दुःख-कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुःख-कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख आपल्याच हास्याच्या पडद्याआड लपवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

ते मनातल्या मनात पचवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

पचलं तर ठीक , नाही तर तसंच आत साठवायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

साचलंच जरी पर्वता एवढं , तर तेही सर करायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

सुख द्यायचं , सुख वाटायचं , पुढ्यात वाढलेलं दुःख तसंच स्वीकारायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

दुःख झुरत बसायचं नाहीच , झुगारायचंहि नाही , त्याच्या खोलात घुसायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

गौतम बुद्धां सारखं दुःखाचं खरं कारण शोधायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....

धुक्यातली धूसर वाटही संपतेच , फक्त पुढे चालत राहायचं असतं
पण सांगायचं नसतं कुणाला काहीही....