gaulan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
gaulan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मथुरेच्या बाजारी

गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी .
दही  दुधान  भरा  घागरी.
अन   गौळणीनो  जाऊ , मथुरेच्या  बाजारी ,

लवकर  चला,
बाई बिगी  बिगी  चला,
नाहीतर  अडवेल नंदाचा  हरी .
गौळणीनो जाऊ, मथुरेच्या  बाजारी,

अवघड  घाट,
बाई  दूर  यमुनेचा  काठ.
बाई  पकडेल   कान्हाची  स्वारी.
गौळणीनो जाऊ  ,मथुरेच्या  बाजारी.

आला  जवळ  फार,
बाई  मथुरेचा  बाजार.
चला  गाठेल  हरीची  बासरी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी ,

मनास  माझ्या  चैन  पडेना .
कुठे  पाहू  मज  दर्श  घडेना.
ऐकून  माझ्या  हाक  अंतरीची.
ऐकू  दे  तान  तुझ्या  बासरीची.

लवकर  चला,
बाई बिगी  बिगी  चला ,
बाई  मारू  हरी  नामाची  ललकारी.
गौळणीनो जाऊ , मथुरेच्या  बाजारी.