकेचे ग्रहणही सूर्य चंद्रा पीडिते पण
मी सदा खग्रास ग्रहणी नांदतो, कण्हणार नाही

काच पुसतो स्वच्छ करतो रोज तो कंदील मी पण
मंद ज्योतीने तयाच्या तम कधी सरणार नाही

पाहिले मृत्त्यूपथावर टोल नाके डॉक्टरांचे
काय लुटण्याची त-हा ही ! मी पुन्हा मरणार नाही

का हि-याची कीड आहे लागलेली कोळशांना?
दंश हा मोठेपणाचा या क्षणी दुखणार नाही

झिंगणे, पीणे, बहकणे नवपिढीला दोष कैसा?
लाड इतके लेकरांचे, कानही पिळणार नाही

ना कळे "निशिकांत" गाणे, फक्त श्रवणाने कधी
आवडे ठेका परंतू सम कधी कळणार नाही

निशिकांत देशपांडे

विकले मीच बाजारी मला

यारहो बेभाव विकले मीच बाजारी मला
काळजाला खूप देते काच नादारी मला

जे हवे ते ते विकाऊ आज बाजारी जरी
भावले केंव्हा न सौदे अन् खरिददारी मला

रोज त्यांचा पक्ष नवखा साधण्या स्वर्थास, अन्
लागले शिकवायला का ते वफादारी मला?

ठेवले आदर्श गांधी अन् हजारेचे फुका
भ्रष्ट झाल्यावर मिळाले स्थान दरबारी मला

खूप गर्दी, घाण सारी, मोकळ्या खुर्च्या तिथे
वाटले खाते असावे सुस्त सरकारी मला

खाजगी त्या शिकवण्या अन् गुरुजनांचे वायदे
आज द्रोणांची फिकी दिसते असरदारी मला

रँपवरती चालताना काय रुतबा रूप ते !
जीवनी ठेचा, न जमली चाल सरदारी मला

चार ओळीचेच झाले काव्य बिकिनी सारखे
फेसबुकवर आज दिसते खूप रहदारी मला

का तुझी "निशिकांत" झाली शायरी गुमसुम अशी?
जीवनी काळ्या सुचेना शेर जरतारी मला

निशिकांत देशपांडे

लागते चालावयाला
फरपटीचा काळ माझा वेळ ना सुस्तावयाला
थांबणे सोसेल तोवर लागते चालावयाला

फक्त ही सुरुवात आहे वेदनामय जीवनाची
आसवे आताच का मग लागली साचावयाला

वाटण्या आनंद जगती हास्य मी जोपासतो पण
मज हवा अंधार थोडा आसवे गाळावयाला

पाळले गोंजारले मी खूप माया लावलेली
तेच आता श्वान मजवर लागले भुंकावयाला

मारणे ठोशास ठोसा आवडे मजला तरीही
आपुल्यांचे वार असती मूक ते सोसावयाला

पुण्य मी केले किती ते नोंद ठेवी माय अंबे
मी कधी येणार नाही जोगवा मागावयाला

"मोह सोडी मानवा तू" सांगती बाबा गुरू पण
'ओम शांती"ने कमवती संपदा भोगावयाला

एक गोत्री लग्न करता मारती पत्नी पतीला
सांगती हे जी पुराणे द्या मला जाळावयाला

कोळला इतिहास प्यालो अन परिक्षा पास झालो
फक्त होत्या त्या विभूती पुस्तकी वाचावयाला

काय कलमेतून झरते भान कोठे शायराला ?
अर्थ गजलेचा मला मी लागलो समजावयाला

गोफ का "निशिकांत" विणला? गुंफली नाती किती रे !
रेशमांचे पाश आता लागले काचावयाला

निशिकांत देशपांडे

यारीत बाटलो मी

परक्याच माणसांच्या वस्तीत वाढलो मी
एकांतवास ओझे ओढीत संपलो मी

असतो म्हणे महाली झगमग प्रकाश सारा
अंधार सोबतीला, पडवीत झोपलो मी

स्वप्नातही न दिसले जे जे मला हवे ते
सोडून आस डोळे चोळीत जागलो मी

मृगजळ पुढ्यातले ते हाती कधी न आले
शोकांतिकेत पहिल्या ओळीत शोभलो मी

अश्रूस ओघळाया गालावरी न जमले
अन् कैद पापण्यांची भोगीत साचलो मी

आली घृणा मलाही माझीच एवढी की
माझ्याकडून गेला वाळीत टाकलो मी

आनंदकंद* छंदी जगण्यास बंड केले
ग्रिष्मात श्रावणाच्या हद्दीत नाचलो मी

हरवून होश जगण्या मदिरा हवी कशाला?
डोळ्यातल्या नशेच्या धुंदीत झिगलो मी

अक्षम्य चूक झाली "निशिकांत"ला उमगले
तारा उगीच जुळल्या यारीत बाटलो मी

निशिकांत देशपांडे

विचार आहे

इतिहासाला पुसून थोडे, जगावयाचा विचार आहे
पुराण पोथ्या नकोत, नवखे लिहावयाचा विचार आहे

जुनीच मोनालिसा टांगली, तेच रूप अन् हास्य तेच ते
सौंदर्याची नवीन व्याख्या, करावयाचा विचार आहे

मिळावयाला अवघड जे जे, हवे हवेसे तेच मनाला
आकाशाला कवेत माझ्या, धरावयाचा विचार आहे

देव कशाला? छनी हतोडा, धरून हाती आत्मबलाने
कोरुन भाळी नशीब अपुले, लिहावयचा विचार आहे

नाव राखण्या, मनास मुरडुन, धोपट मार्गी चालत आलो
प्रवास थोडा, पाय घसरण्या,करावयाचा विचार आहे

पुरे जाहले लब्धप्रतिष्ठित, रटाळ जगणे फिके फिकेसे
रंगबिरंगी गरिबीसंगे, जुडावयाचा विचार आहे

प्राणप्रतिष्ठा कशास करता, कुण्या मंदिरी उगाच माझी?
असेन जेथे तिथे स्वंयंभू, बनावयाचा विचार आहे

उपेक्षिताचे जीवन जगलो, आस अधूरी मिरवायाची
खांद्यावरती चारजणांच्या, फिरावयाचा विचार आहे

असली नकली नाती जपली, कुणी न उरले सायंकाळी
धागे तोडुन "निशिकांता"चा, उडावयाचा विचार आहे

निशिकांत देशपांडे

रेंगाळतो आहे

कसा हरवून जो तो तोल येथे चालतो आहे?
जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे

अता येणे कुणी नाही, अता जाणे कुठे नाही
जुन्या उकरून जखमा मी पुन्हा रक्ताळतो आहे

मना मारून जगलो पण सुळावर मज चढवताना
निरर्थक आखरी ईच्छा जगा मी सांगतो आहे

तुला यावे कसे भेटावया तू सांग ना सखये?
तुझ्या वस्तीत जो तो का असा फुत्कारतो आहे?

म्हणे देऊळ असते बांधण्या पूजा प्रभूची पण
इथे प्रत्येक भाविक तोंड का वेंगाडतो आहे?

पुन्हा आला मते मागावया झोळीसवे नेता
कसा भोळ्या प्रजेला आज तो गोंजारतो आहे !

कबूली देत आहे मी जरी तुटल्या अता तारा
तरीही चाहुलीने अंतरी झंकारतो  आहे

कधी दिसली न मार्गी पाकळ्यांची का मला पखरण?
असूदे लाख काटे चालतो ठेचाळतो आहे

कशी फाडू तिची "निशिकांत" पत्रे? श्वास गुदमरतो
मनी का आजही मजकूर तो गंधाळतो आहे?

निशिकांत देशपांडे