लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी एक कावळा....

बुद्धीला कितीही ताण दिला, तरी बालपणातल्या सर्वात पहिल्या अनुभवाची आठवण म्हंटली की, मला ते वादळ आठवतं. झाडाच्या उंच शेंड्यावर आमचं घरटं होतं. सोसाट्याच्या वार्‍यात झाडाचा शेंडा जवळ-जवळ ५ ते ७ फुट झुकत होता. घरट्यात मी एकटाच होतो. घरट्याबाहेर पण त्याच फांदीला गच्च धरून आई बसली होती. फांदीच्या प्रत्येक हेलकाव्या सरशी, आता आपण एवढ्या उंचावरून पडणार या, भितीने मी अक्षरश: कोकलत होतो. मला आई-बाबांसारखं उडता येत नव्हतं. शेजारी बसलेली आई, सारखी पंखांनी तोल सावरत होती. ती घाबरलेली नव्हती. मधे मधे काव काव करून मला धीर देत होती. पण मला, घरट्याला, सोडून कुठे जात नव्हती. बाबा कुठे बाहेर गेले होते. आईला त्यांचीही काळजी वाटत नव्हती पण या वादळात त्यांनी जवळ असावं, अगदी घरात नाही तरी निदान समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर, नजरेसमोर असावं असं तीला वाटत होतं. संघ्याकाळी मित्रांसमवेत समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर गप्पा मारत बसणं हा माझ्या बाबांचा छंदच होता. पण आज ते (आणि त्यांचे मित्रही) कुठे दिसत नव्हते. मी तर जाम घाबरलो होतो. वार्‍याने फांदी झोका खाऊ लागली की मी डोळे बंद करून घ्यायचो आणि जिवाच्या आकांताने काऽऽव काऽऽव ओरडायचो. आई हसायची आणि सांगायची,'कांही होत नाही. घरट्यातल्या तारा गच्च धरून बस. घरटं कांही पडायचं नाही.' मी तसं करत होतो पण भिती जात नव्हती. किती वेळ त्यात गेला कळलं नाही. पण, बर्‍याच वेळाने वारा मंदावला, झाडाच्या शेंड्याचे झोके घेणं थांबलं. शेंडा हळूवार हलत राहीला. भिती दूर पळाली. मजा वाटू लागली. मी हसू लागलो. आई आता उडून गेली. बहूतेक ती बाबांना शोधायला बाहेर गेली असावी. आई आणि बाबा परतले तो पर्यंत मी झोपलो होतो. त्यांच्या बोलण्याने जागा झालो. बाबांनी त्यांच्या चोचीतून आणलेल्या अळ्या मला खाऊ घातल्या आणि पायात धरलेली एक मोठी अळी आईला दिली. आईने बाबांच्या अंगावर पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण आपल्या चोचीने काढून टाकले. बाबा अळ्या छान छान आणायचे. पोपटी रंगाच्या अळ्या मला खूप खूप आवडायच्या. बाबा त्या जास्त आणायचे. पण बाबा तपकिरी रंगाच्या अळ्याही आणायचे. त्या चवीला एकदम बेकार असायच्या, मला मुळीच आवडायच्या नाहीत पण त्या खायला लागायच्या. त्याने पंखात ताकद येते असे आई सांगायची. मी कधी खायचे नाटक करून ती अळी थूंकून टाकली तर बाबा माझ्या डोक्यावर चोच मारायचे. खूप लागायचं. डोळ्यात पाणी यायचं. खाली टाकलेली अळी पुन्हा उचलून आई भरवायची.

पंखात पुरेशी ताकद आल्यानंतर एक दिवस माझ्या उडायला शिकण्याच्या काळ समीप आला. सुरुवातीला एक-एक फांदी खाली उतरत सर्वात खालच्या फांदीवर येऊन बसलो. तिथून बाबांनी पंखांची हालचाल दाखविली. मीही तशीच करून दाखवली. सकाळची प्रसन्न वेळ होती. मी खूप उत्साहात होतो. बालसुलभ वृत्तीने उगाचच काव-काव करीत होतो. नंतर बाबांनी हवेत एक भरारी मारून दाखवली. मनात उत्साह ओसंडून वाहात होता तरी धाडस होईना. मी जागच्या जागीच पंख फडफडवून काव-काव करीत राहीलो. बाबा फांदीवर माझ्या बाजूला सरकले. माझ्या पाठीवर चोच घासली. मला धीर आला. मग बाबांनी पुन्हा एक भरारी घेतली. यावेळी जरा साधी आणि छोटीशीच भरारी घेऊन माझ्या शेजारी येऊन बसले. मी प्रयत्न केला पण पाय फांदी सोडेनात. बाबांनी पाठीवर जोरात चोच मारली. मी काव-काव करीत फांदीवरून पडू लागलो. तेंव्हा तोल सावरण्यासाठी मी जोर-जोरात पंखांची हालचाल केली आणि मला आश्चर्य वाटलं मी हवेत तरंगू लागलो. थोडं पुढे जाऊन मी परत फिरलो आणि फांदी वर बाबांच्या शेजारी येऊन बसलो. बाबांनी पुन्हा पाठीवर चोच घासली. मला खूप बरं वाटलं. आई हसत होती. मला उडता येऊ लागलं. त्या दिवशी मी खूप उडलो. अगदी पंखं दुखे पर्यंत. वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळी फळं खायला मिळाली. आईने सांगितल्या प्रमाणे आमच्या झाडापासून जास्त दूर गेलो नाही. संध्याकाळी घरी परतलो तेंव्हा बाबा आईला अभिमानाने म्हणाले,' हा आता एक पूर्ण कावळा झाला. माझी चिंता मिटली.' आई हसली. तिने माझ्या पाठीवर चोच घासली. पंखांवर, मानेजवळ पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण काढून टाकले. त्या रात्री मी छाती भरून श्वास घेतला आणि समाधानाने झोपलो.

मी, आई आणि बाबा आम्ही तिघेही बाहेर पडायचो. वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, भरपूर खाऊन, पाणी वगैरे पिऊन घरी परतायचो. जर चांगले किडे, अळ्या, दाणे मिळवायचे असतील तर पहाटे जरा सूर्य उगवला की लगेच बाहेर पडावे लागे. उशीर झालाच तर अगदी उपाशी राहावे लागत नसे पण मग देवळासमोरच्या पिंपळावर बसून, येणारी जाणारी भक्त मंडळी लाह्या टाकत त्या खाव्या लागत. आई-बाबा भल्या पहाटे बाहेर पडत. पण आई लवकर परते. घरट्यातली घाण बाहेर फेकणं, सगळ्या तारा ओढून-ओढून विस्कटणारं घरटं पुन्हा घट्ट करणं, तारा कमी झाल्या असतील (कधी-कधी माझ्या धसमुसळेपणाने कांही तारा सुटून खाली पडायच्या) बाबांच्या मागे लागून त्यांना नवीन तारा आणायला लावणं, त्यांनी आणलेल्या तारा घरट्यात नीट बसवणं अशी तीची कामं चालायची. बाबा कधी-कधी रंगीत चिंध्याही आणायचे. आईला ते आवडायचं नाही. ती त्या चिंध्या घरट्या बाहेर फेकून द्यायची. कधी बाबांनी त्या टाकून दिलेल्या चिंध्या पुन्हा उचलून आणल्या तर नाईलाजाने घरट्यात ठेवायची. २-४ दिवसांनी बाबांच मन भरलं की तेच त्या चिंध्या उचलून बाहेर फेकून द्यायचे. पुन्हा कुठे नविन चिंधी मिळाली आणायचे उचलून.

घरट्यापासून दूर-दूर गेल्यावर घराकडे परतायची आमची एक युक्ती होती. आम्ही शहरात राहात होतो. प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे वास आम्हाला पाठ होते. त्या-त्या वासांचा मागोवा घेत आम्ही घरट्याकडे परतायचो. प्रत्येक गल्ली-बोळातून, घरांमधून, उकिरड्यावरुन, बेकरी, कसायांची दुकाने, फरसाणची दुकाने, देवळे, झोपडपट्या, गटारे, समुद्र, कोळीवस्ती इथून ठरावीक वास येत. थोड्या फार सरावने या सर्व वासांचा एक 'नकाशा' मेंदूत तयार होतो आणि मग अंधारातही आपलं घरटं कुठे आहे हे ओळखता येतं. माझ्या मित्राने ही ट्रिक मला शिकवली.

आमच्या घरट्यासमोर एक उंच इमारत आहे. त्याच्या ४थ्या मजल्यावर एक छोटी चिमुरडी राहायची. रोज सकाळी ती बाल्कनीत येऊन, आमच्या घरट्याकडे पाहून, कांही तरी खाऊ मला दाखवायची. मी त्या बाल्कनीत जाऊन तो खावा अशी तीची ईच्छा असायची. पण आईने सांगितलं होतं, माणसं लहान असू देत नाहीतर मोठी, त्यांच्या जवळ जायच नाही. मी तिच्याकडे बघून काव - काव करायचो, बाल्कनीच्या बाजूच्या खिडकीवर बसायचो पण बाल्कनीत गेलो नाही. एकदा तिच्या आईने तिला कांही तरी सांगितलं. तसं, बाल्कनीच्या कठड्यावर खाऊ ठेवून ती खोलीत गेली आणि आतून पाहू लागली. मी थोडावेळ वाट पाहीली आणि ती येत नाही असे पाहून झट्कन एक भरारी घेऊन गॅलरीत सावध विसावलो आणि ती बाहेर यायच्या आंत तो खाऊ उचलून आणला. तो केकचा तुकडा होता. मी फांदीवर बसून तो खाऊ लागलो. तीला खूप आनंद झाला. तीने टाळ्या वाजवून आईला दाखवले. आई नुसतीच हसली. तिला विशेष आनंद झालेला दिसला नाही.

पुढे कित्येक वर्ष तो आमचा एक खेळच होता. मला खाऊ दिल्याशिवाय ती कधीच शाळेत गेली नाही आणि तिने दिलेला खाऊ खाल्याशिवाय माझाही दिवस गोड व्हायचा नाही. मी मित्रांबरोबर उडायला जायचो. दूर एका ठीकाणी इलेक्ट्रीकच्या तारांवर आमची शाळा भरायची. आम्ही २५-३० तरूण कावळे होतो. तिथे आम्ही वेगवेगळे सूर मारणे, अर्ध्यातून झट्कन दिशा बदलून उडणे, अगदी जमीनी पर्यंत खाली सूर मारून जमीनीवर न उतरता समोरच्या उंच इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर बसणे, चोच दोन्ही बाजूनीं कठड्यावर घासून तिला धार लावणे, असे खेळ खेळायचो. कधी कंटाळा आला तर शहरातच असलेल्या झोपडपट्टीवर घिरट्या घालायचो. तिथे उकिरड्यावर छान-छान गोष्टी खायला मिळायच्या. तिथेच डुकरांची छोटी छोटी पिल्ले आपली दोरी सारखी शेपटी हलवत चरत असायची. त्यांच्या पाठीवर चोच मारली की ती व्रँक व्रँक असे ओरडायची. मजा यायची. एखादे मोठे डुक्कर किंवा कुत्रा आला तर आम्ही उडून जायचो.

अशी अनेक वर्ष गेली. ती समोरच्या इमारतीतली चवथ्या मजल्यावरची चिमुरडी आता चिमुरडी राहीली नव्हती. मोठी झाली होती. आता ती केक, बिस्किटं खायची नाही. पोळी-भाजी खायची. पोळीचे तुकडे गॅलरीच्या रेलींगवर ठेवायची. मी उचलून आणायचो. कधी कधी तिथेच बसून खायचो. मला केकची आठवण यायची. मला केक खूप आवडायचा. तसं बेकरीच्या मागे उकिरड्यावर कधी-कधी केकचे तुकडे मिळायचे, पण तिने खास माझ्या साठी ठेवलेल्या केकच्या तुकड्यांची चव त्याला नसायची. शिवाय उकिरड्यावर गाई, म्हशी, बकर्‍या हे शींगवाले प्राणी यायचे त्यांची भिती वाटायची. त्यावरून एक गंमत आठवली. आम्ही म्हशींच्या पाठीवर, त्यांचे शींग किंवा शेपटी पोहोचणार नाही अशा जागेवर, बसायचो. १०-१० मिनिटं आरामात त्यांच्या पाठीवर बसून कांही कष्ट न करता दूर-दूर जायचो. कंटाळा आला की म्हशीच्या पाठीवर हलकेच चोच मारायची की ती कातडी थरथरवायची, मजा यायची. असे एक दोन वेळा करून उडून जायचे. हा एक छंदच होता. फक्त कांही ठीकाणच्या मुलांना सांभाळायला लागायचं. ती मुलं दगड घेऊन नेमबाजी खेळायची. त्यांचा नेमही चांगला होता. एकदा मला एक दगड पाठीत बसला. दोन दिवस पाठ दुखत होती.  आईने पिवळ्या अळ्या खायला सांगितल्या. सांडपाण्याच्या डबक्याशेजारी उगवणार्‍या झुडपांच्या पिवळ्या फुलांमधे त्या सापडायच्या. दोन दिवसात पाठ बरी झाली.

मनुष्यप्राण्यांमध्ये आम्हा कावळ्यांसंबंधी कांही गैरसमज आहेत. त्यांना वाटतं आम्हा सर्वांनाच पाहूणे येणार असतील तर आधी कळतं आणि मग आंम्ही काव-काव करून त्यांना तसे कळवतो. पण प्रत्यक्षात आमच्यातल्या फक्त ठरावीक कावळ्यांनाच, त्यांना डोमकावळा म्हणतात, हे समजतं आणि ते त्या-त्या घराच्या खिडकीत बसून काव-काव करतात. तसेच, स्मशानात, नदीकाठी मृतात्म्यांचे पिंड खाणारे कावळेही वेगळे असतात. ते जरा राखाडी रंगाचे असतात. आमच्या सारखे गडद काळ्या रंगावर पोटाकडे पांढरट पिसं असणारे नसतात. मृतात्म्यांचे पिंड खाणं आमच्यात कमीपणाचे मानले जाते. किडे, मुंग्या, अळ्या, मेलेली जनावरे (ती पण दोन दिवसांपेक्षा जास्त जुनी नाही) आणि मनुष्यप्राणी खाईल ते सर्व, आम्ही खातो.

झाडावरचं आमचं घरटं माझ्या वडीलांनी बांधलं होतं. तसं आमचं घरटं इमारतीच्या मागच्या बाजूला एका झाडावर इतरांसमवेत होतं परंतु एकदा बाबांचं आणि त्या झाडावर राहाणार्‍या एका दाणग़ट डोमकावळ्याचं कडाक्याचं भांडण झालं. भयंकर चोचा-चोची झाली. मग इतर कावळे मधे पडून भांडण सोडवलं. हे नेहमीच होत राहाणार हे जाणून वडीलांनी इमारतीच्या पुढच्या बाजूस या झाडावर घरटं बांधलं. हे झाड जरा लवचीक आहे. वारा सुटला की इतर झाडांपेक्षा जास्त हेलकावे खातं. म्हणजे घरटं बांधून राहायला अयोग्यच म्हणायला पाहीजे. पण बाबांना झाडांचं ज्ञान चांगलं आहे. ते आईला म्हणाले, 'झाड कितीही हेलकावलं तरी मोडणार नाही. चिवट आहे.' त्यांना झाडाच्या शेंड्यावरची कोवळी पाने चावून कळत असे. ही कला खूप कावळ्यांकडे असते. बाबांनी मलाही ही कला थोडीफार शिकवली आहे. इमारतीच्या पुढे राहावयास आल्याने एक फायदा झाला. चवथ्या मजल्यावरच्या 'त्या' चिमुरडीशी मैत्री झाली.

आता ती खूपच मोठी झाली होती. हल्ली स्कूटरवर बसून कॉलेजात जाऊ लागली होती. अभ्यासामुळे की काय कोण जाणे जास्त दिसायची नाही. कधीतरी रविवारी (त्या दिवशी कॉलनीत इडलीवाला
सायकलवर बसून येतो) बाल्कनीत दिसायची. कधी पोळी (सकाळी लवकर असेल तर) नाहीतर जेवणाच्या वेळी कधी पित्झाचा नाही तर बर्गरचा तुकडा द्यायची. पण केक नाही. कसं सांगू तिला मला केक दे म्हणून?    

त्या दिवशी फार भयंकर घटना घडली. कॉलनीतल्या मुलांच्यापैकी कोणाचा तरी मित्र छर्‍याची बंदूक घेऊन आला होता. बाबा समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर त्यांच्या मित्रांसमवेत बसले होते. त्या माणसाने झाडलेल्या बंदूकीतली गोळी बाबांच्या छातीतून आरपार गेली. बाबा खाली कोसळले. कॉलनीतली सगळी मुलं भोवती जमा झाली. झाडांवर, इमारतीच्या गच्चीवर, इलेक्ट्रीकच्या तारांवर सगळीकडून कावळे जमा झाले. सर्वच जणं काव-काव करत होते. मुलांना नंतर वाईट वाटले. त्यांनी त्या बंदूक वाल्याला घालवून दिलं. कोणी बाबांच्या चोचीत पाणी घालायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी कॉलनीच्या बागेतच एका कोपर्‍यात खड्डा खणून बाबांना त्यात पुरलं. वर एक आंब्याचे झाड लावून त्यावर माती लोटली. माळ्याने झारीने पाणी ओतलं, मग सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. मी आणि आई तिथेच उभ्या एका ट्रकच्या टपावर बसून हे सर्व पाहात होतो. त्यादिवशी रात्री आई पंखात चोच खूपसून रात्रभर रडत होती. मी आईच्या पाठीवरून चोच फिरवून तिचं सांत्वन करत राहीलो.

या सर्व घटनाक्रमात कॉलनीतल्या बहूतेक गॅलर्‍यांमधून माणसं खाली चाललेला प्रकार दु:खी अंत:करणाने पाहात होते. चवथ्या मजल्याच्या गॅलरीतून 'ती', तिची आई आणि तिचे बाबा पाहत होते. दुसर्‍या दिवशी माझी आई कुठे बाहेर पडली नाही. 'ती'ने गॅलरीत पोळीचे खूप तुकडे ठेवले होते. त्यातील कांही मी आईला आणून दिले. काही मी खाल्ले. बंदूकवाले, बेचकीवाली मुलं, नेमबाजी करणारी मुलं यांच्या पासून दूर राहा, त्यांचा खेळ होतो पण आपल्यासारख्या दुर्बलांचा जीव जातो, असं आईने पुन्हा एकदा मला बजावलं. आमचा दिनक्रम पुर्ववत होण्यास बराच वेळ लागला. पण नाईलाज होता. या काळात 'ती'च्या आईने रोज गॅलरीच्या कठड्यावर पोळीचे तुकडे ठेवले. आमच्या दोघांचेही जेवण व्हायचे. हळूहळू आई सकाळचे  किडे, दुकानाबाहेर टाकलेले जोंधळे, टिपायला जाऊ लागली. मी माझ्या मित्रांसमवेत दूरदूर उडायला जाऊ लागलो. उन्हाळ्यात हल्ली ठराविक घरांसमोरच वाळवणं दिसतात. राखणदारी करायला बसलेल्या लहान मुलाची किंवा मुलीची नजर चुकवून पापड पळवणं कांही कठीण जायचं नाही. कधी चांगल्यापैकी कडधान्यही मिळायची. रस्त्यात मरून पडलेले उंदीर, घुशी तर मिळतच परंतु ह्या झुडपातून त्या झुडपात पळताना मिळणारे जीवंत उंदीर पकडणे या सारखा मजेचा खेळ नाही. कधी-कधी माणसं त्यांनी घरात पिंजर्‍यात पकडलेले उंदीर उकिरड्यावर आणून टाकीत तेही कुठे लपण्याआधी पकडण्यासाठी टपून बसावे लागे.

एक दिवस 'ती' स्वत:च्या स्कूटरवरून नाही तर दूसर्‍या कुणा तरूणाच्या कार मधून घरी आली. कोण होता तो? रुबाबदार होता. बराच वेळ त्यांच्या घरी बसला होता. पुन्हा दोघेही बरोबरच बाहेर पडले. बाल्कनीतून तीच्या आईने आणि बाबांनी हात हलवून हसत हसत टाटा केला. ती त्याच्या गाडीत बसून कुठेतरी बाहेर गेली. मी गाडीच्या वरून थोडे अंतर उडत उडत गेलो. कॉलनी मागे पडल्यावर त्याने तीच्या खांद्यावरून हात टाकून तीला जवळ घेतलं, मी परत फिरलो. ती एवढी मोठी झाल्याचे मला कधी जाणवलेच नाही. विचार केला, मोठी कशी होणार नाही, ती काय 'चिमुरडीच' राहाणार आहे? मी सुद्धा मोठा झालोच होतो. माझंही एक गुपित होतच की. हल्ली मित्रांना तीन-तीन, चार-चार दिवस भेटायचो नाही. देवळासमोरच्या पिंपळावरच्या एका कावळीशी माझी मैत्री झाली होती. आम्ही दोघेच दूर-दूर उडायला एकत्र जायचो. डोंगरावर, कडेकपार्‍यात गप्पा मारत बसायचो. अंधार पडायच्या सुमारास परतायचो. आईलाही ती कावळी आवडली होती. शेवटी एके दिवशी ती आमच्या घरट्यात राहायला आली.

हल्ली केकचा तुकडा राहो दूर, पोळीचा तुकडाही मिळायचा नाही. 'ती' लग्न होऊन सासरी गेली आणि माझा पोळीच्या तुकड्यांचा रतिब तुटला. सुरुवातीला 'ती'ची आई खुप दु:खात होती. 'ती'च्या फोटोंचा अल्बम घेवून रडत बसायची. आम्ही दोघांनी ग़ॅलरीत बसून वाकून त्यांच्या घरात हे दृष्य अनेक वेळा पाहीलं होतं. वडील उघड उघड रडायचे नाहीत पण रात्री उशीरा पर्यंत गॅलरीत सिगरेट ओढत बसायचे. हिने कित्येक वेळा मला झोपेतून जागं करून दाखवलं होतं.
पुढे हळूहळू त्यांच दु:ख कमी झाल्या नंतर तीची आई पोळीचे तुकडे गॅलरीत ठेवू लागली. पण हल्ली माझं मन व्हायचं नाही ते तुकडे आणायला. त्या घरात 'ती' माझी जीवाभावाची मैत्रीण नव्हती. जिला मी ती 'चिमुरडी' असल्या पासून पाहीलं होतं. जिने स्वत:हून, प्रेमाने मला केकचा तुकडा दिला होता. मी तो खाल्यावर आनंदाने टाळ्या पिटल्या होत्या. आम्हा कावळ्यांना एवढे प्रेम कोण देतो? सगळे आम्हाला 'काळा' म्हणून हिणवतात, आमच्या आवाजाला 'कर्कश्य' म्हणतात. पिंडाला शिवणारा अशी सरसकट सर्वच कावळ्यांची संभावना करून फक्त अंत्यविधीला लागणारा म्हणून 'अशुभ' मानतात. पाहुणे येण्याची सूचना देणार्‍या कावळ्यांनाही देवदूत मानायचे सोडून 'काय करायचे आहेत पाहुणे या महागाईच्या काळात' असे म्हणून हातातली वस्तू फेकून मारून हाकलून त्यांचा अपमान करतात. अशा वस्तूस्थितीत 'ती' प्रेमाने पोळीचा तुकडा खाऊ घालायची.

आता 'ती' सासरी जाउनही बरेच महीने उलटून गेले होते. एक दिवस त्यांची गाडी कॉलनीत आली. गाडीतून तिचे आई-बाबा, नवरा आणि 'ती' खाली उतरले. 'ती' गाडीचा आधार घेऊन सावकाश उतरली. तीच्या आईच्या हातात 'ती'चं बाळ होतं. मी काव-काव करून जोरात हाक मारली. तीने चालता चालता सावकाश वळून माझ्या घरट्याकडे बघितलं. हसली. माझ्याकडे बोट दाखवून नवर्‍याला कांही तरी सांगितलं. त्याने हसून माझ्याकडे पाहीलं. माझी छाती अभिमानाने फुलून आली. ही कौतुकाने माझ्याकडे पाहात होती. आईने माझ्या पाठीवर आपली म्हातारी चोच घासली. तिच्या डोळ्यात पाणी आलं.

तिच्या घराच्या खिडकीवर जाऊन बसणं. आंत डोकाऊन पाहणं. तिच्या बाळाची आंघोळ, दुध पिणं, रडणं, झोपणं सर्व पाहाताना मला 'ती'चं कौतुक वाटायचं. पोळ्यांचा रतिब परत सुरु झाला होता. मी आनंदाने तुकडे गोळा करून आणायचो. ती असे पर्यंत हे चालत राहीलं. आता तीने स्वत:च केक खाणं बहुधा सोडून दिलं होतं. मी पोळ्यांच्या तुकड्यांवर समाधान मानत होतो.

त्यानंतर ३-४ वेळा ती राहायला आली होती. तीची मुलगी आता मोठी झाली होती. माझी पिल्लही मोठी होत होती. लवकरच त्यांना उडायला शिकवयचा दिवस जवळ येणार होता. 'ती' तीच्या मुलीला हात धरून चालायला शिकवत होती. आता मला 'ती'ची भिती वाटत नव्हती. 'ती' तीच्या मुलीला घेऊन बाल्कनीत यायची तेंव्हा कठड्यावर त्यांच्या पासून फक्त दोन हात दूर मी बसायचो. काव-काव करायचो. आज 'ती'ने बशीत कांही तरी खाऊ ठेवून मला हाक मारल्यावर मी लगेच गेलो. 'ती'च्या मुलीच्या हातात कांही तरी खाऊ होता. तोंड सगळं बरबटलं होतं. मी वास लगेच ओळखला. छाती भरून श्वास घेतला, बशीमधे माझ्यासाठी ........केकचा तुकडा होता.


- प्रभाकर पेठकर
सौ. -मनोगत

जग बदलतय

"तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय...
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...
वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"...
दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...
घरची भाकरं आता कशी आवडणार हो... ५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झालीये....

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत,त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं
आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं
आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं
आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं
कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे"क्वारनटाईन" बटण असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते
बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो
आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत , पोचवणारा बाप एक संत असतो
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं
बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं
कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आई गं SSS” असतं
आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बाप रे बाप" असतं
परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं
म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं
आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

ती फ़क्त आईच..!

सकाळी दोन धपाटे घालुन उठवते..ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते..ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच.

... म्हणजे प्रेम!

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडेही न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का असे विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असला तरी दिवाळी भाऊबीजेला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... म्हणजे प्रेम!

गरीब,मध्यमवर्गीय आणि श्रीमंत

गरीब माणुस दारु पितो,

मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर

श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!



काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,

काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर

काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!



गरीब माणुस करतो ते लफडं,

मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर

श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!

"ड्राय डे" ,"पुतळे" व "आचारसंहिता"

विद्यार्थी : सर ड्राय डे म्हणजे काय?

मास्तर : कोरडे दिवस.

विद्यार्थी : विस्कटून विस्कटून सांगा सर.

मास्तर : या दिवशी दारूची दुकाने बंद असतात.

विद्यार्थी : का सर?

मास्तर : अरे आपल्याला महापुरुषांची आठवण व्हावी असा शासनाचा यामागचा उद्देश आहे.

विद्यार्थी : मग सर एकतीस डिसेंबरला विशेष परवाने देऊन सरकार उत्तेजन का देतं?

मास्तर : लोकांनी नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करावं म्हणून.

विद्यार्थी : म्हणजे आनंदासाठी पिण्यास हरकत नाही असंच ना?

मास्तर : हो तसंच.

विद्यार्थी : मग सर, स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी जनतेला दु:ख होत असतं का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : दु:खामुळे ड्राय डे असतो का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : बोला ना सर.

मास्तर : हा तुझा विषय नाही. तू पीत नाहीस ना? मग गप्प बस.

विद्यार्थी : पण सर, तीस जानेवारीला दु:खामुळे तर दोन ऑक्टोबरला आनंदामुळे ड्राय डे, असं असतं का?

मास्तर : तसं नाही बाबा. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांची आठवण राहावी म्हणून ड्राय डे असतो.

विद्यार्थी : सर, ड्राय डेच्या दिवशी महापुरुषांची आठवण येते हे भन्नाट आहे. पण अगोदर सवय लागली पाहिजे. ना?

मास्तर : तोच तर सरकारचा उद्देश आहे.

विद्यार्थी : म्हणजे... जाणून बुजून शासनाने लोकांना दारूबाज केले.

ड्राय डेमुळे तर कळले, महात्मा गांधी आज गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

पुतळे

विद्यार्थी : सर देव जळी-स्थळी-पाषाणी आहे ना?

मास्तर : हो.

विद्यार्थी : मग सर दारूची दुकानं मंदिरापासून पंचाहत्तर मीटर दूर का ठेवतात?

विद्यार्थी : देवाला पंचाहत्तर मीटर पलीकडचं दिसत नाही का?

मास्तर : तसं नाही रे बाळा. मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे.

विद्यार्थी : पण काही देवांना दारूचा नैवेद्य लागतो.

मास्तर : तुझं सामान्य ज्ञान बरंच बरं दिसतंय.

विद्यार्थी : देवाचं सोडा, पण राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासमोरही वाईन शॉपला बंदी आहे.

मास्तर : हो. बरोबरच आहे ते.

विद्यार्थी : पण सर एखादा राष्ट्रपुरुष पिणारा असेल तर?

विद्यार्थी : सांगा ना सर, वाईन शॉप बंद केल्यास त्या पुतळ्यास काय वाटेल?

मास्तर : राष्ट्रपुरुष तसे नसतात रे.

विद्यार्थी : सर, आजकालचे बहुतेक आमदार-खासदार तर घेणारेच आहेत. ह्यांच्यापैकीच काहीजण उद्याचे राष्ट्रपुरुष असणार. त्यांचे पुतळे होणार. समोर वाईन शॉप नसेल तर त्या पुतळ्यांना काय वाटेल सर?

विद्यार्थी : बोला ना सर...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

आचारसंहिता

विद्यार्थी : सर आचारसंहिता म्हंजी काय?

मास्तर : अरे, निवडणुकीत पाळायचा आचार-विचार.

विद्यार्थी : तसं नाही, विस्कटून विस्कटून सांगा.

मास्तर : अरे बाबा, मतदारांना उमेदवाराने किंवा पक्षाने प्रलोभने दाखवू नयेत यासाठी काही नियम केलेले असतात.

विद्यार्थी : पण सर, पुतळ्यांना-फोटोंना का झाकलं जातं?

मास्तर : गांधी, नेहरू, फुले, आंबेडकर यांच्या चित्रांचा वापर करू नये म्हणून.

विद्यार्थी : पण सर, मतदानाच्या ठिकाणी महापुरुषांची चित्रंसुद्धा झाकली जातात.

मास्तर : हो, त्यांचा परिणाम होऊ नये म्हणून.

विद्यार्थी : सर, महापुरुषांचा वाईट परिणाम होतो?

विद्यार्थी : बोला ना सर, महापुरुष का झाकतात?

विद्यार्थी : सर हत्ती झाकले, कमळ झाकलं, पण हाताचं काय करणार?

विद्यार्थी : सर एक आयडिया. उमेदवाराला सत्यनारायण घालायला सांगा. मतदार आपोआप घरी येतील.

मास्तर : हुशार आहेस!

विद्यार्थी : आणखी एक आयडिया सर...

मास्तर : बोल बाळा.

विद्यार्थी : मतदाराने स्वत:चेच तळहात पाहिले तर त्याचा त्याच्या मनावर परिणाम होईल आणि तो काँग्रेसला मत देईल. त्यामुळे प्रत्येक मतदाराला हातमोजे दिले तर?..

ह्या पोराला 'वाह्यात म्हणावं की विचारवंत' हे गुरुजींना कळेना. तरी नवीन शैक्षणिक धोरणानुसार उत्तर देणं भाग होतं. 'मतदारांना हातमोजे वाटण्याची विनंती आयुक्तांना करू', असं पुटपुटत गुरुजींनी चष्म्याची काच पुसली. पुटपुटत पुटपुटत आपण वाईन शॉपजवळ कधी आलो, ते त्यांचं त्यांना कळलंच नाही.

ड्राय डेमुळेच 'पूर्वनियोजित साठा' करण्याची सवय महाराष्ट्रात वाढू लागली होती. गुरुजींनाही रात्री 'टीचर्स'ची संगत जडली होती. सहाव्या वेतनामुळे मुलेही गुरुजींना गुरुजी न म्हणता 'सर' म्हणू लागली होती. सहाव्या वेतनाचा मान राखण्यासाठीच गुरुजींनी 'देशी'पण सोडलं होतं. ते दिवसाचे 'सर' आणि रात्री 'टीचर्स'झाले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या आनंदासाठी एक, तीस जानेवारीच्या पुण्यतिथीच्या दु:खासाठी एक आणि निवडणुकीच्या गोंधळासाठी एक असा पूर्वनियोजित साठा घेऊन गुरुजी घराकडे वळले.

हरवलेल्या संवेदना...

पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

संध्या गावित...

२०७०- एपीजे अब्दुल कलाम

२०७० मध्ये लिहिलेलं एक पत्र

मी नुकतच ५० पूर्ण केलय भासतो मात्र ८५ चा मला किडनीचा त्रास आहे पाणी कमी पिण्यामुळे वेळ नाही जास्त आता माझ्यापाशी जगण्याचा मी ५० पूर्ण केलय सर्वात वयस्क व्यक्ती मी या समाजाचा...

लहानपणी माझ्या परिस्थिती वेगळी होती हिरवळ होती पाऊस होता भिजण्यातली मजा होती आज सारं मी फक्त स्मरतो कृत्रीम तेलाच्या टोवेल नेअंग साफ करतो...

लहानपणी आयाबायांचे सुंदर लांब केस असत..कार धुण्यासाठी घरीपाण्याचे पाईप असतआता केसच नाही कुणाला पाणीच नाही कुठे वापरायला पोराच्या डोळ्यात ऐकून काळ जुनाजागा आहे फक्त मोठ्या आश्चर्याला..

आठवतं मला आज "पाणी वाचवा"चे फलक असायचेत लोक मात्र फलक म्हणून फक्त वाचायचेत आता नद्या तलाव सारं काही सुकलं आहे उरलं सुरलं असेल काही दुषित होऊन बसलं आहे..

उद्योग धंदे संपले आहेत वाढलीय बेरोजगारी खा-या पाण्याला पिण्याजोगं करण्याचीच सारी तयारी तोच एक उद्योग आहे कामगार आहेत "पाणी" पगारी

पाण्यासाठी सगळी कडेदंगे सतत सुरू आहेत आजचे दिवस खरच खूप वेगळे आहेत "दिवसाला ८ पेले" आधी पाणी आवश्यक असे आज फक्त अर्धा पेला माझ्यासाठी उरला आहे...

कसा दिसतोय माणूस आज? सुकलेला, सुरकुतलेला अल्ट्रा व्हॉयलेट किरणांनीपुरता पोळलेला त्वचा क्षय, मुत्रपिंडाचे आजारमृत्युच्या कारणांने ग्रासलेला...

पाण्याच्या अभावी विशिचा तरुण चाळिसीचा दिसतो कळलय न कारण "पाण्याचा अभाव" पण उपाय काहीच आमच्याजवळ नसतो..पाण्याचं उत्पादन अशक्य झाडे नाही.. हवा दुषित पुढची पिढी अशीच असणार रापलेली, पोळलेली, त्रासित

आज श्वास घेण्यासाठी हवा विकत घेतो आम्ही "१३७ मी क्युब" हवा विकत घेतो आम्ही जे घेऊ शकत नाही कृत्रीम फुफ्फुसांबाहेर फेकल्या जातात दुषित हवा घेत बिचारे मरेस्तोवर जगत जातात

जिथे कुठे असेल पाणी कडेकोट जपल्या जाते पाउस पडलाच कधीतर आम्लवृष्टी होते विसाव्या शतकाचा निष्काळजीपणा भोगतोय बजावलं होतं वाचवा पाणी? फळ आता आम्ही साहतोय

माझ्या बालपण ऐकताना मुलगा माझा विचारतो "कुठेय हो पाणी आता"? मी फक्त आवंढा गिळतो...दुखी होण्याव्यतिरिक्त मी काही करू शकत नाहीमी देखिल कारणीभूत या सगळ्याला मी ही त्याच पिढीचा अंश असतो

आता माझीच मुलं बाळं माझी चुक भोगताहेत फार फार मोठी किमंत माझ्या चुकिची देताहेत अशीच भोगत राहतील कारण मागे जाणं शक्य नाहीपुढे पृथ्वीवर जगणं ही शक्य नाही

कसं तरी करून मला मागे जायलाच हवं माझ्या पुर्वजांना मला मला कळकळीनं सांगायला हवं"वाचवा हो पाणी, अहो वाचवायला हवं" अजून वेळ गेली नाही त्यांनी समजायला हवं

मूळ पत्र... एपीजे अब्दुल कलाम

माणसाचे चार मित्र

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाडप्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....
तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभागअसतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो,""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हामाझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडेयेते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्यासंपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्तझालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

❂❂❂ शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार ❂❂❂



▶मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

▶इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."

▶मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

▶प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

▶ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

▶एन्टोनियो (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

▶मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

▶डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.

-दर्शाना मंचेकर
manchekardarshana@gmail.com

शेवटचा क्षण

हिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणातकोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुलाअसे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही".........

आई

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते..

उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण
घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने
बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी
मजुरीचे पैसे आणले..

तितक्यात मुलगा शाळेतून
आला आई ला म्हणाला मला जेवायला दे
मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे
सकाळी लवकर उठेन..

मुलगा सकाळी लवकर
उठला त्या माऊलीला पण उठवले,
मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई
लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून
घेतो
माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते..

मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई
ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे
मला उशीर होतोय
आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच
सापडत नव्हते..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई
लवकर कर माउलीने विचार न करता तसाच
दुधाचा टोप हाताने उतरवला गरम
दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ
लागल्या हाताची लाही लाही झाली..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न
उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून
दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले..

त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून
त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली..

आईने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले,
मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने
विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले..

मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या मग आईने
विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस
काही खाल्लेस कि नाही..

त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर
मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने
डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून
आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात
त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले
आई धन्य झाली..

आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर
इजा करून गेली..........

देशी दारुचे दुकान आणि आध्यात्मिक साक्षात्कार

कुतुहल हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. कुतुहलच्या वाटेला गेलं की होत्याचं नव्हतं होतं आणि नव्हत्याचं.....
नव्हत्याचं... मुळीच नव्हतं होतं.
ह्या कुतुहलाच्या नादात माणसाला पार बरबाद होताना पाहिलय. आजपर्यंत ह्या कुतुहलापायी मी कित्येकदा मार खाता खाता राहिलोय..... (........आणि कित्येकदा खाल्लायही !!)
लहानपणी ट्रॅफीक पोलीसाची शिट्टी वाजवल्यावर काय होतं... कसं वाटतं ? ह्याचं कुतुहल असायचं. मग एकदा हळुच त्याचं लक्ष नसताना वाजवुन पाहिली. प्यायच्या पाण्याच्या पिंपात सोडलेले मासे नळातुन बाहेर येतात का ते पाहिलं. (येतात... विशेषतः जर वडलांनी ग्लास धरला असेल तर... येतातच.) दिवसातले २८ तास अभ्यास करायला लावणा-या हेड्मास्तरांची मुलगी रविवारी काय करते हे तिला पत्रातुन विचारुन पाहिलं. (त्याचं उत्तर परिक्षेच्या पेपरवर मिळालं.) १२०-३०० तंबाखुचं पान खाउन गिळुन पाहिलं, एकच वेळेला बिडी, सिगारेट आणि सिगार ओढली तर काय होईल...(नको.. नको त्या आठवणी...) हे पाहिलं. भावांची माहिती न काढताच मुलींना त्यांची माहिती विचारुन पाहिली. सर्कशीसाठी आणुन ठेवलेल्या अस्वलाच्या पिंज-याचा दरवाजा...... असो....
.........पण ह्या प्रत्येक वेळेला मार खाता खाता राहिलो. (मार खाल्लेली कुतहलं इथे लिहणे इष्ट नाही, हे सुज्ञांना कळाले असेलच.) तेंव्हापासुन मनातलं कुतुहल दाबुन मी नाकासमोर चालत आलोय.... अगदी परवा परवा पर्यंत !
पण परवा मी पडलोच. परवा कुतुहलानी मला गाठलंच... मोह आड आलाच..... पाऊल वाकडं पडलंच.... माझ्या घरी येण्याच्या वाटेवर मला दोन अशी मोहाची दोन वळणं येतात. ज्या वळणांवर वळुन त्या वाटेवर हरवुन जावंसं वाटायचं...
एक म्हणजे....
रामदासस्वामींचा मठ ! (नाही... नाही.... हे ते रामदासस्वामी नाही... हे स्वामी म्हणजे रा. म. दासस्वामी. रामय्या मलिंगप्पा दासस्वामी. मागच्याच्या मागच्या जन्मी ते सुखाराम महाराजांच्या कोणाचेतरी कोणतरी होते म्हणे.... म्हणे म्हणजे तिथं गेल्यावर असे लोक म्हणाले. असो). ह्या मठात एकदा तरी नक्की काय होतं हे मला पाहायचंच होतं.
आणि दुसरं मोहाच वळण म्हणजे...
देशी दारुचे दुकान... दुकान म्हणजे फक्त देवाण नाही... घेवाण सुद्धा... म्हणजे देशी दारुचा गुत्ता !
तर मी काय सांगत होतो.... परवा माझं पाऊल वाकडं पडलंच....

त्या पहिल्या वळणावरच्या मठात घाबरत घाबरत मी आत गेलो. एकट्यानीच कुठे अनोळखी ठिकाणी जायला भिती वाटते हो.... आत गेलो आणि बघतो तर ही गर्दी... घाबरलोच. माझ्यासारखेच अनंत भक्तगण तिथे एकमेकांवर उच्छ्वास सोडत उभे होते. आत जाताच एका माणसानी मला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं.

तिकडे गायीच्या तोंडाचा एक दगडी नळ होता. मला वाटलं की गरम पाण्याचं जिवंत कुंड असेल. तिथं खाली तर ग्रीन मार्बल बघुन वाटलं की इथे बहुतेक शेवाळे महराजांनी जिवंत समाधी घेतली असेल. त्या संगमरवरावर पाय ठेवतो तर काय.... ज्ञानेश्वरांच्या भिंतीसारखं आपोआप, पाऊल न उचलता त्या नळापर्यंत पोहचलो. पण तिथं आपोआप न थांबता एकदम त्या नळावरच्या गायीच्या शिंगावर आपटलोच. कपाळावर टेंगुळ आलं. मग कळालं की ग्रीन मार्बल वगैरे काही नाही तिथे शेवाळं साठलय. मला टेंगुळाचा प्रसाद देणा-या त्या हलकट माणसाला मी शोधायला लागलो. पण तो केंव्हाच त्या अनंतात विलीन झाला होता. मग मी ही पुढच्या येणा-या माणसाला कोप-याकडे बोट दाखवुन "आधि... शेवाळे महाराज" असं सांगितलं आणि प्रसाद पुढे वाटला. एका पायात ती हिरवी स्लीपर आणि दुस-या पायावर ती मेंदी घेऊन मी रांगेत उभं राहिलो.

"स्वामींना अस्वच्छेतेची खुप चीड ! " अशी बहुमुल्य माहिती मला एका भक्तानी पुरवली. भक्तांच्या पदकमलांनी तिथे हिरवे हिरवे गार गालीचे असे साठत असतील तर कुणालाही चीड येईल.
"हि जागृत वास्तु आहे आणि तुम्हाला इथे ओम सतत जाणवत राहतो." हि दुसरी माहिती मिळते न मिळते तोच एक माणुस गंध घेऊन आला. त्याच्या हातात ओमच्या आकाराचा एक आकडा होता, जो गंधात बुडवुन तो लोकांच्या कपाळावर लावत होता. ते गंध त्यानी इतक्या जोरात माझ्या कपाळावरच्या टेंगळावर लावलं की मला वाटतं ते मागुन पण दिसलं असेल. पण एक खरं झालं की तो ओम मला सतत जाणवत राहिला.
लोक मुर्ख असतात हो.... काय वाट्टेल ते करतात हो. कधी त्यांच अनुकरण करु नये. तिथं एका समाधीबाहेरची साखळी घेऊन लोक कपाळावर लावत होते, डोळ्यांना लावत होते, डोक्यावरुन फिरवत होते. मी पण एका सामाधीबाहेरची साखळी घेऊन कपाळावर लावली आणि सोडुन दिली. ती त्या समाधीवरच्या दरवाज्यावर आपटली. आणि तो दरवाजा च्क्क उघडला गेला. पाहातो तर काय...
चमत्कार !!

त्या जागृत समाधीतुन एक जिवंत बाई..... साध्वीच असणार कोणतरी ! "कोन पायजे ?" हे इतक्या भसाड्या आवाजात तिनी मला विचारलं की माझी तंद्री भंग पावली. मग तिथे मठाचा रखवालदार राहतो आणि ती त्याची बायको आहे ही अजुन एक बहुमुल्य माहिती मिळाली.
मिळेल तिथले अंगारे घेऊन लोक भरुन घेत होते, उदबत्त्या हुंगत होते, भंडारा उधळत होते, कुंकु कपाळावर लावत होते. मी पण तिथल्या एका भिंतीवरचं कुंकु कपाळावर लावलं.

लोकं काय असभ्य, बेशिस्त, असंस्कृत, बेजवाबदार, अशिक्षित, बेअक्क्ल आणि आर्वाच्य असतात हो. एक तर मठात येतानाही गुटखा वगैरे खाउन येतात आणि वर कुठही थुंकतात. ते कपाळावर लावलेलं थुंकु... माफ करा... कुंकु धुवायला मी पुन्हा शेवाळे महाराजांकडे गेलो. मग दुस-याही पायावर मेंदी काढुन घेऊन मी पुन्हा रांगेत आणि मग पुन्हा तो कपाळावर ओम कोरण्याचा कार्यक्रम झाला.
तिथं इतकी गर्दी होती की त्या रांगेत घामाघुम झालो. लोक एकमेकांना अगदी चिकटुन चिटकुन उभी होती. घाम आला म्हणुन रुमाल काढायला खिशात हात घातला तर हातात चुन्याची डबीच आली. कुणाच्या खिशात हात घातला होता कुणास ठाऊक ! मग पुन्हा तिथं ठेवायला गेलो तर तिथं आधिच एक डबी होती. मला काय समजायचं ते समजलं. मी गपचुप ती डबी खाली टाकली. ती तिस-याच भक्ताच्या पायावर पडली. त्याला वाटली त्याचीच.

(इथे सगळे भक्तांकडे जोरदार त्रिसुत्री होती. हातात फुलांचा हार, कपाळावर घामाची धार आणि तोंडात तंबाखुचा बार... )
तर त्याला वाटलं की त्याचीच डबी म्हणुन तो मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. त्या मागच्याला वाटलं की तो पहिला नमस्कारालाच वाकलाय. देवाचंच काहितरी म्हणुन तो ही त्याच्या मागच्याला धक्का देऊन खाली वाकला. लोकं माकड असतात. कशाला कुणाचं अनुकरण करायच.. ! पण नाही.... मग त्या माणसाच्या मागचा वाकला, मग त्याच्या मागचा.... असं करत करत शेवटचा माणुस एकदम बाहेरच ढकलला गेला. मग तिथं छोटीशी झटापट झाली. त्या गोंधळाचा फायदा घेउन मी हळुच स्वामींच्या खोलीत शिरलो.
आत गेल्यावर रा. म. दासस्वामींचं दर्शन झालं. फॅन्सीड्रेस स्पर्धेत अफजलखानसारखं दिसणा-या कुणी जर सुखाराम महाराजांचा ड्रेस घातला तर कसं दिसेल तसे ते दिसत होते. डोळे मिटुन ते रामदासस्वामी (स्वतःच्याच) मनाचे श्लोक म्हणत होते. मध्ये त्यांनी डोळे उघडले आणि सुखाराममहाराजांचा अभंग वाचला....

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे
सुखा म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला
हा अभंग त्यांनी तिथं का म्हंटला ते काही कळालं नाही. त्यांना नमस्कार करुन बाहेर पडावं असा विचार करुन मी नतमस्तक होणारच होतो. पण त्याआधिच स्वामींच्या एका शिष्यानी माझं मुंडकं पकडुन त्यांच्या पायाशीच इतक्या जोरात आपटलं की तो कपाळावर कोरलेला ओमसुद्धा खाली पडला. आणि ओम पुन्हा त्या वास्तुतच राहिला.
नुसता ओम पडला असता तर काही वाटल नसतं, पण त्या ओम बरोबराच माझ्य खिशातुन शंभराची एक नोट पडली हो...! ती महाराजांनी उचलुन लगेच खिशात घातली आणि एकदम जोरात ओरडले, " विचार वत्सा, विचार एक प्रश्न "
" ती माझी पडलेली नोट परत मिळेल का ?" असं मला विचारायचं होतं पण त्या शिष्याचा हात अजुनही माझ्या मानेवरच होता. खाजगी प्रश्न त्या गर्दीत विचारणं शक्यच नव्हतं म्हणुन काहितरी विचारायच म्हणुन मी विचारलं की आनंदाचे डोही आनंद तरंग ह्या अभंगाचा अर्थ कळेल का ? तर स्वामी म्हणाले की, " आत्मनंदात आत्मवंचना झालेल्या आत्म्याला आत्मचिंतीत आत्ममननाची जोड दिली तर आत्मपरिक्षणानंतर जन्मणा-या आत्मविवेचनातच आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार आत्म्याला होतो. "
मी त्या शंभर रुपायाच अखेरचं दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो ते पुन्हा कधी कुतुहलाच्या वाटेला जायचं नाही हे ठरवनुच.... !
पण अनुभवाच्या वळणावर सडकुन आपटुन शहाणा झाला तर तो माणुस कसला ! ते देशी दारुचं दुकान मला बोलावत राहिलं आणि एक दिवस मी दुस-या वळणावर वळालोच. आणि ज्या अभंगाचा अर्थ मला त्या मठात कळला नव्हता तो मला त्या गुत्त्यात कळाला.
त्याचं असं झालं............
मला नेहमी रस्त्यावरुन जाताना तो दारुचा गुत्ता दिसायचा. जाता जाता काही क्षणांसाठी त्या गुत्त्याच्या दरवाज्यावरचा पडदा हलायचा आणि आत दिसायचे सगळे तृप्त चेहरे... समाधानाने ओथंबलेले... सुखाने डोळे काठोकाठ भरलेले.... पराकोटीच्या आनंदात रममाण.... शांत, प्रसन्न, उत्साही जीव... ध्यानमग्न.... आत्मतल्लीन..... पुण्यात्मेच !!
का नाही वाटणार हेवा...? का नाही होणार मोह....? का नाही वळणार पाऊल तिकडं... ? वळालंच एकदा....
गाडी थोडी लांबच लावली आणि चालत चालत त्या ध्यानमंदीराकडे निघालो. कुणी ओळखु नये म्हणुन तोंडावर रुमाल बांधला. छातीत जाम धडधड होत होती पण कुतुहलही तितकच होतं. कच खाऊन मागे वळणार तितक्यात पुन्हा पडदा हलला आणि पुन्हा त्या चेह-यांच दर्शन... मग दारात जाऊन उभं राहिलो.
तुम्हाला खोटं वाटेल पण, दारात दोन बायका दोन बाजुला स्वागताला उभ्या होत्या. ते भरतनाट्यम का कथ्थकला नेसतात तश्या जरीच्या साड्या नेसुन... दोघींच्या लांबसडक वेण्या, अगदी कंबरेपर्यंत.... त्यावर वेगवेगळ्या फुलांच्या वेण्या, चमक्या, वेगवेगळ्या रंगांचे मणी आणि गजरे.... डोळ्यात नीळं काजळ आणि गालावर (आपल्याकडे शाळेत स्नेहसंमेलनात लावतात तसं) गुलाबी रुज का काय ते.... हातात ('त्या लमाणी आहेत काय' असा संशय यावा इतक्या) बांगड्या... पायात जाडजुड पैंजण (त्याला घुंगरु आहेत की घंटा हे मी बराच वेळ पाहत राहिलो पण कळालं नाही).... एकीच्या हातात आरतीची थाळी आणि दुसरी 'प्रभात चित्र'वाल्या बाईसारखी एक पाय मागे दुमडुन फुलं टाकयासाठी तयार....
पडद्यावर पण काय छान छान चित्र असतात ना....!

मग त्या स्वागतानं गहिवरुन गेलेलो मी आत गेलो. आणि आतलं वर्णन काय सांगु महाराजा... ? तिथं जनसागरच लोटला होता. प्रंचंड गर्दी पण गोंधळ अजिबात नाही. सगळ शिस्तबद्ध.... ४ माणसं रांगेत होती... ७ रांगत होती.... ६ वेगवेगळ्या दिशेला तोंड करुन, पायांचे एकमेकांशी विविध कोन करुन बसली होती (हि बसलेली माणसं कुणाशी तरे बोलत होती पण बहुतेकांच्या समोर दुस-याचे पाय, पाठ किंवा भिंत होती. केवढी मानसीक ताकद पहा... कुणी असो नसो फरक पडुन द्यायचा नाही. नाहीतर आपण...)

....आणि सुमारे ११ माणसं अस्ताव्यस्त पडलेली होती...(सुमारे असं म्हणण्याचं कारण की नीट मोजता नाही आली. कोण कुणाच्या वर आहे, कुणाचं अंग कुठलं आहे आणि डोकं कुठंलं आहे काही कळत नव्हतं. मग हात आणि पाय मोजुन पाहिले तर हात २३ भरले आणि पाय २१... म्हणुन सरासरी ११. अर्थात खुप खालची खालची माणसं नाही मोजली. कारण ती मोजताना वेळ जात होता आणि तोपर्यंत रांगत असलेली माणसं पडत असल्यामुळे घोळ व्हायला लागला.)

हसु नकात.... भल्याभल्यांना जमणार नाहीत अशी योगासनं करणारे हे योगी....., (हो मग... योगीच ते... नाहीतर जमिनीवर बसुन, एक पाय स्वतःच्याच गळ्यात, दुसरा पाय समोरच्या बाकड्यावर, त्या पायावर एक योगी-बंधु, मांडीवर एक योगी-बंधु, एका हाताने भिंतीचा आधार घेतलेला आणि दुसरा हात सापडत नाहीये...अशा अवस्थेत मान खाली खाली नेऊन तोंडानी जमिनीवरचा ग्लास उचलायचा... ह्यासाठी कमीतकमी १३८ योगासनं माहित हवीत.)
तर हे सगळे हटयोगी, दिसत असले जरी जमिनीवर, तरी होते सगळे तरंगत. इतक्यात एका महात्म्याने मला टेबल समजुन, (मी आहे थोडा बुटका, त्यात त्याची काय चुक) माझ्या डोक्यावर ठेवलेला ग्लास माझ्यावर अमृताचा वर्षाव करुन गेला आणि मी चिंब भिजलो. आनंदाच्या लाटांवर लाटा उसळत होत्या आणि त्या आनंद-डोहात सगळे चिंब भिजले होते. सगळय़ांच्याच अंगात आनंद इतकाच ओसंडत होता की तुझं अंग, माझं अंग असा फरकच राहिला नव्हता. ह्या वातावरणात मी गहिवरुन गेलो आणि नकळत तोंडातुन शब्द बाहेर पडले...
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे
कुठे ते दासस्वामी, जे डझनभर शब्द घेऊन सुद्धा मला काहिच समजावु शकले नाहीत. आणि कुठे ही मंडळी, ज्यांनी न बोलताच मला पहिला श्लोक समजावुनही दिला.
माझ्याही नकळत मी रांगेत उभा राहिलो आणि कधी एकदा माझा नंबर येईल ह्याची वाट पाहायला लागलो. मी असं ऐकलं होतं की प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर सुंदर गोष्टी घडतातच पण ब-याचदा खुप उशिरा. इथे नाही झालं असं... लगेच आला नंबर माझा...

काय आपण उगाच रडतो की महागाई... महागाई... ! इथे १ ग्लास ८ रुपायाला... ५ ग्लासवर २ ग्लास फ्री आणि ७ ग्लास घेतले तर तो ग्लास पण फ़्री... ! मंथली मेंबर्सना चकणा फ़्री... ! लाईफ मेंबर्सना पिक-अप आणि ड्रॉप फ्री... ! नुसता सेल लागला होता तिथं.
मी एक ग्लास घेतला आणि ओठापर्यंत आणला. जवळपास एखादा उंदीर मरुन पडला असणार नाहीतर एवढ्या सुंदर द्रवाचा वास असा येणंच शक्य नाही. मी तो ग्लास कसाबसा ओठाला लावला आणि नेमकं तेंव्हाच २-३ जणांच्या खाली गाडला गेलेला कोणतरी एक फिनीक्स पुन्हा भरारी घ्यायला उठला. मग त्याचा एक जोरदार धक्का मला आणि एका घोटात सगळं कुतुहल पोटात.
....उगाच त्या २६ व्या मजल्यावरुन खाली पडायला नको म्हणुन मी रांगत रांगत एका भिंतीच्या कडेला जाऊन बसलो. आणि मग भास व्हायला लागले किंवा.... किंवा भासही असतील.... नाहीतरी निघायचे भासच ! पण काही का असेना माझ्या कानातली ती भीकबाळी मला टोचायला लागली... डोक्यावरच्या त्या पगडीवरचे मोती कपाळावर आपटायला लागले... हातातलं गुलाबाचं फुल सापडेनाच... मस्तानी मात्र नाचता नाचता मध्येच तिरका डोळा का तिरकी मान असं काहीतरी करुन हसत होती.... मध्येच त्या पाणगेंड्याशी माझी कुस्ती झाली नसती तर मगरीला लोळावलाच असता मी... पण मला एक अजुन कळालं नाहीये की माझा रणगाडा कुणी चोरला....

हळुहळु जरा चढायला लागली आणि मग एकेक दुःख बाहेर पडायला लागली. आणि मी माझ्या बाबतीत आजपर्यंत जे काहिचियाबाही झाल होतं आणि मला आवड नसतानाही त्या अग्निपथावर मी कसा पुढे चालत राहिलो हे त्या भिंतीला सांगितलं. मग भिंत झाली म्हणुन काय झालं... भिंतीलाही कान असतात.
खुप हलकं वाटलं... मोकळं वाटलं... अगदी पिसासारखं... आणि मग मी पुढं पुढं जायला लागलो... अगदी आवडीनं... कसलाही आकस नाही, दुःख नाही... तक्रार नाही.... आता मला सुखाराममहराजांचा श्लोक उमजला.
काय सांगो जाले काहीचियाबाही
पुढे चाली नाही आवडीने
जोपर्यंत आपल्या मनातुन आयुष्यात घडलेलं ते काहिचियाबाही आपण कुणाला सांगत नाही तोपर्यंत पुढे आवडीनं नाही चालता येत.
....आणि आपण मुर्ख लोक त्या दारु पिउन बडबडणा-या माणसांना हसतो, जे खर तर समाधानानी चालत असतात... आवडीनं चालत असतात.
आपण... (म्हणजे तुम्ही... स्वतःला शहाणे म्हणवणारे,) नसाल एकटचं बडबडत पण आयुष्याची पाऊलवाट रडत रडत, रखडत रखडत चालता हे लक्षात ठेवा....)
आयुष्याला सामोर जायची लोकांची ती जिद्द पाहिली आणि चेह-यावरचा तो रुमाल नावाचा मुखवटा गळुन पडला. आणि मी आपोआप आवडीने पुढे चालायला लागलो. सुरवातीला दोन पावलं टाकायला पण त्रास झाला मग दोन ग्लास टाकल्यावर हवं तिथं तरंगतच जायला लागलो. आणि मग सुख-दुःख, समाधान-तक्रार, वेडा-शहाणा, जमिन-आकाश, जन्म-मृत्यु असा काही फरकच राहिला नाही.

श्रीकृष्ण गीतेत म्हणतात तेच खरं....
तुम्ही काय आणलय जे हरवेल ? जे घेतलत इथुनच घेतलंत.... जे दिलंत इथेच दिलंत.... (ह्याचा अर्थ दारु इथेच पिऊन ती पुन्हा ओकुन इथेच देणे असा घेऊ नये. ह्यातला गर्भित अर्थ ग्लासमध्ये घ्यावा.)
खरं सांगायचं तर जीव जेंव्हा गर्भात असतो तेंव्हाच सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला काय हवय ते त्या गर्भाला बरोबर कळतं आणि ते शोधत तो इच्छित स्थळी पोहचतोही. शेवटी माता एक निमित्त आहे. एक माया आहे. डोहाळे हा एक भास आहे. खरा जिव्हाळा असतो त्या समाधीत... त्या मोक्षात.... आत्म्याच्या प्रतिबिंबात....
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे

.............आणि शेवटाच्या कड्व्याचं म्हणाल तर त्यात मुद्रणदोष आहे. त्या कडव्यातलं पहिल वाक्य ' सुखा म्हणे तैसा ओतलासे ठसा' असे नसुन, तो श्लोक ’सुखा म्हणे घसा ओतलासे ठर्रा' असा आहे. ठर्रा म्हणजे मदिरा. तर सुखाराम महाराज म्हणतात,
सुखा म्हणे घसा ओतलासे ठर्रा
अनुभव सरिसा मुखा आला
म्हणजे.... नुसत्या तोंडाला येणा-या वासावरुन दारुचा अनुभव नाही घेता येत, त्यासाठी दारु घश्यातच ओतावी लागते. एकदा का तुम्ही ठर्रा घशात ओतला की अनुभव तुमच्या मुखा आलाच म्हणुन समजा. काय मोठी गोष्ट सांगुन गेलेत पहा बुवा, की अनुभव घेतल्याशिवाय मजा नाही. मला सांगा, घरात बसुन मुसळधार पडणा-या पावसाचा आनंद खिडकीत बसुन मिळेल काय ? त्यासाठी बाहेर जाउन भिजायलाच हवं हो.... नुसतं गाण्याचे नोट्स वाचुन काय हरवुन जाता येईल काय ? त्यासाठी सुरांची नशाच अनुभवायला पाहिजे.
आणि साहेब... ठर्रा म्हणजे तर स्वर्गच की ! पाऊस पडुन जातो, सुर विरुन जातो... पण ठर्रा उरुन राहतो.
जे सगळ्यांना दिसतं ते दाखवतोच, पण जे कोणाला दिसणार नाही ते ही दाखवतो. त्या पडद्यावरच्या बायकांना मी स्वतः आरती ओवाळताना आणि माझ्यावर फुलं टाकताना मी पाहायलय. इथल्या काही योगी युगपुरषांनी तर त्यांचा नाचही पाहायलाय. एकदा याच तुम्ही अनुभव घ्यायला.
मी हल्ली ब-याचदा घेतो...
त्यामुळे हल्ली मला आनंदाचे झटके येतात... तरंगावंसं वाटतं.... स्वत:बद्दल प्रेम, करुणा आणि वात्सल्य दाटुन येतं.... कोणाचा राग येत नाही, हेवा नाही, मत्सर नाही... खरं सांगायचं तर अजुबाजुच्या जगाची जाणिवही नाही... फक्त समाधान आणि तुप्ती.... !
मला सांगा आध्यात्मात अजुन काय मिळतं.... आत्मसाक्षात्कार ह्याहुन काय वेगळा असतो हो...?
हल्ली मी असाच तल्लीन असतो. सगळी कुतुहलं आता शमवलीत पण हल्ली हल्ली ध्यानमंदीरात कुठल्या तरी बाईच्या तमाशाची जोरदार चर्चा असते. तमाशा वगैरेचा आपल्याला नाद नाय करायचा पण कुतुहल म्हणुन गेलोच तिथे तर सांगेनच तुम्हाला लवकर...
तोपर्यंत....
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदचि अंग आनंदाचे

धुंद रवी.

उपाशी रहा, मुर्ख व्हा

स्टीव्ह जॉब्जचे भाषण
उपाशी रहा, मुर्ख व्हा
उल्हास हरी जोशी

नुकतेच ऍपलचा संस्थापक स्टिव्ह जॉब्ज याचे निधन झाले. अमेरिकेचे प्रेसिडेन्ट बराक ओबामा पासुन आय.टी. इन्डस्ट्रीमधील बील गेट्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी ऍलीसन सारखे दिग्गज पण हळहळले. स्टिव्ह हा इतिहासात एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळखला जाईल असे अमेरिकेतील तद्यांचे मत आहे. एडीसन प्रामाणेच स्टिव्ह कडे पण इंजिनीअरींगची कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालिफिकेशन नव्हते. कॉलेजमधला ड्रॉप आऊट असलेला, वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःची कंपनी काढणार्या्, वयाच्या 30 व्या वर्षी आपल्याच कंपनितुन हकालपट्टी झालेल्या, नंतर कंपनीत परत आल्यावर ऑपल ही जगातील एक दिग्ग्ज-आघाडिची कंपनी बनविणार्याु स्टिव्हला हे कसे जमले? 12 जुन 2005 सली त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटीत केलेले भाषण जगभर गाजले. या भाषणाचा हा स्वैर मराठी अनुवाद.
प्रिय मित्रांनो,
जगातील सर्वोकृष्ट युनिव्हर्सिटिमधील आजचा तुमचा पहिला दीवस आहे. या निमित्ताने तुम्ही मला भषण देण्यासाठी निमंत्रीत केलेत हा माझ्या दृष्टिने मोठा गौरव आहे. कारण मी स्वतः कॉलेज ग्रॅज्युएट नाही. खरे सांगायचे तर आजच्या या निमंत्रणाच्या निमित्ताने, पहिल्यांदाच, कॉलेज ग्रॅज्युएशनच्या जवळपास मी आलो आहे. आज मी माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तीनच गोष्टी ! फार काही नाही.
मझी पहिली गोष्ट आहे ती बींदु जोडण्याची, डॉट्स कनेक्ट करण्याची.
माझ्या जन्माच्या आधीपासुनच याची सुरवात झाली. माझी खरी आई कॉलेजमधे शीकणारी एक तरुण कुमारी माता होती. माझा जन्म झाला तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. माझा सांभाळ करणे तिला शक्य नव्हते म्हणुन तिने माझी रवानगी ऍडॉप्शनसाठी म्हणजे दत्तक देण्यासाठी म्हणुन केली. तिची इच्छा होती की कॉलेजमधुन ग्रॅज्युएट झालेल्या जोडप्याने मला दत्तक घ्यावे. त्याप्रमाणे एक वकील जोडपे मला दत्तक घ्यायला तयार पण झाले होते.पण ऐनवेळी कुठेतरी माशी शींकली. त्यांनी अचानक एक मुलगी दत्तक घ्यायचे ठरवले. त्यामुळे वेटींग लिस्टवर असलेल्या माझ्या आई वडिलांना मध्यरात्री फोन आला. ‘ अचानक एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध झाला आहे. तुम्हाला तो मुलगा हवा आहे का?’ त्यांना विचारण्यात आले. ‘अर्थातच आम्हाला हवा आहे.’ माझ्या आई वडिलांनी उत्तर दिले. नंतर माझ्या खर्यात आइला कळले की माझी दत्तक आई कॉलेज ग्रॅज्युएट नाही तर माझे दत्तक वडील शाळेचे सुध्धा ग्रॅज्युएट नाहीत. त्यामुळे दत्तकाच्या कागदांवर सही करायला माझी खरी आई तयार होत नव्हती. पण ज्यावेळी माझ्या दत्तक आईवडिलांनी माझ्या खर्याख आईला वचन दिले की ते मला कॉलेजमधे नक्की पाठवतील, त्यानंतर काही महिन्यांनी माझ्या खर्या आइने कागदावर सही केली.
त्यानंतर 17 वर्षांनी मी खरोखरच कॉलेजमधे जॉईन झालो. पण मी चुकुन स्टॅनफोर्डसारखेच महागडे कॉलेज निवडले. वर्कींग क्लासमधुन आलेल्या माझ्या दत्तक आई वडिलांनी पै पै जमवुन माझ्या शीक्षणासाठी पैसे जमा केले होते ते खर्च होऊ लागले. सहा महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की मी घेत असलेले शीक्षण त्या लायकिचे नाही. एक म्हणजे आपण आयुष्यात पुढे काय करायचे हे ठरले नव्हते आणि या साठी माझे कॉलेज मला काय मदत करु शकेल हे पण समजत नव्हते. मी उगीचच माझ्या दत्तक आईवडिलांनी मोठ्या कष्टाने जमवलेले पैसे वाया घालवत होतो. त्यामुळे मी ड्रॉप आऊट व्हायचे ठरवले. पण मी मनातुन थोडा घाबरलो होतो. पण मागे वळुन पहाता मला वाटते की तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. मी ड्रॉप आऊट झाल्यामुळे मला इंटरेस्ट नसेलेले क्लासेस अटेन्ड करण्यापासुन माझी सुटका झाली. पण त्याचवेळी मला आवडु शकेल अशा कोर्ससाठी मी ड्रप ईंन पण झालो.
पण ही गोष्ट वाटते तेव्हडी सोपी नव्हती. आता मी कॉलेजचा स्टुडंट नव्हतो. त्यामुळे मला मिळालेली खोली गेली होती. मित्राच्या खोलीवर जमिनीवर झोपावे लागत होते. खिषात पैसे नव्हते. त्यामुळे जुन्या कोकच्या बाटल्या 5 सेन्टस ला विकुन पैसे मीळवावे लागले. गावात एक हरेकृष्ण मंदीर होते. तेथे दर रविवारी संध्याकाळी पोटभर मोफत जेवण मिळे. त्यासाठी 7 मैलांची पायपीट करत जावे लागत होते. परंतु मला ते आवडले. त्यावेळी केवळ उत्सुकतेपोटी मी ज्या गोष्टी केल्या आणि माझ्या अंतर्मनाने ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या त्या पुढे लाख मोलाच्या ठरल्या. याचे एकच उदाहरण मी तुम्हाला देतो.
त्यावेळी रीड कॉलेजमधे कॅलिग्राफीचे देशातील सर्वोत्तम शीक्षण मीळत असे. कॉलेजच्या कॉम्पसमधे प्रत्येक पोस्टर, प्रत्येक लेबल सुंदर पध्ध्दतिने हाताने कॅलिग्रा॑फ केलेले असायचे. मी ड्रॉप आऊट होतो. कुठलेच क्लासेस अटेन्ड करण्यावे बंधन माझ्यावर नव्हते. त्यामुळे मी कॅलिग्राफी क्लासमधे जाऊन बसु लागलो. त्या ठिकाणी माझी खर्यान अर्थाने अक्षरांशी अक्षराओळख झाली. तेथे मला सेरीफ आणि सॅन सेरीफ टाईप फेसेसचे ज्ञान मिळाले. अक्षरांमधल्या जागेचे महत्व कळले. ग्रेट टायफोग्राफी कशामुळे ग्रेट होते याची थोडीशी समज आली. ही गोष्ट सुरेख, ऐतिहासीक, कलापुर्ण अशी होती. ही अशी गोष्ट होती की ती सायन्स शीकवु शकत नाही. मला हे शीकताना खुप मजा आली.
मी हे सगळे छंद म्हणुन शीकत होतो. याचा मला आयुष्यात काहीच उपयोग होणार नाही असेच मी समजुन चाललो होतो. पण दहा वर्षांनंतर, जेव्हा आम्ही पहिला मॅसिनटोश(Macintosh) कॉम्युटर डिझाईन करत होतो, हे सगळे मला आठवले. आम्ही त्याचा मॅकमधे उपयोग केला. हा जगातील पहिला कॅम्युटर होता की ज्यामधे एक सुंदर अक्षरलिपी होती. जर मी रीड कॉलेजमधील हा कोर्स केला नसता तर आमच्या कॉम्युटरमधे ही सुरेख लिपी आलीच नसती. त्यानंतर विन्डोने हीच लिपी कॉपी केल्यामुळे सगळ्या पी.सी. ( पर्सनल कॉंम्युटर) वर याचा उपयोग सुरु झाला. मी जर कॉलेजमधुन ड्रॉप आऊट झालो नसतो आणि कॅलिग्राफी क्लासला ड्रॉप ईन झालो नसतो तर आज पर्सनल कॉम्पुटरमधे जी सुरेख अक्षरलिपी पहायला मीळते ती मिळाली नसती.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील बिंदु किंवा डॉट्स जोडण्यासाठी नेहमी पुढेच म्हणजे भविष्यकाळाकडेच बघायला हवे असे नही. उलट तुम्हाला मागे वळुन, म्हणजे भुतकाळाकडेच बघावे लागते. भूतकाळातील घटनाच भविष्यकाळातील डॉट्स जोडायला कारणिभुत असतात यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. तुम्ही कशावर तरी विश्वास ठेवायला हवा. मग ते तुमचे गट्स, डेस्टिनी, आयुष्य, कर्म- काहिही असेल. मझ्या या अप्रोचने मला कधिही खाली पहायला लावले नाही, तर त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रचंड परिवर्तन घडले.
कदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.
तेथे एक कावळा आला....
मुलाला बापाने विचारले, ते काय आहे?
मुलगा म्हणाला कावळा.
पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे?
मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.
तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे?
मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा............
मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते?
मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का?
कावळा...... कावळा... कावळा.

पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते?
मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,
का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून,
तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?
मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.
त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.
परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.
त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,
आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.
त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,
उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.
तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.
फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,
त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.
उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.
लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात?
आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात. त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय. तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?” वडील हसतात आणि म्हणतात..” आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.

जेवताना मी तिचा हात हातात

घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;

तरीही ती शांतपणे जेवत होती,

सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,

मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.

समोरच ताट तिने भिरकावून दिलं.

लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,

हे तिल जाणून घ्यायचं होत;

पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:

पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि

या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.....

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती

आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.

तिची आणखी एक अट होती.

लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.

त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.

त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने

बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस

नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला.

आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,

असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.

रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां

हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन

माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच

पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना

नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.

माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.

माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.

माझ्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो,

तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.

मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.

माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता.

ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,

जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

"आपण किती जरी नाही म्हणालो तरी आपण प्रेमात आंधळे होतोच, तसे आंधळे राहू नका... सावध राहा..कधी काही हि घडू शकत ..!

शेअर बाजार !!

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्यांना दहा रुपये देईल. गावकरी खुश झाले व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागले... माकडे पकडायला गावकर्यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा. ... काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत. काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केले कारण गावकर्यांना माकडे सापडेनात. आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.."

माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल. गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागले.

असा चालतो शेअर बाजार !!