vinodi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vinodi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

भंगार

एखादीदोघीजणी साठीतल्या
पार्लरमधे गेल्या
दोन तासांनी बाहेर
तरुण बनून आल्या

पहिली:

मी इतकी नटते सवरते
पण ’हे’ भारीच रुक्ष
’तो’ पहा, एकटक बघतोय
जसा तो शिकारी अन मी भक्ष्य

दुसरी:

पुरे, नकली सौंदर्याने
मिळणार नाही मोक्ष
तो आहे कबाडी, त्याचं
जुन्या भंगाराकडेच लक्ष


कवी - निशिकांत देशपांडे

नवं पाखरू

स्क्रीनवरच्या नजरा आधी गर्रकन फिरतात...
टवकारले जातात कान... आणि भलेभलेही हरतात...

इश्यूत घुसलेल्या विश्वामित्रांचीही तपश्चर्या होते भंग...
पांढर्‍या केसांवर चढतो गुपचुप गोदरेज हेअर डायचा काळा रंग..

विवाहित टीम लीडलाही हलकेच स्वतःच्या बायकोचा पडतो विसर..
छप्पर उडालेल्या मॅनेजर्सवरही तिच्याच यौवनाचा असर..

टीममधल्या सगळ्यांशीच मग हळूहळू तिची ओळख होते..
"च्यायला कसली भारीय" म्हणत चर्चा भलतंच वळण घेते..

एके दिवशी इनबॉक्समध्ये फाटकन् मेल येऊन पडतो..
लग्नपत्रिका पाहून तिची ओठांपाशीच घास अडतो..

प्रोजेक्टमधलं नवं पाखरू भर्रकन कधीच उडून जातं..
छप्पर उडालेलं बावळट ध्यान मग गुपचुप घरचा डबा खातं..

द्रांक्षांना मग आंबट म्हणत शोधली जाते नवी शिकार..
नवं पाखरू यायचा अवकाश.. प्रोजेक्टमध्ये पारधी आहेत चिक्कार..


कवी - संदेश कुडतरकर

सुंदर तरुणी दिसल्यावर

कळे न मजला इतके भीषण काय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तशी तिची अन माझी ओळख नव्हती तरिही
तशी बायको सोबत माझी होती तरिही
नकळत माझ्या छातीमध्ये कळ आली अन
तिला केशरी बासुंदीची साय म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

नकळत जे ओठांवर आले, कसे आवरू?
चुकून मी पत्नीस म्हणालो 'पहा पाखरू'
तिला पाखरू म्हटलो ते म्हटलोच आणि मी
'तिच्यापुढे तू अगदीच गोगलगाय' म्हणालो
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तिला पाहुनी जरी बायको 'अहा' म्हणाली
चला घरी मग तुम्हा दावते, पहा म्हणाली
घडायचे जे घरात, डोळ्यासमोर आले…
(दिसेल माझे नशीब दुसरे काय? म्हणालो!)
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

हाय ऐकुनी तरुणी तर ती हसून गेली
मला पाहण्या पत्नी कंबर कसून गेली!
धावत मी पत्नीच्या मागे जाता जाता…
परिणामांना मी डरतो की काय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

जरी तिला बोलांचा माझ्या तिटकाराही
मला आवडे तिचा असा हा फणकाराही
चिडल्यावरती नेहमीच ती सुंदर दिसते!
म्हणून तर भलत्या तरुणीला हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!
सुंदर तरुणी दिसल्यावर मी हाय म्हणालो!

तुझ्यावर एक कविता करू का


ये सांग न ग मला तुझ्यावर एक कविता करू का
जास्त नाही ग जमत पण थोडा ट्रअय तरी मारू का
डोळ्याचे कौतुक करतो मधी आणि मग केसाकडे वळू का
ओठाचे गुणगान गाऊ आधी मग नाकाकडे बघू का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

कायग नेहमीच भाव तू खायचा मी पण जरा खाऊ का
रुसणे मात्र तुझे आणि समजुतीला मात्र मीच का
एकटेपणा वाटतो तुला आणि सोबतीला मात्र मीच का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

शॉपिंग मात्र ढीगभर करते आणि बिल दयाला मीच का
भांडण मात्र तू काढतेस आणि मिटवायचे मात्र मीच का
नाकावरती राग येतो तुझ्या तेव्हा वाटते तू हीच का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

माझे मन गेले उडत आणि तुझेच घोडे पुढे का
लई लाडात नको येऊ सारखे एक कानाखाली देऊ का
जाऊदे ग वेडे विसर तो लटका राग आता गोड हसू देशील का
ये सांग ना ग मला तुझ्यावर एक कविता करू का

- अशोक खेडकर

.....पण विषय सापडत नाही चांगला


बऱ्याच दिवसातून कविता करावी म्हणतोय पण विषय सापडत नाही चांगला |

प्रेमावर करावी म्हणतोय पण प्रेमिकेला राग यायचा म्हणून तो सोडला |

दारुडयावर करावी म्हटले तर च्यामारी तिथे तिचा बाप बेवडा निघला |

देवदासावर करावी म्हटले तर नेमका तिच्याच भावाला पोरीने सोडला |

कुत्र्यावर करावी म्हटले तर तिच्याच आईने काल अल्सेसिअन आणला |

बोक्यावर करावी म्हटले तर तिच्या मांजरीनेच काल बोका मारला |

च्यामारी विषय शोधत शोधत माझ्या डोक्याचा भेजा फ्राय बनला |

शेवटी काय करणार राव मग विडंबन हाच एक धंदा उरला |

बऱ्याच दिवसातून कविता करावी म्हणतोय पण विषय सापडत नाही चांगला |


- अशोक खेडकर

प्रेमसाठी हेही


तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..

तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..

बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..

तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..

म्हणतात प्यार मे
दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..

बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..

नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..

खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..

एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..

अरे खाट
तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....

बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..

कवि आणि कवडा

माडीच्या खिडकीमधे कवि कुणी होता सुखे बैसला
'भिक्षांदेहि' करावयास कवडा आला कुणी त्या स्थळा!
'का हो काव्य नवीन काय लिहिता?'
त्याते पुसे खालुनी सांगे नाव कवी;
हसून कवडा हो चालता तेथुनी!
चार दिवसांनी मासिकात येई
काव्य कवड्याचे; नाव तेच त्याही!
रसिक म्हणती, 'वा! और यात गोडी!'
कवि हासुनि आपुले काव्य फाडी!


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

दारूचा पाढा

दारू एके दारू, बैठक झाली सुरु.
दारू दुणे ग्लास, मजा येईल खास.
दारू त्रिक वाईन, वाटे कसे फाईन.
दारू चोक बियर, टाका पुढचा गिअर.
दारू पंचे रम, विसरून जाऊ गम.
दारू सक ब्रॅडी, आण चिकन अंडी.
दारू सात विस्की, कॉकटेल करता रिस्की.
दारू आठ बेवडा, आणा शेव चिवडा.
दारू नव कंट्री, मारा परत एंट्री.
दारू दाहे प्याला, स्वर्ग सुखी न्हाल...!

व्हॅलेन्टाईन्स चा दिवस

व्हॅलेन्टाईन्स डे चा येऊन गेला दिवस |
पोरा पोरियनं धरले होते प्रेमाचे नवस ||
गावभर हिंडून फुल देत फिरावं |
जो फसन जाळ्यात त्याले नाही सोडावं ||
काय आहे नियम खरचं का कयते |
आय लव्ह यु म्हणाले बापाचं काय जाते ||
सेम टू यु म्हणून झंडी दाखवावं हिरवी |
लफडेबाज पुस्तके वाचून घ्यावं सारी ||
मंग कानी प्रेमाचा सुरु होतो खेल |
दुपारी सिनेमा, संध्याकाळी भेल ||
आतंकवाद्यावानी बांधून तोंडाले |
मोकये यायले रानं गाडीवर मंग फिराले ||
लाज, शरमिले पार मंग सुट्टी |
शाळा, कॉलेजचे रोजच मंग गट्टी ||
फेशनचा जमाना रापचिक कपडे |
एकानं दहासंग खुशाल करावं लफडे ||
नवीन पिढीचं दिमाग लागले फिराले |
हृदयाले करून जमीन, प्रेम लागले पेराले ||
प्रेमाच्या नावावर नुसते मजे |
गरम तेल एकाचं दुसर्यान् तयाव भाजे ||
सरता वर्षे अजून धरावं नवसं |
व्हॅलेन्टाईन्स डे चा केव्हा येनं दिवस ||

डोक किर्र करू नको

कधी हे करू नको
कधी ते करू नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते हे आण
कधी म्हणते ते आण
खिसा फाटतो माझा इथे
बापाच माझ्या नाही दूकान

तुला ते गिफ्ट देण नको
ते रोज लिफ्ट देण नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणते मुलशि डयाम
कधी म्हणते खड़कवासला
माय बाप आहेत माझे
उभा आडवा त्यांनीच पोसला

ते तुझ रुसन नको
रस्त्याच्या कड्याला बसन नको
बस झाली राणी आता
डोक किर्र करू नको

कधी म्हणतेस खोट बोलतोस
कधी म्हणतेस कशाला झेलतोस
भेटायची इच्छा नव्हती तर
कशाला एवढा त्रास घेतोस

बेसिकली आता तूच नको
दूर नको.. जवळ नको..
इथ भेटली तर भेटली
वर पुन्हा भेटू नको
- शशांक प्रतापवार

सांग सांग भोलानाथ - आधुनिक


सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय?
Investors ना बख्खळ divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय?
Investors ना बख्खळ Divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
चंद्रजीत

वर्हाडी ठसका

काय सांगू राजाभाऊ, जमाना नाही बरा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || धृ ||

सूट बूट अत्तर लावून कालेजात जाते
आन् इडली-डोसा दोघांमंदी गुपूर गुपूर खाते
निकालात मात्र तिचा असते canvas कोरा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || १ ||

"हम आपके है कौन" ला असते लाईन भारी
कालेजातल्या टपरीवर थकीत रायते उधारी
बिल देऊन बापाचा होते उजडा चमन सारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || २ ||

बाईकवाल्या पोट्ट्याची भारी असते मजा
पिंकी,रिंकी बसते माग,पुढं असती विज्या
अंगात असतो जवानीचा तुफान गरम वारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ३ ||

एका वर्षात कमीत कमी चार पाच तरी होते
इंटरव्हल मंदी शाहरुख बाद सलमान एन्ट्री घेते
एका डिग्रीत होते अश्या पाच पंचवीस येरझारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ४ ||

आलतू फालतू पोट्ट्यायची होते मजा मस्त
बाजार करून प्रेमाचा केल यायनं सस्त
चटके मात्र बसते याचे खर्या इमानदारा
आन् साधंसुधं पोट्ट पाहून पोट्टी मारते डोरा || ५ ||

पोरगी पटली

कॉलेजला जाताना समोरचं
तिला बघितली,
मी दिसताचं चालता चालता जरा थांबली..
माझ्याकडे बघुन गोड हसली,
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली,
पण
हत्तीच्या मारी
मागे वळुन बघितलं..
तर तिची मैत्रीण दिसली.. !!

मग उपयोग काय?

जेम्स बाँडचे बैकग्राउंड वाजतय डोक्यात,
हातात भिक्षापात्र..मग उपयोग काय?

लॉटरीच्या पैशाने गुरख्याने घेतला बंगला,
स्वत:च झाला वॉचमन...मग उपयोग काय?

तरुणी आवडली... मनाला भिडली..,
गळ्यात मंगळसुत्र...मग उपयोग काय?

भरपुर पगाराची US ला नौकरी,
व्हिसा रिजेक्ट झाला...मग उपयोग काय?

शहरामधे फुकट अन्न-धान्य वाटले,
गल्लीत माझ्या कर्फ्यु...मग उपयोग काय?

हेअर ट्रांस्प्लांट साठी जमवले होते पैसे,
नुकतेच लग्न झाले...मग उपयोग काय?

नशिबाने नेहमी चॉकलेट दाखवल,
खाउ नाही दिल...मग उपयोग काय?

- शशांक प्रतापवार

पोरी महागात पडतात!!

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो, पोरी महागात पडतात

तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कानाखाली ओढतात
खरच सांगतो पोरांनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरांनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय सर्वांनाच...........

च्यायला परत हिचा फोन

च्यायला परत हिचा फोन
आणि पुन्हा तेच प्रश्न
कुठे आहेस? कसा आहेस?
काय करतोऽऽऽऽऽय?
झाली का कामं?
कप्पाळ माझं!
हिला समजत नाही का? मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजतो हिच्या प्रष्णांचा रिंगटोन.
च्यायला, च्यायला परत हिचा फोन.
कुठे पळून नाही जाणार, सायंकाळी येइल ना घरी,
तेव्हा विचारनं जे विचारायचं ते.
सारं काही सांगेन.
झालंऽऽऽऽऽ, रडा-रडी सुरु
तू खुप बदललाय.
लग्नाअगोदर असा नव्हतास.
माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकणार कोण?
च्यायला परत हिचा फोन.
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, यू यू आणि काय काय,
SMS पाठवला, भावना पोचल्या, मग फोन चे काय काम?
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्याने ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन.

च्यायला परत हिचा फोन.

एक पोट्टी

एक पोट्टी रोज माह्या
सपनामंधी येते
हिचक विचक खाता पेता
उचकी देऊन जाते
थयथय नाचे मनामंधी
मोरनी हाय जशी
येड लावुन जाते
तिचे नखरे बावनमिशी

एक दिवस अशी अचानक
माह्यासमोर आली
पाहुन मले काय सांगु
खुदकन हसुन गेली
म्या म्हनलं काय ती
हिच पोट्टी हाय
कोनबी असुदे यार
पन हिले तोड नाय

सपनामंधली पोट्टी पुन्हा
दिवसा दिसुन जाते
कं दिवसा पाह्यलेली पोट्टी
पुन्हा सपनामंधी येते
काय करु चायला
पुरता लोचा झाला
माह्या मनाच्या डुगडुगीचा
चक्का जाम झाला

एक वाटे सुंदरा मले
एक वाटे अप्सरा
चायला सपनातल्या पोट्टीचं
रुप दिवसा आठवत नाही
तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं
रुप मनी साठवत नाही
डोये खुल्ले तवा माह्या
ध्यानामंधी आलं
दिवसाढवळ्या सपन पाहुन
कोनाचं भलं झालं....