संत निर्मळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत निर्मळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वडील तूं बंधु असोनी अविचार । केला कां निर्धार सांग मज ॥१॥
न पुसतां कां बा आलासि धांवत । वहिनी आकांत करतील कीं ॥२॥
येरू मह्णे विठु पुरविल सामोग्री । भार तयावरी घातिलासे ॥३॥
निर्मळा म्हणे ही बरी नोहे गोष्टी । विठोबासी कष्टी करणें काज ॥४॥


 - संत निर्मळा


चहूंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कनवा तुजलागीं ॥१॥
सांपडलें संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ॥२॥
आशा मनशा तृष्णा बहू या वोढाळ । लाविलासे चाळा येणें मज ॥३॥
निर्मळा म्हणे जीवीच्या जीवना । येऊं द्या करूणा देवराया ॥४॥


 - संत निर्मळा