दादा कोंडकेंना १ मुलगा त्यांची चड्डी पाहुन विचारतो
मुलगा : दादा तुम्ही चड्डी कुट शिवता?
दादा : कुट म्हन्जे, फ़ाटल तीथ.
एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो...झंप्या: देवा, मला फार काही
नको, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलींनी भरलेली मोठी गाडी
हवी आहे...
देव: तथास्तु!!!!
आज झम्पेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत!!!

पटकन

जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन
द्यायचं, काय?.
बंड्या : हो सर.
जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!

स्वर्ग

बायको-काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत.खरे आहे का हे?
नवरा-हो खरे आहे.
बायको- पण का हो असे?
...
नवरा-अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.
सर्कशीच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात
जाउन किस करते. सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघतात. पिंजऱ्याभोवती
गोल चक्कर मारीत रिंग मास्टर प्रेक्षकांनाविचारतो, '' तूम्ही हा नजारा
कधी बघितला नसेल ... आणि बघणारही नाही...प्रेक्षकातले कुणी असं करु
शकते?''
प्रेक्षकातूनएक माणूस उभा राहतो आणि ओरडून ...म्हणतो,
'' हो... मी करु शकतो... पण आधी त्या सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''

शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं

बॅग, टिफिन नव्हतं नेलं
मजेत खेळत बसलेलं

टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालणार नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."

"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"

"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."

जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन

सुट्टीत जेव्हा टिफिन उघडला
वर्गात एकच गोंधळ माजला

उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून

शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरात दंगामस्ती

माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती
डब्याची संपली कटकट नस्ती....
नवरा - बायको रस्त्यातून जात असतात. समोरून एक तरुण मुलगी येते, नवऱ्याला 'हाय' करून जाते.
बायको : काय रे, कोण होती ती?
नवरा : गप गं! डोकं खाऊ नको... अजून तिला पण सांगायचंय, तू कोण आहेस ते?

काय "मग"

एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्यां मगाला काय म्हणेल ???
......विचार करा
...........अरे विचार काय करताय?
....सोप्पय उत्तर : काय "मग" काय चाल्लय?

मानूस

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

स्वैर झिंगलेले..

शब्दावाचून जे
क्षण चांदण्यात शिंपलेले
न घडल्या कहाण्या साऱ्या
तुझ्या वाचून विणलेले

मधहोश झिंगलेल्या
रातीचा आलम सारा
सुगंधलेल्या आठवणी
तुझ्याभोवती पुन्हा पसारा

जगावे तरी कसे
प्रश्न गंजलेले
पुन्हा साठलेले
पुन्हा वेचलेले

मदिरा ती कशाला
ना गरज पामराची
यांच्याविनाच आम्ही
स्वैर झिंगलेले..

१०० रुपयात ५ स्टार

पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त 5 STAR
हॉटेलात जेवून आलो..
दुसरा भिकारी : ह्या १०० रुपयात जेवण शक्यच नाही..
पहिला भिकारी : मी मस्त आत गेलो..भरपेट जेवलो...न बिल झाले ५०००..तर
त्यांनी पोलिसांना बोलावले..
दुसरा भिकारी: च्यायला मग काय झाले ?
पहिला भिकारी : काही नाही हॉटेल बाहेर येताच मी पोलिसांना १०० रुपये दिले
आणि म्हटलं..घ्या प्रकरण मिटवून..
माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!
पहिला मित्र: ४ दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...
....
रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
... दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..
पहिला मित्र: hmm ... येताना टाकली तर चालेल का?

वय

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल."

सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"

प्रगणक," होय."

सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."

आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "

गूढ जन्म

जिथे जीव जडतो
स्वप्ने पाहू लागतो
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो

हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले

का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली

हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना

हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी

लाईट

सर - होमवर्क का नाही केला?

मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

मग उपयोग काय?

जेम्स बाँडचे बैकग्राउंड वाजतय डोक्यात,
हातात भिक्षापात्र..मग उपयोग काय?

लॉटरीच्या पैशाने गुरख्याने घेतला बंगला,
स्वत:च झाला वॉचमन...मग उपयोग काय?

तरुणी आवडली... मनाला भिडली..,
गळ्यात मंगळसुत्र...मग उपयोग काय?

भरपुर पगाराची US ला नौकरी,
व्हिसा रिजेक्ट झाला...मग उपयोग काय?

शहरामधे फुकट अन्न-धान्य वाटले,
गल्लीत माझ्या कर्फ्यु...मग उपयोग काय?

हेअर ट्रांस्प्लांट साठी जमवले होते पैसे,
नुकतेच लग्न झाले...मग उपयोग काय?

नशिबाने नेहमी चॉकलेट दाखवल,
खाउ नाही दिल...मग उपयोग काय?

- शशांक प्रतापवार

दिवस कसे गेले

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
...
.
.
.
.
. आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!

पोरी महागात पडतात!!

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो, पोरी महागात पडतात

तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कानाखाली ओढतात
खरच सांगतो पोरांनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरांनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय सर्वांनाच...........

लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे
असं प्रत्येक बाईला वाटत असतं
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं

तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते
नको तेच नेमकं बोलून जाईल
जे बोलायचं त्याला कात्री असते.

मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
ती त्याला बोलत बसते
त्याच्या तेही डोक्यावरून जातं
पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

त्याचा तो गबळा अवतार
तिला नीट्नेटकं राहयचं असतं
तिला चार दिवस सासूचे
त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
ती त्याच्या आकाशात उडत नाही

तो गच्चीत तिला घेऊन जातो
इंद्रधनुष्यावर चालायला
ती सोबत पापड कुरडया घेते
गच्चीत वाळत घालायला

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते

प्रेमात रंगून, नशेत झिंगून
खूपसं जवळ, काहीसं लांबून
थोडीशी घाई, थोडसं थांबून
पौर्णिमेचा चंद्र त्याला
तिच्या केसात माळायचा असतो
...आणि त्याच वेळेस तिला मोरी धुवायची
किंवा संडास घासायचा असतो.

आपली बायको म्हैस आहे
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

- धुंद रवी

सरदारजिची साइड

एका ट्रफिक पोलीसाने रॉंग साईडने जाणाऱ्या सरदारजीच्या गाडीला थांबविले आणि म्हटले -

'' तुला काही कळतं का? तु कुठे गाडी घेवून चालला होता''

'' नाही ... पण हो जिथेही मी माझी गाडी घेवून चाललो होतो तिकडे काहीतरी खुप मोठी दुर्घटना घडलेली दिसते .. कारण सगळेजण तिकडून गाड्या परत आणित आहेत'' सरदारजीने उत्तर दिले.

म्हातारा माणूस व पोपट

एक म्हातारा माणूस एका मॉलमध्ये बेंचवर बसला होता. तेवढ्यात तिथे एक युवक येवून बसला. त्या युवकाचे केस कुठे पिवळे, कुठे हिरवे, कुठ गुलाबी तर कुठे जांभळे असे जागोजागी रंगविलेले होते. त्याच्या डोळ्याभोवती काळा रंगही लावला होता. तो म्हातारा त्या युवकाकडे एकटक पाहत होता. त्या म्हाताऱ्याला आपल्याकडे असे एकटक बघतांना पाहून तो युवक त्याला उद्दामपणे म्हणाला, '' हे म्हाताऱ्या ... असा काय पाहतोस?... तु तुझ्या जवानीत कधी अशी मस्ती केली नाही का?''

त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, '' हो केली होती ना... जेव्हा मी जवान होतो तेव्हा एकदा मी खुप पिलो होतो... तश्या पिलेल्या अवस्थेत मला एक पोपट भेटला... त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडलो, आणि पुढेही बरच काही झालं...... मी विचार करीत होतो की तु त्या पोपटाचा आणि माझा मुलगा तर नाहीस ''

एकच कुत्रा

टिचर - बंटी तु ''माझा कुत्रा'' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणेच आहे. तु त्याची कॉपी केलीस की काय?

बंटी - नाही सर... पण तो कुत्रा एकच होता...

स्त्री

प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते.
कारण लग्नाच्या आधी ती राणी आसते.
लग्नानंतर लक्ष्मी बनते.
आणि मुलं झाल्यानंतर नुसती राब राब राबनारी बाई बनते

बैलगाडी

एकदा एका सरदारजीचा इंटरव्हू होता. इंटरव्हू घेणाऱ्याने सरदारजीला प्रश्न विचारला

इंटरव्हूअर - सरदारजी हे फोर्ड काय आहे?

सरदारजी - फोर्ड ही गाडी आहे.

इंटरव्हूअर - बरं सरदारजी हे ऑक्सफोर्ड काय आहे?

सरदारजी - ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. म्हणजे ऑक्सफोर्डचा अर्थ होतो बैलगाडी.

च्यायला परत हिचा फोन

च्यायला परत हिचा फोन
आणि पुन्हा तेच प्रश्न
कुठे आहेस? कसा आहेस?
काय करतोऽऽऽऽऽय?
झाली का कामं?
कप्पाळ माझं!
हिला समजत नाही का? मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजतो हिच्या प्रष्णांचा रिंगटोन.
च्यायला, च्यायला परत हिचा फोन.
कुठे पळून नाही जाणार, सायंकाळी येइल ना घरी,
तेव्हा विचारनं जे विचारायचं ते.
सारं काही सांगेन.
झालंऽऽऽऽऽ, रडा-रडी सुरु
तू खुप बदललाय.
लग्नाअगोदर असा नव्हतास.
माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकणार कोण?
च्यायला परत हिचा फोन.
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, यू यू आणि काय काय,
SMS पाठवला, भावना पोचल्या, मग फोन चे काय काम?
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्याने ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन.

च्यायला परत हिचा फोन.

अकबरचा मोबाइल नंबर

गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५

.
.
.
.
.

बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.

अलाण्याच्या ब्रशावरती

अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेअर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा, वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरीचाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटणघाटण
पिझ्झाहटचा पिझ्झा खा मेपलज्यूस ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अ ब क ड ई फ ग ... तयार घरे सात टाईप्स
रेडिमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटरपाईप्स
होटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रुचि एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश! गजब तऱ्हा! व्यक्तिवरती सक्तीनाही
सहस्रशीर्ष पुरुषा!! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!


कवी - वसंत बापट

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,
ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,
ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल.

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,
धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,
मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,
ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,
शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...


कवी - वसंत बापट

विजयाचे रहस्य

उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्यावर समाजवादी व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले दोन राजकारणी भेटतात व समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे रहस्य काय असावे यावर चर्चा करित असतात.

कॉंग्रेसचा उमेदवार : मी माझ्या पक्षाचा विजय होईल याची कायम काळजी घेत होतो. समजा मी टॅक्सीने प्रवास केला तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला १०० रुपयाची टीप देउन कॉंग्रेसला मतदान करायला सांगायचो.

समाजवादी पक्षाचा उमेदवार : मी पण तसच करायचॊ. मी टॅक्सी ड्रायव्हरला मीटर प्रमाणेच भाडॆ द्यायचो व कॉंग्रसला मतदान करायला सांगायचो.

छंद घोटाळती ओठी

छंद घोटाळती ओठी
नाचणभिंगरी
त्याच्या साध्या ओळीसुध्दा
झपाटती भारी
डोक्यावर हिंदळता
देह झाला गाणी
एका कवीच्या डोळ्यांची
डोळ्यांना माळणी
असे कसे डोळे त्याचे
मीही नवेपणी
मेंदीओले हात दिले
त्याला खुळ्यावाणी
तेव्हापासूनचे मन
असेच छांदिष्ट
सये तुला सांगू नये
अशी एक गोष्ट:
त्याच्या ओळी माझ्या ओठी
रुंजी घालू आल्या
रानपाखरासारश्या
तळ्यात बुडाल्या.


कवी - ना. धों. महानोर

पक्षांचे थवे

विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी

पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान

झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी


कवी - ना. धों. महानोर

झकास शाळा !

स्थळ : शाळा

वर्ग : एकदम गप्प

कारण : इन्स्पेक्शन

अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?

बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही.मी काल शाळेतच आलो नव्हतो . मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही .

अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.

सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करणार्‍या मधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.

अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.

मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही.मी ह्याची खात्री देतो.

अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु! तू रोज शाळेत येतोस काय?

बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत- औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.

सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.

मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.

अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे.खरे साहेब आले असतेतर काय झाले असते देव जाणे??

गरीब मुली

पप्याचे बाबा FTV बघत असतात..
अचानक पप्या येतो
तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...
"अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... "
तर पप्या म्हणतो...
"यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."

निरागस पप्प्या

छोटा निरागस पप्प्या
पप्याचे बाबा कामानिमित्त वर्षभर परदेशात गेलेले असतात....
तर एक दिवशी अचानक पप्या आईकडे हट्ट करायला लागतो..,
...
" मला अजून एक छोटा भाऊ पाहिजे ..लवकरात लवकर "..
आईला काय बोलावं सुचत नाही....त्याची आई म्हणते," तुझे बाबा आले कि आपण बोलू "
पप्या लगेच म्हणतो...." नको नको बाबांना नको बोलूस.. आपण ते आले कि
त्यांना मस्त आच्यार्याचा धक्का देऊ यात ना !!"

नारदाचा वारस

नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

कवी - विंदा करंदीकर

पदवी

जिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर

कवी - विंदा करंदीकर

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

सद्गुरुवाचोनी

करितो आदरे । सद्गुरुस्तवन
ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.
धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन
धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.
धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी
थोर धन्वंतरी । मृत्युंजय.
धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन
ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.
धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता
इतिहासाचा गुंता । सोडवी जो.
धन्य शेक्सपीअर । धन्य कालीदास
धन्य होमर, व्यास । भावद्रष्टे.
फॅरॅडे, मार्कोनी । वॅट, राईट धन्य
धन्य सारे अन्य । स्वयंसिद्ध.
धन्य धन्य सारे । धन्य धन्य मीही!
सामान्यांना काही । अर्थ आहे!
सद्गुरूंच्या पाशी । एक हे मागणे :
भक्तिभाव नेणे । ऐसे होवो.
सद्गुरुंनी द्यावे । दासा एक दान :
दासाचे दासपण । नष्ट होवो.
सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय
तेव्हा जन्म होय । धन्य धन्य.


कवी - विंदा करंदीकर

किलबिललेले उजाडताना

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची


कवी - विंदा करंदीकर

सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर

सांजवेळी सोबतीला

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा...
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा...

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा...

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा...

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा...

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा...

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा...

- इलाही जमादार

तीर्थाटण

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.


कवी - विंदा करंदीकर

देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


कवी - वसंत बापट

या नभाने या भुईला दान द्यावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.

तसेच घुमते शुभ्र कबूतर

मनात माझ्या उंच मनोरे
उंच तयावर कबूतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्‍न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर?
गिरकी घेऊन आपणाभवती
तसेच घुमते शुभ्र कबूतर.


कवी - विंदा करंदीकर

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!


कवी - ना. धों. महानोर

प्रेम करावे असे, परंतू....

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.


कवी - विंदा करंदीकर

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!


कवियत्री - शांता शेळके

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||


कवी - विंदा करंदीकर