संत कान्होबा महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत कान्होबा महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।

अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।

तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥

आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥

ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥


- संत कान्होबा महाराज