gaurav marathicha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
gaurav marathicha लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Z Talkies- Celebrity Calender 2013 ( मराठी चित्रपटांची १०० वर्षे )

सिद्धार्थ जाधव - ( निळू फुले )

 सई ताम्हणकर - ( रंजना )
 

 भरत जाधव - ( दादा कोंडके )


उपेंद्र लिमये - ( चंद्रकांत मांडरे )


मुक्ता बर्वे - ( स्मिता पाटील : जैत रे जैत ) 



 अंकुश चौधरी - ( अरुण सरनाईक )

सोनाली कुलकर्णी - ( जयश्री गडकर )

मकरंद अनासपुरे - ( राजा गोसावी )

उर्मिला कानेटकर - ( शांता आपटे )

सुबोध भावे - ( डॉ. काशिनाथ घाणेकर )

अमृता खानविलकर - (दुर्गा खोटे)
 

संजय नार्वेकर - ( लक्ष्मीकांत बेर्डे )

मराठी पाउल पडते पुढे !

खरा स्वधर्म हा आपुला
जरि का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला, भला देखे

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।

कोट छातीचा अभंग त्याला कधी न जातील तडे

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपाऊली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला सयांनो, अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज:प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!


कवियत्री - शांता शेळके


लाभले अम्हास भाग्य

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


 कवी: सुरेश भट

माझा मराठीचा बोल

नदीच्या किनारी नदीला म्हणावे
तुझे पूर माझ्या नसातून यावे
अभंगात गोडी तुझ्या भाकरीची
तहानेत माझ्या तुला ओळखावे

माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल

माझी मराठी माऊली
तिची विठोबा साऊली
ज्ञाना, नामा, तुका, एका उभे कैवल्य राऊळी

माझा मराठी गुलाल
त्याला अबीराचा वास
माझ्यासाठी चंद्रभागा उरी कालवते घास

माझ्या मराठी मातीची
खोलवर रुजे नाळ
सळसळती आतून माझ्या रक्तात पिंपळ


कवी - अशोक बागवे
संगीतकार - कौशल श्री. इनामदार

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी


कवी -वि. म. कुलकर्णी

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥


कवी - माधव ज्युलियन

मी मराठी.....

नररत्नांची खाण मराठी
सदैव उन्नत मान मराठी
अजिंक्य आहे, अजिंक्य राहील
भारतभूची 'जान' मराठी!

पक्ष्यांची ही साद मराठी
कडे कपारी, नाद मराठी
'हर हर हर' डरकाळी फुटते
विजयाचा अस्वाद मराठी!

लाजलाजिरी रात मराठी
महाराष्ट्राची बात मराठी
गवतांनाही भाले फुटती
त्या हिरव्या कोंबात मराठी!

या मातीचा श्वास मराठी
या दर्याचा न्यास मराठी
या व्योमाच्या अणुरेणूतून
वसते अमुची खास मराठी!

या दुर्गांची माळ मराठी
कधी न तुटते नाळ मराठी
वरून कणखर, आतून हळवे
हृदयामधले बाळ मराठी!

धरतीच्या उदरात मराठी
कधी न सोडी साथ मराठी
या देशातून प्रेम वाहते
या देशाची जात मराठी!

पाने आमुच्या इतिहासाची

वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजिते दात जात ही आमुची
पहा चाळुनी पाने पाने
आमुच्या इतिहासाची

पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या परंपरा ही आमुची
तुम्हा काय ठाऊक ती लढली मर्दानी झाशीची
दाभाड्याची उमा ती लढली चन्नमा चित्तुरची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

जिवंत वीर तर लढले लढले नवल ते काय घडले
धडवेगळे शिर झाल्यावर धड ते अवघे लढले
मुरारबाजी म्हणती त्याला अमर कथा ही त्याची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

वंशज आम्ही रामकृष्ण अन् गुरु गोविंदसिंगाचे
तसेच आमुच्या शिवबाचे अन् प्रताप रणा याचे
आम्हा बरोबर लढण्या नसेल व्यली माय कुणाची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची

दुष्ट हेतुने आल जरी तू गिळण्या हिंदुस्थान
तुम्हालाच तो गिळेल तुमचे बनेल कब्रस्थान
दुष्ट शत्रुचे मढे गाडण्या जमीन पुरते आमुची
पहा चाळुनी पाने पाने आमुच्या इतिहासाची