श्रीनिवास खळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रीनिवास खळे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कर आता गाई गाई

कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई ?

बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल !

काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव ?

नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का ?




गीतकर  -     शांता शेळके
संगीत    -     श्रीनिवास खळे
स्वर       -     सुषमा श्रेष्ठ