अण्णा जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अण्णा जोशी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आधी रचिली पंढरी

आधी रचिली पंढरी ।
मग वैकुंठ नगरी ॥१॥

जेव्हा नव्हते चराचर ।
तेव्हा होते पंढरपूर ॥२॥


जेव्हा नव्हती गोदा गंगा ।
तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥

चंद्रभागेचे तटी ।
धन्य पंढरी गोमटी ॥४॥

नासिलीया भूमंडळ ।
उरे पंढरीमंडळ ॥५॥

असे सुदर्शनावरी ।
म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥

नामा म्हणे बा श्रीहरी ।
आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥


रचना - संत नामदेव महाराज
संगीत - अण्णा जोशी
स्वर - मन्ना डे