चारोळ्या

दारोळया


चारोळ्या



पुसनार कोणी असेल तर
डोळॅ भरुन यायला अर्थ आहे,
कुणाचे डॉळॅ भरणारच नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे..........

गुलमोहर फुलताना
तुझ्या कुशीतुन बघावं
गुलमोहरसारखं फुलत,
तुझ्या कुशीत जगवं..........

इथे वेड असण्याचे
खुप फायदे आहेत
शाहण्यासाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत.........

झाडावरुन प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही,
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही..........

सगळंच तुला देउन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तु तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली.


तुझ्यावर रागावणं हा
तुला आठवण्याचा बहाणा आहे
तु आलास कि तो जातो
तसा माझा राग शाहणा आहे.

तु विझत असताना
तुझ्याभोवती मी ओंजळ धरली
तु तेवत राहिलीस
नी प्रकाशाने माझी ओंजळ भाजली.

कोण म्हणतय रात्रीनंतर येणारा दिवस
नेहमीच नवा असतो
माझ्यामते तो नुसताच
दोन रात्रींमधला दुवा असतो.

घर दोघांच असतं
ते दोघांनी सावरायचं असतं
एकाने पसरवलं तर
दुसर्याने आवरायचं असतं।

देवळात जाउन माणसे
दुकाणात गेल्यासारखी वागतात
चार-आठ आणे टाकून
काहीना काही मागतात.

तुझं हे नेहमीचचं झालंय
आल्या आल्या निघणं.......
मी जाते, मी जाते म्हाणताना
मी थांबवतोय का बघणं.

मी बुडताना माझा गाव
ओझरता पाहिला होता
पण मला पहायला
गाव माझा काठावर उभा राहिला होता.

तू बुड्ताना मी
तुझ्याकडे धावलो ते
मदतीला नव्हे सोबतीला ....
नाहीतरी .... मला तरी कुठे येत आहे पोहायला

आठवनिंच्या देशात
मी मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खुश असते
येताना त्याला येववत नाही

चढाओढ़ या शब्दाचा अर्थ
आपण किती उलटा लावतो
कोणी वर चढताना दिसला
की लगेच खाली ओढायला धावतो

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्यांकडे वलले
पापण्या जरा थाराथाराल्या
म्हणुन गुपित तुला कलले

ज्या गोष्टीची भीती होती
तेच होउन बसलय
तुझ्याकडे पाठवत नाही
म्हणुन मन माझ्यावर रुसलय