संत कर्ममेळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत कर्ममेळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । उगवा हा फांसा लवकरी ॥४॥


- संत कर्ममेळा