संत निवृत्तीनाथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत निवृत्तीनाथ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥

तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥

माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥

निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥


- संत निवृत्तीनाथ