virah kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
virah kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

वाट पाहतोय

वाट पाहतोय अल्लड क्षणांची
स्वप्नातल्या तुझ्या सोबतीची
न उमगलेल्या अनामिक नात्याची
भूरळ पडणाऱ्या त्या हास्याची

वाट पाहतोय तुझ्यात हरवून जाण्याची
मिठीत तुझ्या सहज विरून जाण्याची
निवांत तुझ्या कुशीत निजण्याची
नितांत बडबडनारे होठ पाहण्यची

वाट पाहतोय माझी होण्याची
हळुवार पाऊलांनी तुझ्या येण्याची
अनामिक्तेला एक नाव देण्याची
फक्त तुझाच होऊन जाण्यची

आता फक्त वाट पाहतोय..
आता फक्त वाट पाहतोय..
तुझी त्या क्षणांची आणि माझी..
आता फक्त वाट पाहतोय.

का रुसलीस तू

का रुसलीस तू हे कधी न जाणिले मी

का हसलीस तू हे कधी न जाणिले मी

तुज्या स्तब्ध ओठांनी हि प्रेम गीत गायिले तू

तुज्या लुप्त लोचनांनी नव चैतन्य दाविले तू

दाटून कंठ येतो तुझी आठवण हि बिलोरी

विखरून बघ गेली तुझी स्वप्न हि रुपेरी

का छळतेस आज पुन्हा या एकांत सांजवेळी

देऊनी हि उजाळा हि रात्र अजाण काळी

येशीलकाग पुन्हा या एकांत चांदराती

भेटशीलनाग पुन्हा या आठवणी हि मज छळती

का गेलीस दूरदेशी का सापडेलनाग हा रस्ता

परतीची ओढ् तुझ्या खाशीलनाग या खस्ता

परतीची नसे वाट जाणतोग मी हे सत्य

कसे सांगू या मना जणू वाटतेची हे मिथ्य

परतून ये प्रिये मना या लागली ओढ आकंठ

छळनार ना कधी करशील ना हसू उदंड


- अशोक खेडकर

गेलीस तेव्हा

गेलीस तेव्हा
फुले माझ्याजवळ रडली
मी जाऊ दिले म्हणून
माझ्यावरच चिडली

भासे तुझ्याविना
जग हे सुने सुने
भासे तुझ्याविना
शरीर काळजाउणे

डोळ्यांसमोर फ़क्त
तूच उभी असतेस
झाकले तर मात्र
श्वासांतून जाणवतेस

तु येण्याच्या आशेत
क्षण क्षण झुरतो आहे
तू जवळ नसल्याणे
मी अर्धाच उरलो आहे .


- अभिजीत

मी तुझी वाट पाहत राहीन....

गुन्हा फक्त इतकाचं झाला,

कि मी तुझ्यावर प्रेम केलं..

माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.....

प्रेम मी करतचं राहिली ,

तू फक्त व्यस्त राहिलास...

मी मात्र धावतचं राहिली ,

तू मात्र पाहतचं राहिलास...

आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,

तू मात्र तिथेचं राहिलास...

आठवणी मात्र येत असतात,

मी अश्रू पुसत राहते...

जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,

पण मी तुझी वाट पाहत राहीन.....

तुझी आठवण

मारव्याचे एकाकी स्वर, मावळतीला सूर्याचा अस्त
बावरलेली संध्याकाळ, गारवा लपेटण्यात व्यस्त

पुन्हा उदास रात्र, थंडीने लागते बहरू
लाजत धुके हळूच, लागते फेर धरू

आखडलेले शरीर, प्रफुल्लित मन
पुन्हा एकाकी मी, सोबत तुझी आठवण

रक्त गोठवणारी थंडी , हातात हात तुझा
घातलेली तु शपथ "तु राहशील फक्त माझा"

कुड्कुडना-या थंडीतली, उबदार तुझी मिठी
उष्ण तुझे श्वास ,फुललेले माझ्यासाठी

दाट पांघरलेले धुके, दवबिंदूची आसवे
थंडीची प्रत्येक रात्र, मी जगतो तुझ्यासवे

आज नाहीस तु, फक्त तुझेच भास
गुलाबी थंडीत तुझ्या, आठवणींचा सहवास