संत जनार्दन महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संत जनार्दन महाराज लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

देह शुद्ध करुनी

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

ह्मणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥


 - संत जनार्दन महाराज