नवरा -बायको लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नवरा -बायको लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

समजण्यात चूक

न वरा-बायकोमध्ये जोरदार भांडण सुरू होतं.


बायको : (रागाने) मी माझ्या आईचा सल्ला मानला असता आणि तुमच्याशी लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं.


नवरा : काय...तुझ्या आईने माझ्याशी लग्न करू नको म्हणून सांगितलं होतं?


बायको : नाही तर काय?


नवरा : अरे देवा...आणि मी सासूबाईंना समजण्यात आतापर्यंत किती मोठी चूक करत होतो.

नव-यावारचे प्रेम

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ...
"रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत",
असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले.


त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ..!

च्यायला परत हिचा फोन

च्यायला परत हिचा फोन
आणि पुन्हा तेच प्रश्न
कुठे आहेस? कसा आहेस?
काय करतोऽऽऽऽऽय?
झाली का कामं?
कप्पाळ माझं!
हिला समजत नाही का? मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजतो हिच्या प्रष्णांचा रिंगटोन.
च्यायला, च्यायला परत हिचा फोन.
कुठे पळून नाही जाणार, सायंकाळी येइल ना घरी,
तेव्हा विचारनं जे विचारायचं ते.
सारं काही सांगेन.
झालंऽऽऽऽऽ, रडा-रडी सुरु
तू खुप बदललाय.
लग्नाअगोदर असा नव्हतास.
माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकणार कोण?
च्यायला परत हिचा फोन.
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, यू यू आणि काय काय,
SMS पाठवला, भावना पोचल्या, मग फोन चे काय काम?
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्याने ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन.

च्यायला परत हिचा फोन.